छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर मविआकडून सरकारचा निषेध केला जातोय याबाबत महसुलमंत्री राधाकृष्ण विखेंना विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, “सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. यावरून विरोधकांनी राजकारण सुरु केलं आहे. हि त्यांची दिवाळखोरी आहे. यातून महाराष्ट्राच्या अस्मितेला तडे जात आहे,” असं वक्तव्य भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केलंय.
विखे पाटील म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण करणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नौदलानं उभारला होता. नौदलाकडून पुतळ्यासंदर्भामध्ये निकष पडताळून पाहण्यासाठी चौकशी समितीची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र त्यांना नौदलावरच विश्वास आहे की नाही? हा प्रश्न आहे. घडलेली घटना दुर्दैवी आहे. मात्र त्याबाबत केलं जाणार राजकारण हे उचित नसल्याचे देखील विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
- महायुतीच्या नेत्यांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक; शपथविधी आणि मंत्रिमंडळ वाटपावर चर्चा?
- पुणे : शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्च 2025 पर्यंत सुरू होणार
- महायुतीच्या दिल्लीतील बैठकीत अमित शाह यांच्यासोबत काय चर्चा झाली! एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं
- उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याचे प्रायश्चित्त भोगावे लागेल – रामदास कदम
- बच्चू कडूंनी विश्वासघात केला, महायुतीत समावेश नको – राधाकृष्ण विखे पाटील