Tuesday, September 17, 2024

बदलापूर घटनेवर बावनकुळेंचा संताप; पवार-ठाकरे-काँग्रेसला राजकारणाचा त्यांना लखलाभ

Share

अमरावती : बदलापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला शोकाकुल केले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने राज्यभर ‘जागर जाणिवेचा’ अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या अभियानाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सहभागी झाले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बदलापूरच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि अशा संवेदनशील घटनांवर राजकारण करू नये, असे आवाहन केले.

यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “काही दिवसांपूर्वी बदलापूर येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे, समाजमन दुखावणारी आहे. संपूर्ण महाराष्ट्राची जनता बदलापूरच्या घटनेतील परिवारासोबत आहे. आमच्या सर्वांच्या संवेदना कुटुंबियांसोबत आहेत. अशा घटना महाराष्ट्रात घडू नयेत यासाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रभर ‘जागर जाणिवेचा’ हे अभियान राबवत आहे. संपूर्ण समाजात जनजागृती करून महाराष्ट्रात अश्या घटना होऊ नयेत याकरिता सर्वांना सोबत घेतले पाहिजे. हि घटना राजकारणाचा विषय होऊ शकत नाही, अत्यंत संवेदनशील विषय आहे त्यामुळे आम्ही सर्व, सरकारकडे मागणी करीत आहोत, आम्ही अशा घटनांना राजकीय रंग देऊ इच्छित नाही. शक्य तितक्या लवकर सरकारने सर्व अधिकार वापरून या घटनेतील दोषी असलेल्याला अत्यंत तातडीने फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे याकरिता आम्ही सरकारकडे पाठपुरावा करतो आहेत. जे जे काही पक्ष म्हणून सामाजिक जबाबदारी म्हणून आम्हाला करायचं आहे ते आम्ही निश्चितपणे करत आहोत. या घटनेला शेवटपर्यंत माघे लागून आरोपीला प्रचंड शासन झालं पाहिजे याकरता आम्ही काम करत आहोत,” असे ते म्हणाले.

तसेच त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही टीका केली आणि अशा संवेदनशील घटनांवर राजकारण करू नये, असे आवाहन केले. ते म्हणाले, “पवार-ठाकरे-काँग्रेसला त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ आहे. मलाही सून, मुलगी, नातं आहे त्यांनाही मुलगी, नातं आहे त्यामुळे अश्या घटनेला राजकीय घटना म्हणून पाहू नये, राजकारण करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये खूप विषय आहेत. ह्या घटनेत ज्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपण बोलतो आहेत त्या कुटुंबाचा तरी विचार केला पाहिजे, सर्वपक्षीय, १४ कोटी जनता म्हणून आपण काय ताकत देता येईल याकडे पहिले पाहिजे, पण प्रत्येक गोष्टीचे राजकारण करू नये. महाराष्ट्रात त्यांच्याही काळात खूप साऱ्या घटना घडल्या पण आम्ही सर्वांनी सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहिलो, आम्ही विरोधी पक्षात होतो, अश्या गंभीर घटनेमध्ये पाठीशी उभे राहिलो. सरकारच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे अन अश्या गंभीर घटना होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. मला वाटत कोणीही अश्या प्रकारच्या घटनेमध्ये राजकारण करू नये,” असे आवाहन केले.

अन्य लेख

संबंधित लेख