मुंबई : मुंबईतील सागर या आपल्या शासकीय निवासस्थानी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी ‘वीर बालदिवस’ (Veer Bal Diwas) निमित्ताने साहिबजादे बाबा जोरावार सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.यावेळी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
भारतात दरवर्षी २६ डिसेंबर रोजी ‘वीर बाल दिवस’ साजरा केला जातो. हा दिवस शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंह यांच्या चार धैर्यवान पुत्रांच्या असामान्य शौर्य आणि बलिदानाच्या स्मरणार्थ समर्पित आहे. विशेषतः गुरुजींचे दोन सुपुत्र, जोरावर सिंह आणि फतेह सिंह, यांच्या अतुलनीय त्यागाला आदरांजली म्हणून हा दिवस पाळला जातो.