Wednesday, January 15, 2025

आसाममध्ये 2 तासांचा ‘जुम्मा-ब्रेक’ बंद

Share

आसाम सरकारने राज्य विधानसभा कर्मचाऱ्यांना दिलेला 2 तासांचा शुक्रवारचा ब्रेक रद्द
करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्वतः समाज माध्यमांवर
या निर्णयाची माहिती दिली आहे.


मुख्यमंत्री हिमंता बिस्वा म्हणाले की दोन तासांचा जुमा ब्रेक रद्द करून, आसाम विधानसभेने
उत्पादकतेला प्राधान्य दिले आहे. मुस्लिम लीगच्या सय्यद सादुल्ला यांनी ही प्रथा 1937 मध्ये
सुरू केली होती. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल सभापती विश्वजित दैमरी आणि आमदारांचे
सरमा यांनी आभार मानले आहेत. विशेष म्हणजे लोकसभा, राज्यसभा आणि इतर राज्यांच्या
विधानसभांमध्ये नमाज पठणासाठी ब्रेक देण्याची तरतूद नाही. त्यामुळे आसाम विधानसभेच्या
अध्यक्षांनीही ही ब्रिटिशकालीन राजवट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार ते गुरुवार,
आसाम विधानसभेच्या वेळा सकाळी 9.30 वाजता सुरू होतात आणि शुक्रवारी सकाळी 9
वाजता नमाजासाठी 2 तासांचा ब्रेक दिला जातो. अशा स्थितीत आता विधानसभेचे कामकाज
दररोज सकाळी 9.30 वाजता सुरू होणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख