Thursday, November 20, 2025

मुंबई महापालिका निवडणूक : महाविकास आघाडीला मोठा झटका! सपाचा ‘स्वबळावर’ लढण्याचा निर्णय; थेट फायदा महायुतीच्या पदरात!

Share

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असतानाच, समाजवादी पार्टीने (SP) एक मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे. सपाने मुंबई महापालिकेच्या १५० जागा स्वबळावर लढवण्याची अधिकृत घोषणा केली आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या (MVA) मतांचे विभाजन अटळ असून, मुंबईतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. याचा सर्वाधिक लाभ महायुतीला होईल, असा अंदाज आहे.

प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांची घोषणा

सपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी इस्लाम जिमखाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. “समाजवादी पक्ष ही निवडणूक संपूर्ण ताकदीने स्वतंत्रपणे लढणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

‘विश्वासघात’ झाल्याचा दावा

महाविकास आघाडीपासून (MVA) ‘नाते तोडण्या’मागचे कारण स्पष्ट करताना आझमी म्हणाले की, मागील निवडणुकीत आपला विश्वासघात झाला. “विधानसभेच्या निवडणुकीत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख संपेपर्यंत समाजवादी पक्षाला एकही जागा देण्यात आली नाही. नंतर अचानक दोन जागा दिल्या, त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळेच यावेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे,” असे आझमींनी सांगितले.

राजकीय गणिते बदलणार!

समाजवादी पक्षाची मुंबईतील काही वॉर्डमध्ये चांगली ताकद आहे आणि मुस्लीम मतदार मोठ्या संख्येने त्यांच्या मागे उभे राहताना दिसतात. एका वेळी त्यांचे सुमारे २५ नगरसेवक मुंबई महापालिकेत होते.

सपा आता स्वबळावर लढणार असल्याने, याचा थेट फटका महाविकास आघाडीतील घटक पक्षांना (काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी) बसण्याची दाट शक्यता आहे. सपाची मते निकालावर परिणाम करणारी ठरू शकतात आणि यामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अन्य लेख

संबंधित लेख