Sunday, September 8, 2024

मराठा आरक्षणाचे मारेकरी उद्धव ठाकरे यांना व्हिलन न करता देवेंद्रजींना व्हिलन केले जात आहे

Share

पुणे : केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे (BJP) वरिष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे (Pune) येथे पार पडलेल्या भाजपा महाराष्ट्र (Maharashtra) प्रदेश अधिवेशन पार पडले. यावेळी अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत विरोधी पक्षावर निशाणा साधला. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी देखील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी बावनकुळे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयात हात घातला. “आदरणीय देवेंद्रजींनी अहोरात्र मेहनत घेऊन मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिले. परंतु, आज सामाजिक आंदोलनाच्या नावाखाली मराठा आरक्षणाचे मारेकरी असणारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना व्हिलन न करता देवेंद्रजींना व्हिलन केले जात आहे,” अशी खंत यावेळी त्यांनी बोलून दाखवली.

“देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये ज्याप्रकारे चंद्रकांत दादा आणि टीमने मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम झालं. मला आठवतंय देवंद्रजींनी २० रात्र जागून मराठा समाजाला टिकणार आरक्षण देण्याचं काम माननीय देवंद्रजींनी दिलं. २० रात्र जागून मराठा समाजाचा कायदा स्वतः तयार केले. आम्ही त्यांना म्हणायचो पहाटे ४ वाजेपर्यंत दिवा बंद होत नाही तब्येतीची काळजी घ्या. मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर झाला. विधिमंडळात मंजूर झाला, हायकोर्टात मंजूर झाला पण जेंव्हासुप्रिम कोर्टामध्ये मराठा समाज कसा आर्थिक आणि मागासवर्गीय कमजोर आहे. आर्थिक दुर्बल आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारने सुप्रीम कोर्टात मंडल नाही. सुप्रीम कोर्टात जेंव्हा केस सुरु होती तेंव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे होते. म्हणजे, मराठा समाजाला आरक्षण दिल तेंव्हा देवेंद्रजी होते. आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस लढली तेंव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. उद्धव ठाकरेंनी जे ४ चांगले उच्चस्तरीय वकील दिले असते. तर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त्याच दिवशी संपला असता. मराठा समाजाचे खरे मारेकरी कोण आहेत? तर ते उद्धव ठाकरे आहेत.”

“आज काय परिस्थिती आहे सामाजिक आंदोलनाच्या नावाने देवेंद्रजी यांना व्हिलन केलं जात आहे. सामाजिक आंदोलन झालं पाहिजे, सामाजिक आंदोलनाची गरज आहे. प्रत्येक समजाला आपापल्या समाजाला हक्क मागण्याची गरज आहे. सामाजिक आंदोलन करतांना राजकीय स्मेल येत आहे. उद्धव ठाकरे यांना व्हिलन न करता देवेंद्रजींना व्हिलन केले जात आहे. याकरता मराठा समाजाला १००% आरक्षण मिळावं त्याकरता जे आरक्षण हक्काचं आहे ते मिळालच पाहिजे. याकरिता भारतीय जनता पार्टी या महाअधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देत आहे. हे करत असताना मात्र देवेंद्रजींनी जो कायदा केला होता त्या कायद्याचा मारेकरी शोधला पाहिजे,” असं ते म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख