Friday, October 18, 2024

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटीबद्ध – चंद्रकांत पाटील

Share

मराठवाड्यातील मराठा(Maratha) समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मराठवाड्यात क्रांतीसुर्य स्व. अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने एक नवीन महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय काल मराठा आरक्षण(Maratha Reservation) आणि सुविधा यासाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.

https://x.com/ChDadaPatil/status/1843709453515870630/photo/1

सह्याद्री अतिथीगृहात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीला महसूल तथा मंत्री समितीचे सदस्य राधाकृष्ण विखे पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा मंत्री उप समिती सदस्य शंभूराज देसाई, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, राजेंद्र राऊत, प्रसाद लाड, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पाटील, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव तथा विधी परामर्ष सुवर्णा केवले आणि मराठा समाजाच्या विविध संघटनेचे प्रतिनिधी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील असून मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. मराठा समाजाचे एसईबीसी (सामाजिक आर्थिक मागास प्रवर्ग), आरक्षण टिकवण्यासाठी न्यायालयीन लढा शासन देत आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख