Thursday, September 19, 2024

संजय शिरसाट यांची सिडको अध्यक्षपदी नियुक्ती

Share

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या आमदारांची नाराजी दूर करण्याचं प्रयत्न केला आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यापासून सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असलेले आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा होती परंतु, दरम्यानच्या काळात अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत सत्तेत सामील झाले. त्यामुळे शिंदे गटाच्या वाट्याला जाणाऱ्या मंत्रिपदांच्या संख्येत आणखी एक वाटेकरी वाढला. यामुळे, शिंदे गटातील इच्छुक आमदारांची संधी हुकल्याची चर्चा आहे. आता, शिरसाटांची महामंडळावर वर्णी लावण्यात आली आहे. संजय शिरसाट यांची सिडकोच्या (Cidco) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तशा प्रकारचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांची हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदावर वर्णी लागली. तर संजय शिरसाटांची सिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. त्यामुळे आगामी काळात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता अगदी कमी असल्याचं बोललं जात आहे.

अन्य लेख

संबंधित लेख