Tuesday, September 17, 2024

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी येणार

Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत येत्या ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

येत्या गुरुवारी ५ सप्टेंबरला सकाळी ९,३० वाजता श्री क्षेत्र जेजुरी  येथील अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडेरायाचे दर्शन ते घेणार आहेत. यावेळी श्री मार्तंड देव संस्थानच्या  विश्वस्त मंडळातर्फे सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्वागत करण्यात येणार आहे.  जेजुरी गडावरील द्वादश मल्हार दर्शन सृष्टीचे  भूमिपूजन आणि कोनशिला उद्घाटन डॉ. भागवत यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर पुणे शहरात काही अंतर्गत बैठका आणि फक्त निमंत्रितांसाठी असणाऱ्या दोन जाहीर कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख