Saturday, July 27, 2024

ही लढाई देशाला पुढील 5 वर्ष कोण सांभाळेल यासाठीची आहे – देवेंद्र फडणवीस

Share

बारामती लोकसभा : “ही निवडणूक देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. हि निवडणूक नगरपालिकेची निवडणूक नाहीये, हि निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. काही लोक बोलतात, हि निवडणूक अजित पवार विरुद्ध शरद पवार सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे आहे.  ही लढाई पवार विरुद्ध पवार नसून या देशाला पुढील 5 वर्ष कोण सांभाळेल यासाठीची लढाई आहे”, असं भाष्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) वारजे, पुणे (Pune) येथे केलं.

बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारार्थ वारजे, पुणे येथे सभा आयोजित केली होती. यावेळी बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, फक्त दोन पर्याय आहेत, पहिला पर्याय विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरुद्व दुसऱ्या बाजूला राहुल गांधी आहेत. ‘ज्या क्षणी तुम्ही सुनेत्राताईंच्या घड्याळाचे बटण दाबाल, त्याचवेळी बारामती मतदार संघाची बोगी नरेंद्र मोदींच्या विकासाच्या इंजिनला जोडली जाईल’, असं फडणवीस म्हणाले.

“नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात पुण्यात झालेला बदल आज पुणेकर पहात आहेत. पुण्यातील मेट्रो ही देशाच्या इतिहासात सर्वात वेगाने तयार झालेली मेट्रो आहे. या मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारण्याचे काम सुरू आहे. मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारकडून नदी सुधार योजनेच्या अंतर्गत मुळा-मुठा नदीसाठी ₹1800 कोटींचा निधी, सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी आणि नागरीकरणाच्या सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला”, असल्याचं फडणवीस म्हणाले.

“राहुल गांधींच्या इंजिन मध्ये बसायला प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी यांना जागा आहे. पवार साहेबांच्या इंजिनमध्ये बसायला सुप्रिया सुळे यांना जागा आहे. तर, उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये बसायला फक्त आदित्य ठाकरेला बसायला जागा आहे. त्याठिकाणी बसायला इतर कोणालाही जागा नाही.” असा टोला पण यावेळी त्यांनी विरोधकांना लावला. 

अन्य लेख

संबंधित लेख