Tuesday, March 10, 2026

छत्रपती संभाजीनगर : उबाठा गटाची गुंडगिरी; अंबादास दानवेंनी भाजप उमेदवाराची कॉलर पकडली!

Share

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालांनंतर आता सभापती आणि उपसभापती निवडीला सुरुवात झाली आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये आज या निवडीपूर्वीच मोठा राजकीय राडा पाहायला मिळाला. पंचायत समितीच्या सत्तेसाठी भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी तणाव इतका वाढला की, शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे यांनी भाजपचे उमेदवार कल्याणराव गायकवाड यांची चक्क कॉलर पकडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी आज १० मार्च रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेपूर्वीच भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले आणि दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यावेळी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपचे सभापतीपदाचे उमेदवार कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.

पंचायत समितीचे पक्षीय बलाबल (एकूण सदस्य: २०)
सत्तेसाठी ११ सदस्यांच्या बहुमताची गरज आहे, मात्र कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाही.

भाजप: ६ + १ (पुरस्कृत) = ७

एकनाथ शिंदे शिवसेना: ६

ठाकरे गट (UBT): ४

काँग्रेस: १

राष्ट्रवादी (अजित पवार): १

प्रहार: १

पंचायत समितीवर कोणाचा झेंडा फडकणार, याचे गणित आता पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या हातात आहे. भाजपकडे ७ तर शिंदे सेनेकडे ६ जागा आहेत. सत्तेसाठी भाजपला ४ अतिरिक्त मतांची गरज आहे. ठाकरे गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे – “जो पक्ष आम्हाला उपसभापतीपद देईल, त्याला आम्ही सभापतीपदासाठी पाठिंबा देऊ.” यामुळे येथे सत्तेसाठी दोन शिवसेना (शिंदे आणि ठाकरे गट) एकत्र येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख