Thursday, October 10, 2024

लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांच्या प्रचारसभा. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

Share

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात तसेच देशातील सर्वच मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे. सर्व प्रमुख नेते आपापल्या परीने मतदारांना पक्षाची भूमिका समजावून सागंण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

महाराष्ट्रातील रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेससह राज्यातील इतर राजकीय पक्षाने प्रचाराची रणधूमाळी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात सहा सभा घेतल्या. कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची नुकतीच कोल्हापुरात सभा झाली. या सभेत शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला. इचलकरंजीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा पार पडली. राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय आरोप-प्रत्यारोपाबरोबरच मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.

गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने सेवा सुशासन आणि गरिबांच्या कल्याणाला कटिबद्ध राहत भारताला जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवलं! आता विकसित भारत घडवण्याच्या दृष्टीने आणि तिसऱ्या टर्ममध्ये तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठीचे हे संकल्प पत्र! आणि संकल्प पूर्ण करण्याची मोदींची गॅरंटी अशी भूमिकी भाजपाकडून घेतली जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात आहे. सांगलीत त्यांची जाहीर सभा झाली. यावेळी योगी आदित्यनाथ यांवी काँग्रेसवर टीका केली आहे. सांगली लोकसभेतील भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा झाली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर आणि महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी यांची उपस्थिती होती. या सभेत योगी आदित्यनाथ यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

काँग्रेसने राम मंदिराची उभारणी का केली नाही? आम्ही छेडणार नाही आणि सोडणारही नाही. राम मंदिराच्या उभारणीमुळे खुनाचे पाट वाहतील असे विरोधक बोलत होते. मात्र राम मंदिराच्या उभारणीमुळे एक मच्छर देखील मरणार नाही, हा विश्वास देतो. असे योगी आदित्यनाथ यांना प्रचारसभेला संबोधित करताना सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी बेळगावच्या निपाणी येथे आयोजित इंडिया आघाडीच्या विजय संकल्प सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

काँग्रेसच्या हातात राज्य गेल्यानंतर लोकांच्या हिताचे हे निर्णय घेतले व राबवले नुसती घोषणा केली नाही. मोदींच्या राजवटीमध्ये एकही निर्णय राबवला जात नाही, फक्त भाषणं केली जातात व विरोधकांवर टिका-टिप्पणी केली जातात. अशी टीका त्यांनी केली.

विविध राजकीय पक्ष आपापल्या मतदारसंघात मतदारांशी प्रत्यक्ष भेटीचे कार्यक्रमही आयोजित करत आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख