एकनाथ शिंदे आणि ४० आमदार सत्ता सोडून गद्दारी करतात… त्यांच्या मागोमाग शिवसेनेचे १३ खासदार देखील गद्दारी करतात आणि मुख्यमंत्री असलेल्या उद्धव साहेबांना हे कळूदेखील नये?… आणि कळूनही त्यांनी गद्दारांना थांबवण्याचा प्रयत्न करू नये?… माझ्या तर काही लक्षातच येत नव्हते… डोळ्यासमोर अंधार आणि मनात घोर निराशा… अशी माझी “सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही” अशी भयंकर अवस्था झाली होती…

त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर… मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्याऐवजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला… आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले… मला दुःख अनावर झाले… डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या… मनोमन मी गद्दारांना शापू लागलो… म्हणजे राऊत साहेब आम्हाला हुतीया बनवत होते तर…
वास्तविक उद्धव साहेबांनी राजीनामा देण्याचे कारणच नव्हते… ते विश्वास ठराव प्रस्तावाला सामोरे गेले असते तर कदाचित सगळे गद्दार व्हिपच्या विरोधात जाऊन मतदान केल्यामुळे अपात्र ठरले असते… त्यांच्या आमदारक्या गेल्या असत्या…
आणि होऊन होऊन काय झाले असते… जास्तीत जास्त सरकार कोसळले असते… तसेही ते उद्धव साहेबांच्या राजीनाम्याने कोसळलेच की… त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या इतिहासात एक नोंद झाली असती… गद्दारांची गद्दारी महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजात कायमची लिहिली गेली असती आणि गद्दारांविरुद्धच्या पुढच्या कायदेशीर कारवाईला शिवसेनेच्या बाजूने एक बळ मिळाले असते…
उद्धव साहेबांच्या आततायीपणामुळे… सगळाच मामला गंडला… आपल्याला न विचारता उद्धव साहेबांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भयंकर नाराज झाले…
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना आपण विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा देत आहोत असे उद्धव साहेबांनी जाहीर केले… पण आजपर्यंत तो दिलेला नाही… ही भक्ताडं आजही त्याच्यावरून आमचा जीव नकोसा करतात…
विमानातून उतरवल्याचा राग मनात ठेवलेल्या त्या थेरड्या राज्यपालाने एका पायावर तयार होऊन… गद्दार एकनाथ शिंदे उर्फ मिंधे यांना भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली आणि टरबूजाने उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली…

त्याच्या पुढचा इतिहास मी तुम्हाला सांगत नाही कारण तुम्हाला सगळंच ठाऊक आहे पण एक बाळासाहेबांचा मुंबईकर कट्टर शिवसैनिक म्हणून… मी पाठी वळून विचार करतो तेव्हा लक्षात येते आज आमच्या हातात काय राहिलंय?…
मोदी शहांच्या बटिक असलेल्या निवडणूक आयोगाने… आमचा शिवसेना पक्ष.. आमचे चिन्ह धनुष्यबाण… मिंध्यांच्या गटाला देऊन टाकलं…
आमच्या नशिबी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेण्याची अगतिकता
आली… निवडणूक चिन्ह म्हणून मशाल घ्यावी लागली.
नुसते आमदार खासदार नाहीत तर ठिकठिकाणचे नगरसेवक फुटले… काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादी लागून आम्ही हिंदुत्व सोडल्यामुळे… ज्याला हिंदुत्व प्रिय होतं तो आमचा हक्काचा मतदार आमच्या हातून निसटला… उद्धव साहेबांच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री म्हणून असलेल्या कारकिर्दीत… काँग्रेस राष्ट्रवादीच्या नादी लागून हिंदुत्व सोडल्यामुळे घुसमटलेल्या असंख्य शिवसैनिकांना मिंध्यांची शिवसेना आपली वाटू लागली…
बाळासाहेबांना “थेरडा” म्हणणाऱ्या सुषमा अंधारेसारख्या आततायी नेत्या आम्ही (नाईलाजाने) पक्षात घेतल्या… जेव्हा त्या पक्षाच्या वतीने बोलू लागतात तेव्हा तर मी नजर दुसरीकडे वळवतो किंवा टीव्ही बंद करून टाकतो…
आमची शिवसेना असो नाहीतर युवा सेना… बाळासाहेबांच्या काळात होणारी तरुण पोरांची भरती पार बंद झाली आहे… कारण आम्ही हिंदुत्व सोडलं…
आज काँग्रेस राष्ट्रवादीच्या कुबड्या घेतल्याशिवाय शिवाय आम्हाला पर्याय नाही… पूर्वी ज्या मातोश्रीवर अडवाणी नरेंद्र मोदी प्रणव मुखर्जी अमित शहा यांच्यासारखे दिग्गज नेते यायचे तिथे आता काँग्रेसकडून १०, जनपथचा निरोप घेऊन चेन्नीथला नावाचा कोणीतरी केरळी लुंगीवाला येतो… किंवा…

ज्यांचे हात कारसेवकांच्या रक्ताने बरबटले आहेत असे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातले आणि उत्तर प्रदेशातले परप्रांतीय नेते उद्धव साहेबांना भेटायला येतात… “हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे” यांच्या फोटो समोर उभे राहून हे आपले फोटो सेशन करतात… ते पाहून माझ्या हृदयात कालवा कालव होते… बाळासाहेबांची सगळी तपश्चर्या फुकट गेली असं वाटू लागतं…

दरवर्षी राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीला तुम्ही निर्मळ मनाने त्यांना श्रद्धांजली वाहायला सुरुवात केली… पण राहुल गांधी मात्र चुकूनही स्वर्गीय बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहणे तर दूरच पण त्यांचा आदराने उल्लेख सुद्धा करत नाहीत… भक्त यालाच आपली “लाचारी” म्हणतात… शिवसेनेला लाचार सेना आणि तुम्हाला लाचार सम्राट… भक्तांच्या भडीमारापुढे आम्ही हतबल होतो…

ज्या उत्तर प्रदेश बिहारच्या आमच्याच हिंदू बांधवांना आम्ही आयुष्यभर “परप्रांतीय भैय्ये” म्हणून हिणवले… त्यांचा राग राग केला… त्याच बिहारच्या परप्रांतीय चाराचोर भैय्याच्या घरी आमचे राऊत साहेब पाहुणचार झोडायला गेले… ते बघून वाटतं… आपलं चुकलंच… एकदा हिंदुत्व स्वीकारल्यानंतर अन्य प्रांतातला आपला हिंदू बंधू परप्रांतीय कसा होऊ शकतो?… फार तर तो “अन्य प्रांतीय” होईल…

इथे आम्ही मुंबईकर मराठी माणसाला जीव तोडून पटवून देतो की… मोदी शहा हे दोघे गुजराती मुंबई अंबानी अदानीला विकायला निघाले आहेत… आणि तिथे उद्धव साहेब आणि त्यांचे कुटुंबीय २९ फेब्रुवारी २०२४ रोजी जामनगरला अनंत अंबानीच्या विवाहपूर्व सोहोळ्याला पोहोचले… कसा मतदार आमच्यावर विश्वास ठेवेल?…

उद्धव साहेब… प्रत्येक निवडणुकीच्या आधी आपण मुंबई तोडून गुजरातला जोडण्याचा मोदी शहा यांचा डाव आहे म्हणून नुसती बोंबाबोंब करतो… पण मुंबई गुजरातला जोडण्यासाठी… अख्खा पालघर जिल्हा आणि थोडा ठाणे जिल्ह्याचा मीरा भाईंदर भाग देखील गुजरातला जोडावा लागेल… हे व्यावहारिक दृष्ट्या शक्य आहे का?… असे भक्त विचारतात तेव्हा मी अक्षरशः निरुत्तर होतो… आणि त्यात तुमचे मुकेस भाई समोर हात जोडून उभा राहिलेला तुमचा फोटो सोशल मिडीयावर आला की माझे हातपायच गळतात…

या अटीतटीच्या… संघर्षाच्या काळात… पक्षप्रमुख म्हणून तुम्ही कधीच बाळासाहेबांसारखा बाणेदारपणा आणि तडफ दाखवली नाही… फक्त माझा पक्ष चोरला… माझा बाप चोरला… माझी निशाणी चोरली… म्हणून फक्त रडगाणे गात राहिलात… मतदारांची सहानुभूती गोळा करण्याचा तो केविलवाणा प्रयत्न वाटत होता… (डँबीस भक्त याच्यावर बिहारच्या चिराग पासवानचे उदाहरण देतात… त्याचं राजकीय सर्वस्व गेलं होतं पण तो राखेतून पुन्हा उभा राहिला… त्या बिहाऱ्याला जमलं ते तुमच्या बिहाऱ्याला का जमत नाही? म्हणून आम्हाला खिजवतात… वडील चोरीला गेले आहेत तर पोलिसात तक्रार द्या म्हणून आमची टर उडवतात…)

या काळात आम्हा शिवसैनिकांना मार्गदर्शन करायचे सोडून तुम्ही सत्ताधारी महायुतीला फक्त टोमणे मारत राहिलात… आज तुमची प्रतिमा “टोमणे सम्राट” अशी झाली आहे… (तुमचा हा टोमणा वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यावर भक्तांनी… फक्त मातोश्रीवरच्या गांडूळांना फणा असेल… आमच्याकडे नागाला फणा असतो… म्हणून विषारी फुत्कार टाकले)…

राऊत साहेबांनी तुमच्या सामनासाठी घेतलेल्या मुलाखती हा समाजात चेष्टेचा
विषय झाला… प्रश्नपत्रिका पण तुम्हीच लिहिली होती उत्तर पत्रिका पण तुमचीच आणि तपासणारेही तुम्हीच… अशी भयंकर थट्टा होऊ लागली…

उद्धव साहेब… कामासाठी अलीकडेच मी ॲक्वा लाईन मेट्रोने अंधेरीहून गिरगावला गेलो होतो… गर्दीच नशिबात असलेल्या मुंबईकरांना प्रवासाचे स्वर्ग सुख म्हणजे काय असते… ते या ॲक्वा लाईन मेट्रोने प्रवास केल्याशिवाय कळणार नाही…
भक्त मित्रांकडे या प्रवास सुखाचे वर्णन करण्याची पण आम्हाला चोरी झाली आहे… “तुझ्या ‘स्थगिती सम्राट’ साहेबाने मेट्रो प्रकल्पाला स्थगिती दिली नसती तर हे सुख केव्हाच अनुभवता आले असते”… असे म्हणून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात… आधीच्या महायुती सरकारच्या विकास कामांना दिलेल्या स्थगितीची यादी घडाघडा म्हणून दाखवतात… तोंडात चप्पल मारल्यासारखी आम्हा सैनिकांची दयनीय स्थिती होते… ‘स्थगिती सम्राट’ म्हणून तुमची प्रतिमा भक्तांनी सोशल मीडियात अगदी व्यवस्थित रुजवली आहे… तिचा प्रतिवाद तरी कुठल्या तोंडाने करायचा?…

मुंबई महापालिकेच्या कंत्राटांमध्ये टक्केवारी घेऊन नोटबंदीनंतरही तुम्ही टोलेजंग मातोश्री २ बांधलात… तुमची आणि आदित्य साहेबांची निवडणुकीच्या वेळी जाहीर केलेली मालमत्ता… स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क चौपाटीवरील तुम्ही ढापलेला महापौर बंगला… सचिन वाजेमार्फत मुंबईतून महिना शंभर कोटी खंडणी गोळा करण्याच्या आरोपामुळे… हे लबाड भक्त तुमची प्रतिमा धुरंदरच्या रहमान डकेतच्या तालावर… “महाराष्ट्राचा डकैत” म्हणून उभी करतात…
आणि जनतेला प्रथम दर्शनी त्यात तथ्य दिसत असल्यामुळे… जनता विश्वास ठेवते आणि आम्हाला त्याचा प्रतिवादही करता येत नाही…

कोरोना काळात तुम्ही देशातील “बेस्ट मुख्यमंत्री” असल्याचे सर्व्हे येत होते… हे सगळे पेड सर्व्हे होते… पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी स्वतः स्वतःला भारतरत्न पुरस्कार दिला होता… त्यातलाच हा बेस्ट मुख्यमंत्री पुरस्कार होता… अशी भक्तांनी नुसती राळ उडवून दिली होती…

हिंदुत्व सोडल्यामुळे आमचा नाराज झालेला कार्यकर्ता आणि मतदार जेव्हा आमच्या हातातून निसटला तेव्हाच आम्ही ही लढाई हरलो होतो…

तोपर्यंत २०२४ च्या विधानसभा निवडणुका आल्या… महाविकास आघाडीत ३ मुख्य पक्ष असल्यामुळे आमच्या वाट्याला जेमतेम ८५ जागा आल्या… त्याही मिळवण्यासाठी आम्हाला काय लाचारी पत्करावी लागली हे दाखवणारा हा फोटो भक्तांनी सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल केला…

महाविकास आघाडी करूनही आमचे अवघे २० आमदार निवडून आले… तेव्हा भक्तांनी हे असले फोटोशॉप करून आमची पार चामडीच उतरवली… यांना प्रत्युत्तर तरी कोणत्या तोंडाने देणार?…
आज देशाच्या लोकसभेत आमचे ९ तर राज्यसभेत ३ खासदार आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत २० आमदार उरले आहेत…
महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी आम्हाला महायुती सरकारकडे भीक मागावी लागते आहे…
पुढच्या वेळी विधानसभेतून राज्यसभेवर १ खासदार पाठवण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ देखील आमच्याकडे राहिलेले नाही…
मुंबई महापालिकेला तर पानीपत होण्याची भिती वाटते आहे… ज्या मनसेचे आदित्य साहेबांनी “संपलेला पक्ष” म्हणून धिंडवडे काढले… त्याच मनसेसमोर आघाडी करण्याची नामुष्की आपल्यावर ओढवली आहे…
खरं म्हणजे आता आमच्याकडे काहीच उरलेलं नाही… तरीही मी उद्धव साहेबांबरोबर आहे… कारण मी बाळासाहेबांचा कट्टर मुंबईकर शिवसैनिक आहे…

आता आमच्याकडे काय उरलं आहे?… उरल्या आहेत त्या स्वर्गीय बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या तेजस्वी आठवणी… बाळासाहेबांच्या कट्टर मुंबईकर शिवसैनिकांचा रडणारा अंतरात्मा आणि अंधःकारमय भविष्य…
जय महाराष्ट्र!!!!
(समाप्त)
– तुमचाच
बाळासाहेबांचा शिवसैनिक
या आधीचे भाग वाचा –
१) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग १
२) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग २
३) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ३
४) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ४
५) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ५
६) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ६
७) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ७