Monday, December 22, 2025

कोकणवासीयांसाठी खुशखबर! मुंबई-कोकण सागरी प्रवासी वाहतूक लवकरच सुरू होणार

Share

मुंबई : मुंबई (Mumbai) येथून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणाऱ्या सागरी प्रवासी वाहतूक मार्गास मान्यता मिळाली आहे. कोकणवासीयांसाठी प्रथमच सुरू होणारी ही सेवा क्रांतिकारी ठरणार असल्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी व्यक्त केले.

माझगाव येथील भाऊचा धक्का येथे ‘एम टू एम प्रिन्सेस’ या रो-रो कंपनीच्या प्रवासी वाहतूक सेवेच्या पूर्वतयारीची पाहणी मंत्री राणे यांनी केली. ते म्हणाले, “या सागरी मार्गामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यासाठी ३ तास, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ ते ६ तास लागतील, ज्यामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होईल. केंद्र आणि राज्य सरकारच्या परवानग्या मिळालyanंतरच ही सेवा सुरू होत आहे. यापुढेही आणखी कंपन्या या मार्गावर सेवा देण्यासाठी पुढे येत आहेत.

”यावेळी राणे यांनी ‘एम टू एम प्रिन्सेस’ या प्रवासी बोटीची पाहणी केली. समुद्री वातावरण तपासणीसह आवश्यक तयारी पूर्ण झाल्यावर ही सेवा लवकरच सुरू होईल, अशी माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली.

अन्य लेख

संबंधित लेख