Sunday, November 23, 2025

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी देवेंद्र फडणवीसांवर वापरले अत्यंत खालच्या पातळीचे अपशब्द; मेघना बोर्डीकरांनी उघड केले काँग्रेसचे ‘गल्ली ते दिल्ली’चे नैराश्य!

Share

पाथरी : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याबद्दल केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील आणि अमर्याद टीकेमुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. पाथरी येथील जाहीर सभेत बोलताना, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी फडणवीस यांना “जाती-पातीचे भांडण लावणारा सर्वांत मोठा आका” आणि महाराष्ट्रातील सर्वांत मोठा दरिंदा असे अत्यंत अपमानजनक अपशब्द वापरले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी (Meghna Bordikar), काँग्रेस पक्ष ‘नैराश्यात’ असल्याची टीका केली आहे. “गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस पक्षाला जनतेने नाकारले आहे, याच नैराश्यातून त्यांनी पाथरीमध्ये कशाला कशाचा संबंध नसताना देवेंद्रजींबद्दल अमर्याद विधाने केली,” असे त्यांनी स्पष्ट केले.

विकास हेच फडणवीस यांचे प्रमाण
“देवेंद्रजींबद्दल नेहमीच खालच्या पातळीची टीका झाली असली तरी, त्यांनी फक्त आणि फक्त राज्याचे हित आणि राज्यातील जनतेचे हित हेच प्रमाण मानले. त्यांनी सातत्याने राज्याच्या विकासासाठी काम करणे कधीही सोडले नाही. जनतेने वेळोवेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

“जनतेने नेहमीच तिसऱ्यांदा देवेंद्रजींवर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्णय घेतलेला आपण सर्वांनी बघितला आहे. सपकाळजींचा हा प्रयत्न जाती-पातीचे राजकारण करत, काहीतरी घाणेरडे स्टेटमेंट देत मीडियाच्या प्रकाशझोतात राहण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, हे जनता चांगली जाणून आहे.” येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनता काँग्रेसला पुन्हा एकदा त्यांची जागा दाखवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

“येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फक्त आणि फक्त ‘देवभाऊंना” महाराष्ट्रातील जनता पसंत करणारे,” असे म्हणत मेघना बोर्डीकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त केला.

अन्य लेख

संबंधित लेख