Thursday, September 19, 2024

३.६५ लाख शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी ५ हजारांची मदत

Share

मंगळवारपासून (दि. १०) म्हणजेच आज पासून कपाशी व सोयाबीनला दोन हेक्टर मयदित हेक्टरी पाच हजारांची मदत देण्यात येणार आहे. यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३.६५ लाख शेतकऱ्यांना अधिकतम २० हजारांची शासन मदत मिळणार आहे

गतवषीं सोयाबीन व कापसाला हमी भावदेखील मिळालेला नाहीं. त्यामुळे ज्या शोतकन्यांनी ई-पीक पाहणीद्वारे ऑनलाइन पीक पेरा नोंदविलेला आहे, आश्या शेतकऱ्यांना शासन मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

हि घोषणा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्रांनी केली होती. त्यानंतर जमाबंदी विभागाने शेतकऱ्यांच्या याद्या कृषी विभागाला पुरविल्या यामध्ये अनेक शेतकन्यांची नावे गहाळ असल्याने पुरवणी यादी सुद्धा पाठविण्यात आली, परळी येथील कृषी महोत्सवात मुख्यमंत्री यांनी सरसकट शेतकन्यांना मदत देण्याची ग्वाही दिली होती. आता योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली. त्यामध्ये सरसकट उल्लेख नाही., त्याऐवजी ई पीक पाहणी केलेले शोतकरी यांची माहिती पडताळणी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, संमतीपत्र, संयुक्त खातेदारांचे अफिडेविट कृषी साहायकाला द्यावे लागेल. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे कागदपत्र जातील, या माहितीद्वारे आधार प्रमाणीकरण होणार आहे

अन्य लेख

संबंधित लेख