Monday, December 2, 2024

दुष्काळी भागाची चिंता मिटणार; देवेंद्र फडणवीस ‘नदी जोड प्रकल्पांना’ देणार गती

Share

कृषी क्षेत्रा मध्ये महाराष्ट्राने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रामध्ये विविध पिकं घेतली जातात या मध्ये प्रामुख्याने ऊस, कापूस, केळी, ज्वारी, बाजरी, डाळिंब, संत्रा, सोयाबीन, तांदूळ, वाटाणा, कांदा, फळे आणि भाजीपाला यासह विविध प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते.

मात्र, महाराष्ट्रातील विविध भागाना पाण्याअभावी विविध समस्यांना सामोरे जावे लागते या मध्ये प्रामुख्याने सिंचनाविषयी समस्या जास्त असतात त्याच बरोबर सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांचा सामना करावा लागतो. या सर्व अडचणीं दखल घेत या समस्यांशी सामना करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नदी जोड प्रकल्पांना गती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे

दरम्यान, राज्यातील सिंचनाची समस्या सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे नेहेमीच कटिबद्ध राहिले आहेत . 2019 मध्ये त्यांनी नदी जोड प्रकल्पासाठी गुजरातकडून मदत घेण्यास नकार दिला होता. हा प्रकल्प महाराष्ट्र स्वतंत्रपणे पूर्ण करेल असे त्यांनी सांगितले होते. मात्र, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर या प्रकल्पाची प्रगती मंदावली होती.

मात्र आता देवेंद्र फडणवीसांनी सिंचनाची समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेतलाय. त्यामुळे आता महाराष्ट्रातील सिंचन समस्या लवकर दूर होईल असा विश्वास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळाला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख