Monday, December 22, 2025

“उबाठाचे ‘निर्धार’ मेळावे नव्हे, तर ‘निराधारांचे’ मेळावे;” भाजपचा उबाठा गटावर जोरदार पलटवार

Share

मुंबई : उद्धव ठाकरे गटाकडून (शिवसेना उबाठा) मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘निर्धार मेळाव्यां’वरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या मेळाव्यांचा उल्लेख ‘निराधारांचे मेळावे’ असा करत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करताना केशव उपाध्ये यांनी उबाठा गटाला ‘निराधार’ ठरवण्यासाठी पाच महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यांनी म्हटले की, हे मेळावे खालील कारणांमुळे ‘निराधारांचे’ आहेत:

१. पक्ष हरवलेले निराधार: ज्यांचा मूळ पक्ष आणि चिन्ह हातातून गेले आहे, अशांचा हा मेळावा आहे.

२. हिंदुत्वाचा विचार सोडलेल्या निराधारांचा: केवळ सत्तेसाठी हिंदुत्वाचा विचार खुंटीवर टांगणाऱ्यांचा हा गट आहे.

. विश्वास गमावलेले निराधार: ज्यांनी आपल्याच कार्यकर्त्यांचा विश्वास गमावला आहे.

४. जनतेने नाकारलेले निराधार: ज्यांना निवडणुकीत जनतेने मते नाकारली आहेत.

५. संस्कार विसरलेले निराधार: आपल्या जन्मदात्यांचे (हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे) संस्कार विसरून राजकारण करणाऱ्यांचा हा समूह आहे.

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उबाठा गट आणि भाजपमध्ये वाकयुद्ध रंगात आले आहे. उबाठा गट मुंबईत ठिकठिकाणी मेळावे घेऊन शिवसैनिकांना संघटित करण्याचा प्रयत्न करत असतानाच, भाजपने त्यांच्या या प्रयत्नांना ‘निराधार’ ठरवून मोठी कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख