Friday, December 27, 2024

भाजप उमेदवारांसाठी विविध ठिकाणी संभांचे आयोजन

Share

भाजप उमेदवारांसाठी पंढरपूर, अक्कलकोट, माळशिरस, सोलापूर शहरात सभांचे नियोजन करण्यात आले आहे. सोलापूर, जिल्ह्यातील माळशिरस, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य व पंढरपूर- मंगळवेढा या सहा विधानभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ५ नोव्हेंबरनंतर भाजपच्या केंद्रीय व राज्यातील नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपचे देवेंद्र कोठे मैदानात असून शहर उत्तरमधून विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या प्रचारासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हैदराबादच्या माधवी लता यांच्या जाहीर सभा सोलापूर शहरात होणार आहेत.

याशिवाय पंढरपूर-मंगळवेढा, माळशिरस या मतदारसंघासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा नियोजित आहे. सध्या सोलापूरचे स्थानिक नेते राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जाहीर सभांसाठी भाजपचे वरिष्ठ नेते यावेत, यासाठी प्रयत्न करीत आहेत. महायुतीच्या उर्वरित उमेदवारांपेक्षा भाजपच्या उमेदवारांना सर्वाधिक लाभ होईल, अशा मध्यवर्ती ठिकाणीच त्या नेत्यांच्या सभा होतील, असे नियोजन केले जात आहे.

अन्य लेख

संबंधित लेख