Wednesday, November 27, 2024

खड्डा पडलेला रस्ता खाजगी मालकीचा, पुण्याला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव : मुरलीधर मोहोळ

Share

पुणे, महाराष्ट्र : पुण्याला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव आहे अशी टीका मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी केली आहे. नुकत्याच घडलेल्या पुणे (Pune) शहरातील लक्ष्मी रोडवरील ट्रकच्या घटनेबाबत नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यमांशी सवांद साधून स्पष्टीकरण देत विरोधकांवर टीका केली आहे.

मुरलीधर मोहोळ म्हणाले कि, “हा रस्ता महानगरपालिका किंवा राज्य सरकारचा नव्हता. तो एक खाजगी जागा होता जिथे सुमारे 100 वर्षांपूर्वी एक विहीर होती. नंतर विहीर झाकली गेली. एक अवजड वाहन तिथे जाऊन ते विहिरीत पडले, परंतु, सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्याला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव आहे अशी टीका मुरलीधर मोहोळ यांनी केली. हा रास्ता भाजपच्या काळात झालेला आहे असं म्हणत असं सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्याला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव आहे. हे एकदम चुकीचं आहे वस्तुस्थिती वेगळी होती आणि दाखवल वेगळं गेलं जे झालं ते अत्यंत चुकीचं झालंय असं ते म्हणाले. झालेल्या घटनेचा तपास हा केला जाईल असं पण ते म्हणाले.

पुणे शहरातील लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारातील रस्त्यावर अचानक पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडमध्ये पुणे महापालिकेचा ट्रक आणि दुचाकी ४० फुट खोल खड्ड्यात पडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यामुळे घटनास्थळी नागरिकांची पाहण्यास गर्दी झाली होती. चार तासांच्या प्रयत्नांनंतर दोन क्रेनच्या मदतीने अग्निशामक दलाच्या अधिकार्‍यांना ट्रक आणि दुचाकी काढण्यात यश आले.

खड्डा पडलेल्या भागाची पाहणी केल्यावर विहिरीच्या खुणा दिसत आहे. काही वर्षांपूर्वी त्या जागेवर बांधकाम करून त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले होते. आज त्याच जागेवर ट्रक थांबविण्यात आला होता आणि त्या ट्रकचे वजन अधिक असल्याने पेव्हर ब्लॉक खचले अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अन्य लेख

संबंधित लेख