शब्द वापरण्याबाबत त्यांनी जाणीवपूर्वक विचार केला पाहीजे. आपण कुणाला चोर म्हणतो, कुणाला पाकिटमार म्हणतो, याचा त्यांनी विचार केला पाहीजे. असे विधान छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांना उत्तर देताना सांगितले.
जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचा समाचार घेताना छगन भुजबळ म्हणाले, “डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी याआधीही अनेकदा चुकीच्या शब्दांचा वापर केला होता, ज्यामुळे ते अडचणीत आले होते. हे त्यांनी लक्षात ठेवले पाहीजे. माझा त्यांना सल्ला आहे की, शब्द वापरण्याबाबत त्यांनी जाणीवपूर्वक विचार केला पाहीजे. आपण कुणाला चोर म्हणतो, कुणाला पाकिटमार म्हणतो, याचा त्यांनी विचार केला पाहीजे. तुमच्याबरोबर जे २० ते २५ वर्ष राहिले, त्यांना सर्वांना हे विधान लागू होते.”
जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचा समाचार घेताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, आव्हाड यांच्या मेंदूला लकवा मारला आहे. आव्हाड हे घरभेदी आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात दुरावा निर्माण करणाऱ्यांमध्ये प्रथमस्थानी जितेंद्र आव्हाड होते. ही बिनकामाची लोकं लोकप्रतिनिधी असल्याचे त्या म्हणाल्या.
संजय केळकर यांच्याविरोधात दंड थोपटत अपक्ष निवडणुक लढविण्याची घोषणा करणारे शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे या दोघांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बंड मागे घेतले आहे.