Friday, October 9, 2026

दहशतवादाला खरंच धर्म नसतो?

Share

शिवानी शिंदे यांच्या इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे ( NB english –  Document shared with you: ‘Remember the much-discussed dialogue from Shah Rukh Khan’s My Name Is Khan the repeated idea that being Muslim does not make someone a terrorist ).  कॅप्टन स्मित अलौकिक धैर्य आणि पराक्रम दाखवून विमान प्रवाशांचे प्राण वाचविल्यानंतर अनेक प्रकारच्या…. चर्चा चालू झाल्या आहेत. मात्र, यातून जे मूळ प्रश्न निर्माण होतात, त्यांची उत्तरे शोधली जाणार की नाही? की त्या उत्तरांचा शोध नेहेमीप्रमाणेच अपुरा राहणार…

……

शाहरुख खानच्या ‘माय नेम इज खान’ मधील तो बहुचर्चित संवाद आठवा, ज्यात मुस्लिम असल्यामुळे कोणी दहशतवादी होत नाही, हा विचार वारंवार मांडला गेला होता. हेच कथानक ‘न्यू यॉर्क’ चित्रपटातही पाहायला मिळाले, जिथे एक पाऊल पुढे जाऊन मुस्लिमांना प्रामुख्याने पीडित म्हणून दाखवण्यात आले आणि इस्लाम व दहशतवाद यांचा काहीही संबंध नाही, हा संदेश अधोरेखित करण्यात आला. दोन्ही चित्रपटांमधील मुख्य कथानक स्पष्ट होते : सामान्य मुस्लिमांची ओळख दहशतवाद्यांच्या कृत्यांपासून वेगळी करणे आणि मुस्लिम समाजाला संशय व भेदभावाचा बळी म्हणून सादर करणे. ठीक आहे. आपण आता बऱ्याच बाबी समजावून घेऊया…

जेव्हा जेव्हा एखादा दहशतवादी हल्ला होतो; तेव्हा काही आवाज हल्लेखोरावरून लक्ष हटवून मुस्लिमांना पीडित म्हणून दाखवण्याची घाई करतात. यातल्या धार्मिक कोनाकडे दुर्लक्ष करणे हा अनेकदा सोयीचा भाग असतो.

नुकताच एका भारतीय वैमानिकाच्या अलौकिक शौर्यामुळे, धाडसामुळे, पराक्रमामुळे आणि समयसूचकतेमुळे ९/११ सारखा भयंकर विमान अपघात टळला. अर्थातच, अशा घटनांना अपघात न म्हणता दहशतवादी हल्लाच म्हणायला हवे. ही घटना तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या फ्लाइट (FZ1073) मध्ये घडली. ओमानी असणाऱ्या एका सुन्नी मुस्लिम सह-वैमानिकाने त्याचा भारतीय सहकारी आणि या विमानाचा मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित मच्छरा यांच्यावर हल्ला केला आणि विमान अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र,  गंभीर जखमी असूनही कॅप्टन मच्छरा यांनी लढा दिला, आणि क्रू मेंबर्स व प्रवाशांच्या धाडसी मदतीमुळे, त्या सह-वैमानिकाला यशस्वीपणे ताब्यात घेण्यात आले.

काही प्रवाशांनी नंतर दिलेल्या माहितीनुसार, कॉकपिटमधील हिंसक झटापटीच्या काळात हा ओमानचा सह-वैमानिक ‘अल्ला हूँ अकबर’ असे ओरडताना ऐकू येत होते. FZ1073 या फ्लाइटमध्ये १७४-१८० प्रवासी होते. ते बहुतांश इस्रायली होते. दुबईहून तेल अवीवला जात होते.

या एका गंभीर आणि अयशस्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही, काही पाश्चात्य माध्यमांनी या घटनेचे गांभीर्य कमी करून त्याला केवळ एक ‘घटना’ म्हटले किंवा विमानाचा मार्ग ऐनवेळी बदलण्याच्या घटनेवर लक्ष केंद्रित केले. अनेकांनी तर सह-वैमानिक ओमानचा होता किंवा तो मुस्लिम होता, याचा उल्लेखही केला नाही. ‘दहशतवादाला धर्म नसतो,’ हे पालुपद वापरून अशा घटनांचे वार्तांकन केले जाते किंवा त्याच्याकडे असे पाहिले जाते. या सगळ्या माध्यमांना ज्या प्रकारे नरेटिव चालवायचे असते त्यात असा बोटचेपेपणा बरोबर बसतो. आरफा खानम, राजदीप सरदेसाई किंवा ध्रुव राठी यांसारख्या लोकांनी सोशल मीडियावर या वैमानिकाचा धर्म वगळून किंवा त्याबद्दल काहीही स्पष्ट न म्हणता पोस्ट करण्यास सुरुवात केली तर आश्चर्य वाटायला नको.

अनेक आंतरराष्ट्रीय इन्फ्लुएंसर्सनी तर हे आधीच सुरू केले आहे.

हे लक्षात घेतले तर या प्रसंगाकडे केवळ भारतीय दृष्टिकोनातून न पाहता जागतिक संदर्भात पाहिले पाहिजे. गेल्या दोन दशकांतील काही प्रमुख दहशतवादी हल्ल्यांकडे लक्ष द्या :

 ९/११, २००५ चे लंडन बॉम्बस्फोट,

नोव्हेंबर २०१५ चे पॅरिस हल्ले,

२०१६ चे ब्रसेल्स बॉम्बस्फोट,

जुलै २०१६ चा नॉर्मंडी चर्चवरील हल्ला

आणि ७ ऑक्टोबर २०२३ चा इस्रायलवरील हल्ला.

हे हल्ले इस्लामी अतिरेकी संघटनांनी किंवा कडव्या इस्लामप्रेमी दहशतवाद्यांनी केले आहेत.

युरोपियन एकीकरण आणि मुक्त बाजार अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करणारी फ्रेंच थिंक टँक ‘फोंडापोल’ (Fondapol) च्या मते, १९७९ ते एप्रिल २०२४ दरम्यान जगभरात ६६,८७२ इस्लामी दहशतवादी हल्ल्यांची नोंद झाली आहे. यात किमान दोन लाख ४९ हजार ९४१ लोकांचा मृत्यू झाला आहे. युरोपियन युनियनमध्ये फ्रान्सला इस्लामी दहशतवादाचा सर्वाधिक फटका बसला आहे. फ्रान्समध्ये १९७९ ते एप्रिल २०२४ दरम्यान त्यांच्या भूमीवर ८५ हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये किमान ३३४ लोक मारले गेले.

जगात एकूण धर्म, पंथ, संप्रदाय आहेत. त्यापैकी केवळ एकच धर्म ९६ टक्के दहशतवादी हल्ल्यांसाठी जबाबदार आहे. तो धर्म म्हणजे इस्लाम.

ही आकडेवारी इस्लामी दहशतवादाचे रूप दर्शवत असेल, तर डाव्या विचारांच्या माध्यमांचा काही भाग धार्मिक आणि वैचारिक पैलूंवर चर्चा करण्यास का कचरतो?

जेव्हा एखाद्या इस्लामी दहशतवाद्याला अटक केली जाते, तेव्हा काही माध्यमे गुन्ह्यावरून लक्ष हटवून त्या व्यक्तीच्या वैयक्तिक गोष्टींकडे वळवतात. ज्या परिस्थितीमुळे त्याने शस्त्र उचलले त्याकडे अत्यंत भावनिक रीतीने लक्ष दिले जाते. उदाहरणार्थ, बुऱ्हाण वानीचे वर्णन अनेकदा एक तरुण विद्यार्थी असे केले जाते. लेखांमध्ये त्याच्या पार्श्वभूमीचे आणि वैयक्तिक प्रवासाचे विश्लेषण केले जाते. त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचे हे प्रयत्न असतात. जेव्हा एखादा दहशतवादी मारला जातो तेव्हाच मानवतावादाला उकळी येते आणि तसे मथळे दिले जातात. मात्र, शेकडो निष्पाप नागरिक मुस्लिम दहशतवादाचे बळी ठरतात, तेव्हा यांचा मानवतावाद मुका होतो. ढोंगीपणाचा हा कळस आहे.

झोहरान ममदानी यांनीही ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील धार्मिक पैलूचे गांभीर्य कमी करत जगातील मुस्लिमांना पीडित म्हणून दाखवण्याकडे लक्ष वळवले आहे. त्यांनी त्यांच्या काकूचे उदाहरण देताना सांगितले की, ९/११ नंतर त्यांनी सबवेने प्रवास करणे थांबवले कारण हिजाब घातल्यामुळे त्यांना असुरक्षित वाटत होते. म्हणजे, न्यू यॉर्कवरचा हल्ला दूरच राहिला. सहानुभूती मिळविण्याचा मात्र आटोकाट प्रयत्न केला जातो.

दुर्दैवाने, हे असले युक्तिवाद केवळ गुन्ह्याचे गांभीर्य कमी करण्यापुरते मर्यादित राहत नाही. अजमल कसाब, अफझल गुरू आणि टायगर मेमन यांसारख्या दहशतवाद्यांचा समावेश असलेल्या प्रकरणांमध्ये याचिका केल्या जातात. अपरात्री न्यायालयांचे दरवाजे उघडले जातात. प्राणघातक हल्ल्यांतील आरोपी किंवा दोषी हे तातडीच्या अपिलांचा आणि मध्यरात्रीच्या न्यायालयीन कामकाजाचा विषय बनतात. हे सगळे का केले जाते आणि कोण करते, याचा मुळातूनच विचार करण्याची गरज आहे.

अजूनही, कॅप्टन स्मितवर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या ओमानच्या मुस्लिम सह-वैमानिकाची ओळख दडवायचे प्रयत्न चालूच आहेत. बातम्यांनी त्याची ओळख ओमानचा नागरिक म्हणून केली आहे, परंतु तपास सुरू असताना त्याचे नाव आणि इतर वैयक्तिक तपशील उघड केले गेलेले नाहीत. काही वृत्तपत्रांनी तर त्याला दहशतवादी म्हणण्यास नकार दिला आहे. हा ढोंगीपणा का?

दहशतवाद आणि धर्म यांचा खोलवर संबंध आहे, आणि जगभरातील प्रमुख दहशतवादी हल्ल्यांमध्ये इस्लामी अतिरेकाचा वाटा खूप मोठा आहे. इस्लामिक धर्मग्रंथांमध्ये ‘काफिरां’च्या (अश्रद्ध) विरुद्ध युद्धाची चर्चा करणाऱ्या आयती आहेत आणि इस्लामी अतिरेकी गटांनी हिंसाचाराचे समर्थन करण्यासाठी अशा उताऱ्यांचा वारंवार हवाला दिला जातो. ही ताजी घटना आणखी एक इस्लामी दहशतवादी हल्ला होता. भारतीय वैमानिक आणि क्रू यांनी तो उधळून लावला.

… आणि या पराक्रमी भारतीय वैमानिकाचे आभार मानूया. जर यात काही दुर्घटना घडली असती, तर पाश्चात्य माध्यमांनी आणि भारतीय डाव्यांनी भारताला, भारतीयांना दोष देताना कोणतीही कसर सोडली नसती. विकृत बातम्यांचा पूर आला असता. खोटेनाटे पसरविले गेले असते. आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने, या वैमानिकाने जबरदस्त लढा दिला, क्रूने हस्तक्षेप केला. शूर प्रवासी पुढे आले. एका धर्मातील विकृताला इतर दोन धर्मातील शहाण्या माणसांनी नेस्तनाबूत केले. हे लाक्षणिक आहे आणि उद्या जगभरात हेच झाले तर नवल वाटायला नको.

अन्य लेख

संबंधित लेख