- ….मात्र भारतीय एकमेकाशी भांडण्यात दंग
पाकिस्तान ,चीन भारताविरुद्ध पद्धतशीरपणे रणनीती आखत आक्रमक खेळी करत असताना आपल्याकडे दुर्दैवाने, देशांतर्गत विरोधी पक्षांकडून संसदेचे कामकाज बंद पाडले जाते. वास्तविक, सीमेलगतच्या राष्ट्रांबाबत अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा राज्यकर्ते आणि विरोधी पक्ष यांचे लक्ष या घडामोडींकडे जायला हवे. मात्र तसे होताना दिसत नाहीये. धोका वाढत आहे मात्र भारतीय एकमेकांशी भांडण्यात दंग आहेत.
या देशात अशा प्रकारे सामाजिक शांतता धोक्यात आणण्याचा कट कोणी करत असेल, तर अशी कृती मुळीच सहन केली जाणार नाही, हे कठोर कारवाईच्या कृतीतून सांगण्याची गरज आहे. कोणत्याही कारणाने देशाची शांतता आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न कराल, तर कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल, असे यांना अगदी कृतीने बजावण्याची गरज आहे.
येणाऱ्याकाळात आपण आपला मतदानाचा अधिकार वापरून आपण घुसखोर समर्थक पक्षांविरुद्ध मतदान करून या घुसखोरीच्या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे. २०२४ ते २०२९च्य निवडणुकीत अशी मोहीम सुरू करून राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणावर त्यांचे धोरण बदलायला लावण्याची गरज आहे.देशाच्या सुरक्षेची चाड असणाऱ्या सर्व पक्षांनी हा धोका वेळीच ओळखला पाहिजे-आसाम आणि लगतच्या राज्यांनाही घुसखोरमुक्त राज्ये बनवू, अशी घोषणा केली पाहिजे. एकाही घुसखोराला तिकीट देणार नाही, हेही जाहीर केले पाहिजे.
बंगलादेशी घुसखोरी थांबवण्याकरता अनेक उपयुक्त सूचना देण्यात आल्या आहेत. पण जी जबाबदारी सगळ्यांवर टाकली जाते, त्यावर ‘ते माझे कर्तव्य नाही’ म्हणून बहुतांश लोक आपले हात झटकून मोकळे होतात. म्हणून या प्रकरणात काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या समाजघटकांकडे वाटण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे घटक अशा प्रकारे आहेत.
• सरकार-राज्यकर्ते, राजकीय पक्ष, नोकरशाही, न्यायालये,सामाजिक संस्थां इत्यादींची जबाबदारी.
• मीडिया (वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ,social media) ची जबाबदारी
• पोलीस आणि अर्धसैनिक दले बीएसएफची जबाबदारी.
• सामान्य नागरिक जबाबदारी.
- सरकार-राज्यकर्ते, राजकीय पक्ष, नोकरशाही, न्यायालये,सामाजिक संस्थां इत्यादींची जबाबदारी.
• अंतर्गत सुरक्षा आणि बंगलादेशी घुसखोरी विरुद्ध लढाईकरिता वेगळे खाते आणि मंत्री. सर्वांत कर्तबगार मंत्री, नोकरशाही या खात्यामध्ये असावी. कठीण निर्णय घ्यायला परवानगी असावी.
• प्रत्येक बंगलादेशी घुसखोरीग्रस्त जिल्ह्याचे पालकमंत्री त्या जिल्ह्यात महिन्यातून कमीत कमी 15 दिवस असावेत. त्यांच्या कामावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष असावे.
• केंद्र स्तरावर एक संयुक्त मुख्यालय, सगळ्या राज्यातील पोलीसांवर नियंत्रण ठेवण्याकरिता असावे. त्यांच्या कामाचा आढावा घेतला जावा.
• बंगलादेशी शोध अभियान युद्धस्तरावर आखून त्याची अंमलबजावणी करावी.
• समाजात सगळ्या घटकांना बंगलादेशी शोधण्याच्या मोहिमेत सामील करावे.
• बंगलादेशी घुसखोरीग्रस्त भागात ग्रामसुरक्षा दले, होमगार्ड, पोलीस, अर्धसैनिकदलाची संख्या वाढवून सामान्य नागरिकांना सुरक्षा द्यावी.
• बंगलादेशी घुसखोरीना समर्थन देणाऱ्या संस्थावर बंदी घालावी. राष्ट्रविरोधी, बंगलादेशी घुसखोरी समर्थक लेख लिहिणाऱ्या लेखकांवर, बोलणाऱ्यांवर लक्ष असावे. बंगलादेशी घुसखोरी समर्थक पुस्तके, मासिके, पोस्टर्स, संकेत स्थळे यांवर कायदेशीर कारवाई करावी.
• पकडलेल्या बंगलादेशी घुसखोरीविरुद्धचे न्यायालयातील खटले एक महिन्यात निकाली काढावे. पोटा आणि स्पेशल कायदे पण तयार करावे. न्यायालयांच्या काही विचित्र निर्णयांमुळे अनेक बंगलादेशी घुसखोरी समर्थक संस्थांना बळ मिळते आहे. त्यावर फेरविचार, संविधानाचे रक्षण ही न्यायालयाची पण जबाबदारी आहे. विनाकारण खटले प्रलंबित ठेवणाऱ्या वकिलांवर कारवाई करावी. बंगलादेशी घुसखोरांच्या मानवी हक्कांच्या मर्यादा निश्चित कराव्या.
• 1970 पासून बंगलादेशी घुसखोरी होत आहे. 1970 पासूनचे मंत्री, नोकरशाही पोलीस जे सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांना आपल्या चुकीचे प्रायश्चित म्हणून त्या भागात बंगलादेशी घुसखोर शोधण्याकरता/ सामान्य जनतेची सेवा करायला पाठवावे.
• स्थानिक नागरिकांना बंगलादेशी घुसखोरांची गुप्त माहिती देण्यासाठी एक टोल फ़्री फोन क्रमांक दिला पाहिजे. जेणेकरून सामान्य नागरिक त्यांच्याकडील माहिती जलद पोलिसांपर्यंत पोहोचवू शकतात. त्यांच्या नावांविषयी गुप्तता बाळगली पाहिजे.
• बंगलादेशी घुसखोरीकडून स्त्रिया, लहान मुले आणि इतर सामान्यांवर अत्याचार होतात. त्यावर नजर ठेवून त्यांना शिक्षा देणे.
• बंगलादेशी घुसखोरी समर्थकांवर सामाजिक बहिष्कार.राजकीय पक्षांनी व्होट बँकेसाठी काही लोकांना जवळ केले आहे. या बोटचेप्या भूमिकेमुळे बंगलादेशी घुसखोरी फोफावत आहे.राष्ट्रीय एकात्मता कशी निर्माण करता येईल, याचा विचार करणे आवश्यक आहे. यासाठी देशातील सर्वांनी गट-तट विसरून एकत्र आले पाहिजे. मेणबत्त्या जाळून किंवा घोषणा देऊन बंगलादेशी घुसखोरीविरोधी अभियानात यश मिळणार नाही. त्याकरिता कृतिशील कारवाईची गरज आहे.बंगलादेशी घुसखोरीविरुद्धची लढाई ही अशी अनेक आघाड्यांवर आणि दीर्घकाळ लढावी लागणार आहे.
- मीडिया (वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ,social media) ची जबाबदारी
बंगलादेशी घुसखोरीविरुद्ध लढाई लढण्यास मीडिया मदत करू शकतो.देशद्रोही संघटना आणि विचारवंतांविरुद्ध अन्वेषक तपासणी करून (Investigative Journalism) त्यांच्या देशद्रोही कारवाया उघडकीस आणल्या पाहिजेत.मीडियाने क्रिकेट, सिनेमा, हिंसाचार आणि सेलेब्रिटीवरचे लक्ष कमी करून बंगलादेशी घुसखोरीग्रस्त भागात थोडे लक्ष केंद्रित केले तर सर्वांचाच फायदा होईल.
- पोलीस दलाची जबाबदारी
• पोलिस शिपाई, पोलिस उपनिरीक्षक, सहायक पोलिस आयुक्त यांच्या रिक्त जागा कालबद्ध कार्यक्रमांतर्गत भरल्या जाव्यात. पोलिस दलात हुशार अधिकाऱ्यांना प्राधान्याने स्थान दिले जावे.
• पोलिसांनी त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, यासाठी त्यांच्या सुविधांत वाढ केली जावी. पोलिसांवर कामाचा अतिरिक्त भार पडू नये, यासाठी ड्युटीचे तास निर्धारित केले जावेत. त्यांच्या सुट्या आवश्यकतेप्रमाणे मंजूर केल्या जाव्यात आणि त्यांना मानसिक शांती प्रदान करून एकूणच पोलिस दलाची कार्यक्षमता वाढविण्याचा प्रयत्न व्हावा.
• पोलिसांची निवड करताना त्यांची मानसिक चाचणी सुद्धा घ्यायला हवी, नैतिक मुल्यांचेही शिक्षण द्यावे.
• पोलीस दलातील राजकीयीकरण, गुन्हेगारी, भ्रष्टाचार थांबवून गुन्हेगारांना शिक्षा. व्हीआयपी सुरक्षा आणि प्रशासकीय कामापासून मुक्ती. लक्ष गुप्तहेर माहिती गोळा करणे, सामान्यांची सुरक्षा आणि बंगलादेशी घुसखोरीविरोधी अभियानावर.
• पोलीस महासंचालकांना आपले काम करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य.अत्याधुनिक साधने त्यांना मिळाली पाहिजेत. नवीन तंत्रज्ञान मुख्यत्वे रात्री दिसण्याकरता नाईट व्हिजन व इंटरसेप्टन (state of art technology).
• पोलिसांचे अर्धसैनिकीकरण आणि अर्धसैनिक दलाचे सैनिकीकरण. नियोजन, नेतृत्व, प्रशिक्षण आणि अंमलबजावणी जरुरी.
• बंगलादेशी घुसखोरी विरोधी अभियानात थोडे यश मिळाले तरच पोलिसांचे मनोधैर्य आणि कार्यक्षमता वाढेल.
- अर्धसैनिक दलांची जबाबदारी
स्थानिक जनता सुरक्षा दलाच्या बाजूने असणे फार महत्त्वाचे असते. अशा भागात अनेक नागरिक बंगलादेशी घुसखोरीच्या बाजूने असतात, या भागात काम करणाऱ्या जवानांद्वारे नवीन कल्पना वापरून यशाचे प्रमाण वाढवण्यात येऊ शकते. याकरिता सगळ्यांच्या बुद्धीचा वापर ब्रेन स्टॉर्मिंग (Brain Storming Sessions) ने करता येतो असे महिन्यामध्ये कमीत कमी एकदा नियमितपणे केले तर, पोलिसांना बंगलादेशी घुसखोरीना शह देता येईल, त्यांच्या एक चाल पुढे राहता येईल (Out thinking the illegal Bangladeshi migrants) व डावपेचांद्वारे त्यांच्यावर मात करता येईल.
प्रत्येक पोलिसाने उत्तम गुप्तहेर बनणे महत्त्वाचे. गुप्तहेरांचे जाळे जितके जास्त पसरेल तेवढे चांगले.
प्रत्येक पोलीस ठाण्यात, जिल्ह्यात, आणि प्रत्येक मुख्यालयात (red team)एक बंगलादेशी घुसखोरी विरोधी टीम तयार करावी. 25% जवान आणि अधिकाऱ्यांना हे काम दिले जाऊ शकते. त्यांचे मुख्य काम असेल बंगलादेशी घुसखोरीवादी पुढच्या एक महिन्यात काय करतील यावर विचार करणे. त्यामुळे आपल्याला येणाऱ्या परिस्थितीला नीटपणे तोंड देता येईल. सैन्यामध्ये एक पद्धत वापरली जाते. प्रत्येक अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये त्या त्या भागातल्या सर्वांत कुप्रसिद्ध/खतरनाक आतंकवाद्याचे फोटो लावले जातात व रोज त्या फोटोसमोर बसून त्यांच्यावर कशी मात करता येईल हा विचार करण्यात येतो. कुठलीही नवीन योजना वापरण्याच्या आधी त्यावर पूर्ण विचार केला जातो.
- सामान्य नागरिकांची जबाबदारी
प्रत्येक नागरिकाने देशाच्या सुरक्षेकरिता काही वेळ रोज खर्च करायला हवा. प्रत्येक नागरिकाने सैनिक आणि गुप्तहेर बनावे. आपण जर सुरक्षा दलाचे कान आणि डोळे बनलो तर आपला भाग सुरक्षित होऊ शकतो. बंगलादेशी घुसखोरीना कसे ओळखावे याचे प्रशिक्षण पोलीस, नागरिकांना देऊ शकतील.
अकार्यक्षम सरकारी अधिकाऱ्यांची माहिती वरच्या अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना द्यावी.
विकास योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवावे. भ्रष्टाचाराची माहिती सरकारी अधिकारी, पोलीस, भ्रष्टाचारविरोधी खाते, पत्रकार आणि नेत्यांना द्यावी.
बंगलादेशी घुसखोरीग्रस्त भागाच्या बाहेर असलेल्या नागरिकांनी सरकारला वैचारिक लढाई लढण्यास मदत करावी. बंगलादेशीघुसखोरीवादी विचारवंत आणि समर्थकांशी वैचारिक लढाई आमने सामने, वृत्तपत्रांना पत्रे लिहून, टीव्हीवर चर्चेत भाग घेऊन करावी.जे बंगलादेशी घुसखोरीच्या विरुध्द लढण्यास तयार नाहीत,असे राजकीय पक्ष व नेत्यांना जनतेने मतदान न करून धडा शिकवायला हवा.
- सामान्य नागरिकांनी सैनिक,गुप्तहेर म्हणून कान, डोळे उघडे ठेवण्याची गरज
आज ७०% भारतीय हे सोशल मीडियावर आहेत.कान आणि डोळे सोशल मीडियावर देखील उघडे ठेवा.सोशल मीडियावर देशविरोधी पोस्ट बघितली तर लगेच त्याची लिंक सायबर पोलिसांकडे पाठवा, जेणेकरून त्यावर कारवाई करणे त्यांना सोपे जाईल.
अजून सुद्धा काही राजकीय नेते, वाट चुकलेले विचारवंत, तज्ज्ञ देशविरोधी वक्तव्ये करून मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतात. सगळे पक्ष एकदिलाने सरकारच्या बाजूने उभे ठाकल्याचे दाखवतील, पण प्रत्यक्षात अनेक नतद्रष्ट नेते त्यात खोड्या काढतील.
लेखक : ब्रिगेडियर हेमंत महाजन