Tuesday, December 3, 2024

हे लोक भारताचा पाकिस्तान, बांगलादेश बनवतील

Share

  गिरीराज सिंह यांची इंडी आघाडीवर घणाघाती टीका

तेजस्वी यादव, अखिलेश यादव आणि राहुल गांधी हे मुस्लिम व्होट बँकेचे ठेकेदार आहेत. त्यांचे सरकार सत्तेवर आल्यास ते बिहार आणि उत्तर प्रदेशात शुक्रवारची सुट्टी जाहीर करतील. देशात राहुल गांधी, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांचे सरकार स्थापन झाले तर हे लोक भारताचे पाकिस्तान आणि बांगलादेशात रूपांतर करतील. अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केले. ते बेगुसराय येथे पत्रकारांशी बोलत होते.

आसाममध्ये दर शुक्रवारी दिली जाणारी दोन तासांची सुटी रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. यापूर्वी आसाममध्ये शुक्रवारी सरकारी कर्मचाऱ्यांना 2 तास सुटी मिळत असे. ही सुटी सरकारने बंद केली. यासंदर्भात प्रतिक्रीया देताना गिरीराज सिंह म्हणाले की, मंगळवारी मारुतीची पूजा, सोमवारी महादेवाची किंवा इतर दिवशी इतर देवी-देवतांची पूजा केली जात असेल, तर त्याला सुट्टी द्यावी, असे आजपर्यंत कोणत्याही हिंदूने म्हटलेले नाही. पण व्होट बँकेचे राजकारण करणारे तेजस्वी यादव, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यासारखे लोक मुस्लिमांचे रक्षणच करत नाहीत तर त्यांच्या शब्दाची अंमलबजावणीही करत आहेत. भारतात एकच देश आणि एकच कायदा चालेल, असे स्पष्ट शब्दात केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले. आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सर्मा आणि आसाम विधानसभेचे आभार मानताना ते म्हणाले की, आसाम सरकार एक देश एक कायदा लागू करत आहे आणि म्हणूनच त्यांचे आभार व्यक्त करत असल्याचे गिरीराज यांनी सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख