Tuesday, December 3, 2024

एक महाराष्ट्र – श्रेष्ठ महाराष्ट्र

Share

पुरोगामी महाराष्ट्राची संपूर्ण जगात ज्ञान विज्ञान ते सांस्कृतिक क्षेत्रा मधील प्रगत व पुढारलेले राज्य म्हणून ओळख आहे आपल्या पूर्वजांनी कठीण परिश्रम तथा रक्त सांडवून किंवा वेळ प्रसंगी रक्ताचा अभिषेक करून महाराष्ट्राची ओळख निर्माण केली आहे. तसेच शक्तिशाली महाराष्ट्राचा इतिहास नेहमी मराठा शब्दा भोवती फिरत असतो मराठा शब्दाला जगात फार मोठा मान सन्मान सुध्दा आहे कारण महाराष्ट्राच्या भूमीवर छत्रपती शिवरायांच्या भगव्या ध्वजा खाली हिंदवी किंवा मराठा साम्राज्या साठी घरा घरातील अठरा पगड जाती व बारा बलुतेदार समाजाचा प्रत्येक माणूस मराठा म्हणुनच लढला आहे परकीय शक्तीच आक्रमण,अन्याय,अत्याचार विरुद्ध यशस्वी पणे लढून विजयी सुध्दा झालेला आहे. तसेच छत्रपती शिवरायांचे हिंदवी साम्राज्य जरी मराठा साम्राज्य असले तरी शिवरायांच्या मराठा साम्राज्य साठी तलवारी चालविणारे असंख्य हात तथा रक्त सांडणाऱ्या असंख्य वज्रमुठी तथा मराठा साम्राज्याचा विस्तार व साम्राज्याच्या सीमा विस्तार करणारे हात बारा बलुतेदार व अठरा पगड जातीच्या मावळयांचे होते परंतू गेल्या वर्षां पासून छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी राजे यांनी एकतेचा सूत्रात बांधून ठेवलेल्या भूमीवर मराठा आरक्षणाच्या नावा खाली तालिबान समर्थक सज्जाद नोमनी सोबत अनैसर्गिक युती करण्याचा प्रयत्न झालेला आहे पण अचानक मराठा आरक्षणाचे केंद्र बिंदू असलेल्या अंतरवाली सराटी येथून निवडणूकीच्या रिंगण मधुन माघार घेऊन सामाजिक गोंधळ, जातीय तणाव निर्माण करण्या साठी पाडापाडीच्या राजकारणची घोषणा करण्यात आली आहे या पाडापाडीच्या राजकारणा मुळे सामाजिक कटुता निर्माण होईल तसेच राजकीय पाडापाडीच्या घोषणे मागे कोण आहे कोणत्या अदृष्य शक्ती कार्यरत आहेत संपूर्ण महाराष्ट्राला माहितच आहे पण मराठा आरक्षण व आरक्षणाच्या अवास्तव मागण्या करून विधान सभा निवडणुकीत महाराष्ट्राची सामाजिक वीण पाडापाडीचा प्रयोग करून विस्कटीत करण्यात येत आहे काही अदृष्य शक्ती महाराष्ट्रचा पंजाब, मणिपूर करून विकास थांबविण्याचा षडयंत्र करीत आहेत हे लक्षात घेतले पाहिजे तसेच देशातील ज्या ज्या राज्यात काही आंदोलन करून सामाजिक एकतेला तडे दिले गेले किंवा फूट पाडून वेगवेगळी आंदोलन ऊभी केली ते ते राज्य पिछाडीवर गेले आहे तेथील विकस थांबला आहे त्यामुळे महाराष्ट्राचे होत असलेल पाडापाडीचे राजकारण पाहता सज्जन शक्तींनी सुरू असलेले षडयंत्र ओळखून “एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र” साठी सजग होण्याची आवश्यकता आहे

पंजाब पेक्षा मध्य प्रदेश पुढे का गेला ?
प्रगत महाराष्ट्र प्रमाणे देशातील पंजाब,राजस्थान,आसाम प्रगतशिल राज्य होती. पंजाब महाराष्ट्रा प्रमाणे लढवय्या व अन्नधान्य निर्माण मध्ये आणि वाहतूक मध्ये फारच पुढारलेले राज्य होते संपूर्ण देशात पंजाबचा गहू आणि देशातील राष्ट्रीय तथा राज्य महामार्गावर पंजाब मधील ट्रक दिसत असत पण चार पाच दशका पूर्वी पंजाब मधील शीख समाजात वेगवेगळे संभ्रम निर्माण करून तसेच तरुणा व्यसनाधीनता निर्माण करून खलिस्तान चळवळ उभी करण्यात आली खोट्या प्रचाराला व षडयंत्राला तेथील समाज बळी पडला आणि आज पंजाबचा विकास थांबला आहे गेहु उत्पादन पिछाडी तथा राष्ट्रीय मार्गा वरील वाहतूक ट्रक सुद्धा कमी झाली आहे मध्य प्रदेश राज्याने पंजाबला पिछाडीवर टाकत गेहू उत्पादन मध्ये आघाडी घेतली आहे मध्य प्रदेशा मधील विकास लक्षात कारण मध्य प्रदेशाने फुटीरवादी चळवळी किंवा कोणाच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या आरक्षण मागणीच्या आंदोलन चळवळींना थारा दिलेलं नाही तसेच स्थिर सरकार सुध्दा होते मध्य प्रदेश सरकारने केवळ आपल्या राज्याच्या विकासा कडे लक्ष केंद्रित करून विकास साधला आहे आपल्या महाराष्ट्राने पंजाब आणि मध्य प्रदेशाचा धडा घेतला पाहिजे एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र साठी सजग झाले पाहिजे

पंजाब प्रमाणे महाराष्ट्र टार्गेट ?
देशात महाराष्ट्र व पंजाब असे दोन प्रदेश आहेत जेथे छत्रपती शिवाजी महाराज व गुरू गोविंदसिंग यांच्या आदर्शवर चालणारा व जातपात न मानणारा फार मोठा वर्ग आहे दोन्ही राज्यात शिवराय व गुरू गोविंदसिंग यांच्या आदर्शावर लोकशाही पध्दतीने राज्य कारभार चालू शकतो तसेच ज्याप्रमाणे महाराष्ट्र इस्लामी आक्रमका सोबत मोठ्या जिद्दीने लढला त्याच प्रमाणे पंजाब सुद्धा इस्लामी आक्रमका सोबत लढला आहे त्यामुळे दोन्ही राज्यात सामाजिक फूट पाडण्यासाठी अनेक प्रकारच्या षडयंत्राचे प्रयोग सतत करण्यात आले आहेत महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकर पुरोगामी विचारसरणीचा प्रयोग करून विजयाची साक्ष देणारा छत्रपती शिवराय, संभाजी राजे यांचा इतिहास विस्मृत करण्याचा प्रयत्न झालेला आहे पंजाब मध्ये सुद्धा खलिस्तान मागणीचा प्रयोग करून फुटीरवादी शक्ती द्वारे वेगवेगळे आंदोलन उभे करून किंवा तरुणा मध्ये व्यासनधिनतेला प्रोत्साहन देऊन तेथील विकास थांबविला आहे पंजाब प्रमाणे आता महाराष्ट्राला पिछाडीवर आणण्या साठी काही अदृष्य शक्ती कार्यरत असून त्यासाठी राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्यात येत आहे तर कधी जाती पातीच्या नावा खाली वेग वेगळी आंदोलने उभे करून किंवा अवास्तव मागण्या करून समाजात कटुता निर्माण करण्यात येत आहे एकूणच पंजाब प्रमाणे महाराष्ट्रात अराजकता निर्माण करून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू आहे त्यामुळे एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र साठी सजग होणे आवश्यक आहे

एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र
गेल्या काही वर्षांपासून समृध्द व प्रगत महाराष्ट्राची वाट लावण्याचा,महाराष्ट्राचा विकास खुंटीत करण्याचा प्रयत्न काही राजकीय मंडळी करीत आहेत त्यासाठी अवास्तव आरक्षण मागण्या तथा फेक नैरेटीव्ह चालविले जात आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या शक्ती काही अंशी यशस्वी सुद्धा झाल्या आहेत त्याचे परिणाम महाराष्ट्राने अनुभवले आहेत त्यामुळे आता सजग होण्याची आवश्यकता आहे जनता जनार्दन सुद्धा आता चूक करणार नाही किंवा खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही असे संकेत मिळत आहेत कारण जनतेला महाराष्ट्राचा विकास अपेक्षित आहे महाराष्ट्राला भकास करायचा नाही त्यामुळे राजकीय षडयंत्र लक्षात घेत महाराष्ट्राला “एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र” साठी सजग होऊ या हीच काळाची गरज आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

-अशोक राणे अकोला

अन्य लेख

संबंधित लेख