भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी अमली पदार्थ (Drugs) तस्करी प्रकरणात काँग्रेसच्या (Congress) एका प्रमुख नेत्याच्या सहभागावर जोरदार टीका केली. म्हणाले की, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशाला ‘नशा मुक्त भारत’ बनवण्याचा कटिबद्ध आहे, तर दुसरीकडे काँग्रेस पक्ष देशातील तरुणांना अंमली पदार्थांच्या अंधाऱ्या दुनियेत घेऊन जाऊ इच्छित आहे.
‘एक्स’ सोशल मीडियावर काँग्रेस नेत्याच्या काळ्या कारनाम्यावर भाष्य करताना शाह यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे, एकीकडे ‘नशा मुक्त भारत’ घडवण्यासाठी मोदी सरकार शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबत आहे. त्याचवेळी, दुसरीकडे उत्तर भारतातून जप्त करण्यात आलेल्या ५६०० कोटी रुपयांच्या ड्रग्जच्या खेपेत काँग्रेसच्या एका प्रमुख व्यक्तीचा सहभाग अत्यंत धोकादायक आणि लज्जास्पद आहे.
काँग्रेसच्या कारनाम्यावर चिंता व्यक्त करताना केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले की, काँग्रेसच्या राजवटीत पंजाब, हरियाणा आणि संपूर्ण उत्तर भारतातील तरुणांची ड्रग्जमुळे झालेली अवस्था सर्वांनी पाहिली आहे. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे सरकार युवकांना खेळ, शिक्षण आणि नवनिर्मितीकडे घेऊन जात आहे, तर काँग्रेस तरुणांना अंमली पदार्थांच्या अंधाऱ्या दुनियेत घेऊन जाऊ इच्छित आहे.
आपल्या राजकीय प्रभावाने तरुणांना ड्रग्जच्या दलदलीत लोटण्याचे पाप मोदी सरकार कधीही करू देणार नाही, असे अमित शाह म्हणाले. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अंमली पदार्थांची संपूर्ण व्यवस्था नष्ट करून ‘नशा मुक्त भारत’ निर्माण करण्याचा संकल्प करत आहे. मोदी सरकारमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांवर त्यांची राजकीय ‘पोझिशन’ किंवा ‘स्टेट’ विचारात न घेता कारवाई केली जाते.