Thursday, November 14, 2024

त्यांच्या जिहाद विरुद्ध तुमचे मतभेद!

Share

मत कोणाला द्यायचं याबद्दल त्यांच्या मनामध्ये संभ्रम कधीही नसतो. ती केवळ हिंदू समाजातील सद्‌गुण विकृती आहे. ते सर्वप्रथम बघतात ते ‘उमेदवार त्यांच्या समाजातील आहे का? नसला तर काँग्रेसचा कोणी उभा आहे का?’ आताच्या विधानसभेच्या निवडणुकीबाबतीत सांगायचे झाले तर त्यांची पसंती शरद पवार गट तसेच उद्धव ठाकरे गट यांना देखील असणार आहे. काही कारणामुळे अपक्ष उमेदवारास मत द्यायचे झाल्यास ‘तो तथाकथित सेक्युलर म्हणजे मुस्लिमांचे लांगुलचालन करणारा असलाच पाहिजे’ ही गणिते त्यांनी आधीच मांडलेली असतात. आणि त्यांना तसे करण्यास प्रवृत्त करणारे फतवेही निघतात.

मुस्लिम धार्जिणे असलेल्या कॉंग्रेसने देशात आणि त्यांच्याच मार्गाने चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात मुस्लिम तूष्टीकरणाचे राजकारण करून आजतागायत मुस्लिम समाजाची भरगोस मते मिळवली आणि पुढेही मिळवतील. त्यामुळे कितीही उमेदवार निवडून आले तरी देखील हे पक्ष त्यांच्या कुठल्याही कृतीमुळे मुसलमान नाराज होऊ नये म्हणून कधीही हिंदू म्हणून किंवा भारतीय म्हणून देशातील बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाचा प्राथमिकतेने विचार करू शकले नाहीत. त्यांची प्राथमिकता मुस्लिम समाजाला खुश करणे हीच होती कारण त्यांची वृत्ती नेहमीच स्वार्थी होती! मग भले त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी त्यांचे मतदार असलेल्या मुस्लिमांनी देशाला, देशातील साधन संपत्तीला कितीही ओरबाडून टाकून विविध मार्गान जिहाद करून आपली पाळेमुळे देशात कितीही घट्ट केली तरीही त्यांना ते मान्य असते. ‘आम्ही त्यांना खुश करतो, बदल्यात ते आमच्यावर विश्वास ठेवतात, आम्हाला मते देतात’ अशाप्रकारे हे व्यावहारिक नाते दोन्ही बाजूंनी जपले जाते. परंतु हे सर्व कधी पर्यंत? जो पर्यंत मुस्लिम अल्पसंख्यांक आहेत तो पर्यंतच. ते अल्पसंख्यांक आहेत म्हणूनच त्यांनी स्वहित बघून काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिलेला असतो. परंतु ज्यावेळी ते अल्पसंख्यांक राहत नाहीत त्यावेळी त्यांना तुमच्या पक्षातील सेक्युलर हिंदू उमेदवार देखील चालत नाही. मुस्लिम समाजाची ही मानसिकता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला माहित नाही असे नाही.

परंतु स्वार्थापोटी अंध झालेल्या या पक्षांनी कधीही देशहिताचा विचार केला नाही. अर्थात त्यांनी मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात न आणता आपली वोट बैंक म्हणून त्यांच्या जिहादी मजहबी विचारांना खतपाणी देऊन त्यांना देशविरोधी कारवाया करण्यास रान मोकळे करून दिले. कॉंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वार्थी धोरणांमुळे जिहादी मुस्लिम समाजाचे हात बळकट झाले. परिणाम स्वरूप या पक्षांनी निर्माण केलेल्या पोषक वातावरणात जीहाद्यांनी देशात आणि राज्यात आपले जिहादी मनसुबे साध्य करण्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळवले आहे. हिंदू समाजासाठी ही धोक्याची घंटा आहे. जर हिंदू समाज असाच निद्राधीन राहिला तर एक दिवस संपूर्ण देशच त्यांच्या नियंत्रणात येईल. एखादा प्रदेश त्यांच्या नियंत्रणाखाली असला की, काय घडू शकते याची कितीतरी उदाहरणे जगभरात आहेत. आपल्या देशाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास स्वतंत्रपूर्व भारतात १९२१ मध्ये केरळ मध्ये झालेले मोपला मुसलमानांचे बंड असो बंगालची फाळणी असो किंवा स्वातंत्र्य भारतात १९९० मध्ये निष्कासित केलेले काश्मीरी हिंदू असोत, अशी कितीतरी उदाहरणे इतिहासाच्या पानापानावर दिसून येतील. परंतु हिंदू समाजाला हा सर्व इतिहास माहीत करून घ्यायचा नसतो कारण त्याची ‘तत्त्व’ त्याच्यातील ‘मतभेद’ त्याच्या दृष्टीआड येतात!

जिहादी मुसलमानांना त्यांचा धर्म, धर्माची शिकवण म्हणजेच धर्मासाठी जिहाद करणे माहीत असते. या विषयी त्यांच्या मनात संभ्रम कधीही नसतो. चांगला मुसलमान होण्याकरिता ते जीवनभर त्यांच्या धर्माचे आचरण देखील करतात. मुस्लिमांनी इस्लाम प्रमाणे वागावे याकरिता, लहानपणापासूनच त्यांच्यावर त्यांच्या धर्माचे संस्कार केले जातात. परंतु बहुसंख्य हिंदूंच्या बाबतीत हल्ली तसे घडत नाही. पाश्चिमात्य विचारसरणीच्या प्रभावामुळे किंवा सनातन परंपरेत मुळातच असलेल्या विचार स्वातंत्र्यामुळे, हिंदूंना सनातन धर्माप्रमाणे आचरण करण्याची सक्ती कधीच केली जात नाही. त्यामुळे बहुसंख्य हिंदूंना सनातन धर्म, त्याची शिकवण माहीत नसते. परिणाम स्वरूप हिंदू समाजात तुलनात्मक दृष्ट्या धर्माविषयी उदासीनता दिसून येते. स्व धर्माविषयी उदासीन असलेला तथाकथित सेक्युलर हिंदु ‘सर्वधर्म समान आहेत!’ अशा बोंबा मारून, सर्वधर्मसमभाव या संकल्पनेचे समर्थन करताना दिसतो आणि नकळतपणे धर्माध समुदायाने विचारपूर्वक पसरवलेल्या जाळ्यात अलगद अडकतो. अज्ञान आणि डाव्या विचारांच्या प्रभावामुळे हिंदू स्वतःला सर्वधर्मसमभाव या संकल्पनेशी जोडून घेतो. स्वतःला अभिमानाने पुरोगामी म्हणवून घेणारे डाव्या विचारसरणीचे हिंदू पाश्चिमात्य विचारसरणीच्या त्यांच्यावरील प्रभावामुळे सनातनी हिंदूंच्या विरोधात बोलताना-वागताना दिसतात. हीच तथाकथित पुरोगामी मंडळी सनातनी हिंदूंना नेहमीच जातीयवादी ठरवून त्यांच्यावर चिखलफेक करण्याचे, त्यांच्याविरुद्ध षड्यंत्र रचण्याचे उद्योग करताना दिसतात. याचाच अर्थ हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई ही फक्त जिहाद्यांविरुद्ध नाही तर ती पुरोगामी असलेल्या हिंदू विरुद्ध देखील आहे. किंबहुना सावधपणा म्हणून ती सर्वप्रथम पुरोगामी हिंदूविरुद्ध आहे असे म्हणायला हरकत नाही.

हिंदूंकरिता भारत हा एकमेव देश आहे! या गोष्टीचा हिंदूंनी वारंवार विचार करायला हवा. परंतु निद्रिस्त हिंदू समाज नेहमीच स्वतःला तुकड्या तुकड्यांमध्ये बघतो. तो स्वतः ला जाती-पातीत, भाषा पंथ, प्रांत, आर्थिक स्तर अशाप्रकारे विभागतो त्यामुळे त्याच्यात हिंदू अथवा भारतीय म्हणून असलेली एकात्मतेची भावना केवळ स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त अथवा क्रिकेट मॅच च्या वेळीच दिसून येतो. परिणाम स्वरूप हिंदू समाजात असलेले भेदाभेदाचे प्रदर्शन निवडणुकांच्या काळात मतपेटीतून नेहमीच पहायला मिळते. अर्थात याचा सर्वाधिक फायदा तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यासारख्या पक्षांना होतो.

सर्वसमावेशकता आणि सर्वव्यापी सत्य हीच हिंदुत्वाची व्याख्या आहे. तीच भारताची खरी ओळख आहे. सुरुवातीला परकीयांच्या आक्रमणामुळे समाजात दोष निर्माण झाले. त्यामुळे आत्मकेंद्रीत झालेल्या हिंदू समाजात जाती-पाती, पंथ संप्रदाय, प्रांत-भाषा, खान-पान अशाप्रकारे भेद निर्माण झाले. ज्यामुळे एकसंध असलेला हिंदू समाज विखुरला गेला. परंतु स्वातंत्र्यापश्चात या विखुरलेल्या समाजातील वर्गा-वर्गांमधील वैमनस्य वाढवण्यासाठी काँग्रेस सारख्या पक्षांनी तुष्टीकरणाचे राजकारण केल्याने, समाजातील जातीपातीची, वर्गा-वर्गातील भेदाभेदाची दरी अधिकच वाढत गेली. परिणामस्वरूप हिंदू समाज नेहमीच एकात्मतेच्या भावनेपासून दूर होत गेला.

मतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि हिंदूंनी तो स्वतः चे हिंदुत्व टिकवण्यासाठी, राष्ट्रीयत्व टिकवण्यासाठी साजरा करायला हवा. भारतीय जनता पक्ष हा हिंदुहितासाठी कार्य करणारा देशातील एकमेव मोठा पक्ष आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष व त्याच्या सोबत असलेले मित्र पक्ष हेच निवडणुकीत हिंदूंची प्राथमिकता असायला हवेत. समाजातील वर्गा-वर्गातील मत-भेदांचा कधीच अंत होणार नाही. त्यामुळे हिंदू समाजातील जाती-पाती, भाषा-प्रांत, पंथ संप्रदाय यांपासून मुक्त आशा भेदरहीत समाजाची निर्मिती व्हावी म्हणूनच हिंदूंनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. अन्यथा हिंदू समाजात असलेल्या या दोषांचा गैरफायदा जीहाद्यांकडून, राजकीय समाज कंटकांकडुन हिंदू समाजाला एकमेकांपासून तोडण्यासाठी नेहमीच घेतला जाईल. म्हणूनच निवडणुकांच्या तोंडावर हिंदूंनी आपल्यातील भेदाभेद बाजूला ठेवून केवळ एक हिंदू म्हणून स्वतः चे अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीने केवळ हिंदू हिताचा विचार करायला हवा. महाराष्ट्रातल्या निवडणुकीबाबत सांगायचे झाल्यास हिंदू हित पर्यायाने देशहित साधण्यासाठी हिंदूंनी कुठलाही संभ्रम न बाळगता एक जागरूक हिंदू म्हणून केवळ महायुतीने दिलेल्या उमेदवाराचाच विचार करायला हवा. अन्यथा तुमच्यातील असलेल्या मतभेदांची खूप मोठी किंमत येणाऱ्या काळात चुकवावी लागेल हे मात्र निश्चित !

  • अॅड. प्रसाद शिर्के

अन्य लेख

संबंधित लेख