पुणे : विरोधकांना वक्फशी देणंघेणं नाही तर त्यांना केवळ वक्फच्या जमिनी लाटायच्या आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) विरोधकानावर केला आहे. देवेंद्र फडणवीस सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना काँगेसवर हल्लाबोल केला. वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) मनमानीला चाप लावण्यासाठी गुरूवारी संसदेत ‘वक्फ’ सुधारणा विधेयक मांडण्यात आले. मात्र, विरोधकांकडून या विधेयकाला विरोध करण्यात येत आहे.
“मागच्या काळात महाराष्ट्रात वक्फचा घोटाळा झाला. यावेळी वक्फच्या जमिनी कोणी लाटल्या, त्यात काँग्रेसचे कोणते नेते होते, हे सगळ्यांनी पाहिलं आहे. त्याचा अहवालही समोर आला आहे. विरोधकांना वक्फशी काहीही देणंघेणं नाही. तर त्यांना त्या जमिनीशी देणंघेणं आहे. त्या जमिनी कशा लाटता येतील हा त्यांचा प्रयत्न आहे,” असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
“या विधेयकामुळे पारदर्शकता येणार होती. त्यामुळे जमिनी लाटणाऱ्यांना याची अडचण होणार होती. वक्फचा कारभार असाच सुरु राहावा जेणेकरून त्यांना जमिनी लाटता येईल, असं विरोधकांना वाटतं. त्यामुळे त्यांनी त्याचा विरोध केला. पण हे विधेयक समितीकडे आहे आणि त्यावर योग्य निर्णय होईल,” असेही ते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
- वोकिझम-उपभोगवाद विरुद्ध धर्म-संवादच उत्तर : डॉ. भागवत
- ‘३१ ऑगस्ट – भटके विमुक्त दिवस’ – एक सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस
- भारताला विश्वगुरू बनविण्याला संघाचा शतकोत्तर प्रवास समर्पित – सरसंघचालक मोहन भागवत
- कोकणवासीयांसाठी खुशखबर! मुंबई-कोकण सागरी प्रवासी वाहतूक लवकरच सुरू होणार
- अंबाजोगाईमध्ये १,१५० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय होणार