भारतात धर्म परिवर्तन हा नेहमीच एक संवेदनशील आणि वादग्रस्त विषय आहे, विशेषतः जेव्हा धर्मांतर हे फसवणूक, दबाव किंवा प्रलोभनाच्या माध्यमातून घडवले जाते. जून २०२५ मध्ये देशभरात अशा २५ पेक्षा अधिक घटना उघडकीस आल्याने ही समस्या किती गंभीर आहे, याची पुन्हा एकदा जाणीव होते आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटक या राज्यांतील बातम्यांनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल हिंदू समाजाला, मुख्यत्वे दलित, आदिवासी, महिला आणि मुलांना ख्रिश्चन धर्मात ओढलं जात आहे. या धर्मांतरात अनेकदा समाजकार्य, healing prayers अशा भावनिक गोष्टींचा वापर करून धर्मांतर घडवून आणलं जातं. ह्या व्यतिरिक्त पैसे, शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि नोकरीची आश्वासन देत एखाद्या समाजाला त्यांच्या मूळ श्रद्धा आणि परंपरांपासून तोडण्याचा हा प्रयत्न आहे.
धर्मांतराचं हे जाळं भारताच्या सामाजिक एकतेच्या मुळावर घाव घालण्याचा योजनाबद्ध प्रयत्न आहे. यामागे केवळ ‘धर्माच्या नावावर वर्चस्व’ ही आकांक्षा लपलेली आहे, ज्याचा सर्वात मोठा बळी म्हणजे भारताची मूळ संस्कृती आणि हिंदू समाज हे आहेत.
भारतीय संविधानानुसार ऐच्छिक धर्मांतराला संरक्षण आहे, परंतु जबरदस्तीने किंवा फसवणुकीने केलेले धर्मांतर बेकायदेशीर आहे. अनेक राज्यांमध्ये यावर नियंत्रण ठेवण्यासाठी धर्मांतरविरोधी कायदे लागू करण्यात आले आहेत. या कायद्यांचा उद्देश बळजबरी, चुकीची माहिती किंवा भौतिक लाभाच्या आधारे होणारे धर्मांतर रोखणे हाच आहे. या घटनांमुळे हिंदू संघटना आणि स्थानिक समुदायांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, कारण त्यांना यातून देशाचा सांस्कृतिक आणि धार्मिक सलोखा धोक्यात येत असल्याचे वाटते.
जून २०२५ मधील काही प्रमुख घटना
देशभरातून समोर आलेल्या अनेक प्रकरणांपैकी काही प्रातिनिधिक घटना खाली दिल्या आहेत, ज्या धर्मांतराच्या या संघटित कटाचे स्वरूप स्पष्ट करतात:
मध्य प्रदेश: गरिबीचा फायदा घेत धर्मांतराचा प्रयत्न (३० जून)
जबलपूरच्या सुहागी पटेल नगर परिसरात, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी हिलिंग प्रेयर्सच्या नावाखाली गरीब हिंदूंना मोफत औषधे, उपचार आणि आर्थिक मदतीचे आमिष दाखवून धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली.
उत्तर प्रदेश: पैशांचे आमिष आणि हिंदू धर्माचा अपमान (२९ जून)
रायबरेलीच्या बाळापूरमध्ये, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी ४,००० ते ५,००० रुपयांचे आमिष दाखवून अनेक हिंदू गावकरी आणि मुलांना धर्मांतरित करण्याचा प्रयत्न केला. Prayer Meetings मध्ये हिंदू धर्माबद्दल अपमानास्पद टिप्पणीही करण्यात आली. पोलिसांनी राजेश कुमार वर्मा आणि त्यांची पत्नी सोनी वर्मा यांना उत्तर प्रदेशच्या धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत अटक केली आहे.
राजस्थान: हिंदू महिलांच्या धार्मिक भावनांना धक्का (२९ जून)
दौसा जिल्ह्यातील एका चर्चमध्ये, १०० हून अधिक हिंदू महिलांना प्रार्थना सभेसाठी बोलावून त्यांच्या बांगड्या, सिंदूर आणि मंगळसूत्र काढायला लावले आणि त्यांना ‘तुम्ही आता ख्रिश्चन झाला आहात’ असे सांगितले. या सभेत हिंदू देवतांचाही अपमान करण्यात आला. हिंदू संघटनांनी तीव्र विरोध केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
हरियाणा: समर कॅम्पच्या नावाखाली मुलांचे ब्रेनवॉश (२८ जून)
अंबालामध्ये, एका चर्चमध्ये ‘समर कॅम्प’च्या नावाखाली लहान हिंदू मुलांना येशू हाच सर्वश्रेष्ठ देव आहे, अशी शिकवण दिली जात होती. बजरंग दलाने हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली आणि योग्य कारवाईचे आश्वासन दिले.
छत्तीसगड: शाळकरी विद्यार्थ्यांना लक्ष्य (?? जून)
रायपूरमध्ये, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी शाळेजवळ विद्यार्थ्यांना गाठून त्यांना चर्चमध्ये येण्यासाठी पैशांचे आणि चांगल्या शिक्षणाचे आमिष दाखवले. हिंदू देवतांमध्ये कोणतीही शक्ती नाही, असे सांगून त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला गेला. पोलिसांनी या प्रकरणी तीन महिलांना अटक केली आहे.
पंजाब: दलित कुटुंबांना खोटी आश्वासने (२६ जून)
अमृतसरमध्ये, सुमारे २५० दलित हिंदू कुटुंबांना मोफत शिक्षण, आरोग्यसेवा आणि नोकरीची खोटी आश्वासने देऊन ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित करण्यात आले. मात्र, आश्वासने पूर्ण न झाल्याने अनेक कुटुंबे ‘घर वापसी’ करून पुन्हा हिंदू धर्मात परतली आहेत.
या सर्व घटनांचा अभ्यास केल्यास काही समान धागेदोरे स्पष्टपणे दिसतात:
पद्धतशीर लक्ष्य: ख्रिश्चन मिशनरी पद्धतशीरपणे हिंदू समाजातील ‘सर्वात गरीब आणि असुरक्षित घटकांना’ म्हणजे दलित, आदिवासी आणि ग्रामीण भागातील लोकांना लक्ष्य करतात.
फसवणुकीचे प्रकार: ‘हिलींग प्रेयर’, ‘समाजसेवा’, ‘उन्हाळी शिबिर’ किंवा ‘प्रार्थना सभा’ या नावाखाली धर्मांतराचा खरा हेतू काळजीपूर्वक लपवला जातो.
प्रलोभनांचा वापर: पैसा, नोकरी, शिक्षण आणि मोफत वैद्यकीय उपचार ही प्रमुख प्रलोभने आहेत, ज्याचा वापर लोकांच्या असहाय्यतेचा फायदा घेण्यासाठी केला जातो.
मानसिक दबाव: हिंदू देवता आणि परंपरांचा अपमान करून लोकांच्या मनात त्यांच्या धर्माबद्दल संभ्रम, शंका निर्माण केली जाते आणि ख्रिश्चन धर्म श्रेष्ठ असल्याचे भासवले जाते.
यावरून हे स्पष्ट होते की, धर्मांतर हे केवळ काही साध्या घटना नाहीत, तर एका मोठ्या आणि संघटित कटाचा त्या भाग आहेत. अशा प्रकारच्या फसव्या आणि जबरदस्तीच्या धर्मांतरामुळे केवळ व्यक्तींची फसवणूक होत नाही, तर देशाचा सामाजिक आणि धार्मिक सलोखाही धोक्यात येतो आहे. राज्य सरकारांनी धर्मांतरविरोधी कायद्यांची कठोर अंमलबजावणी करणे आणि अशा कृत्यांमध्ये सामील असलेल्यांवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर, समाजात जागरूकता निर्माण करून असुरक्षित घटकांना अशा प्रलोभनांपासून वाचवणे ही देखील काळाची गरज आहे. धार्मिक स्वातंत्र्य आणि शोषणात्मक धर्मांतर यातील फरक समजून घेणे आणि त्याला विरोध करणे हे एका सुदृढ समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.