मुंबई महापालिका निवडणुक जिंकण्यासाठी शिवसेना (उबाठा) ने 4 M ची रणनीती आखली आहे म्हणे…
मराठी… मुंबई… महिला आणि मुस्लीम असे हे उबाठाचे ४ M आहेत…
आयत्या पीठावर रेघोट्या मारण्यात लाचार उबाठा सेनेचा कोणीही हात धरणार नाही…
M ची ही मूळ कल्पना पश्चिम बंगालच्या चेटकीणीची…
मां… माटी… मानुष… अशा ३ M वर ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या ३ विधानसभा निवडणुकीत घसघशीत विजय मिळवला…
झालं… आपलं काहीतरी वेगळेपण हवं म्हणून उबाठाने आपला चौथा… मुस्लीमांचा M जोडून आयत्या बिळावर नागोबा जाऊन बसला…
वास्तविक ममता बॅनर्जी यांचे देखील ४ M च होते… पण ४था मुस्लीमांचा M त्यांना सांगावा देखील लागला नाही… जनतेने तो अध्याहृत धरला होता… अगदी
न सांगता… कारण ममता बॅनर्जी इतका मुस्लिम अनुनय करतात की… आपला ४था M सांगण्याची त्यांना गरज देखील वाटली नाही…
पण बाटगा खऱ्यापेक्षा मोठ्याने बांग देतो म्हणतात… तशी उबाठाने चौथ्या मुस्लिमांच्या M ची घोषणा केली…
पण कितीही अनुनय केला तरी मुंबईचा मुस्लिम मतदार उबाठाला मतदान करणार नाही… तो मूळचा काँग्रेसचा मतदार… २०१९ पासून सत्तेसाठी लाचारी करून उबाठाने काँग्रेसच्या पायाशी लोळण घेतल्यामुळे मुसलमानांनी उभाठाला मतदान केले होते पण… आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उबाठा व काँग्रेस वेगवेगळे झाले आहेत… काँग्रेसचा मतदार कशाला उबाठाला मते देईल?… बाबरी मशीद पाडण्याचे क्रेडिट घेणाऱ्या… १९९२-९३ च्या मुंबई दंगलीत हिंदूंचे रक्षण आपणच केले असा डांगोरा पिटणाऱ्या उबाठापेक्षा त्याला काँग्रेस… अगदीच नाही तर समाजवादी पक्ष आणि MIM जवळचे वाटतात… हात, सायकल आणि पतंग असताना तो उबाठाच्या विझलेल्या मशालीकडे ढुंकूनही पाहणार नाही… तुम्ही 4 M मध्ये मुस्लिमांना चौथ्या क्रमांकावर ठेवलेत… आता मतदानात मुस्लिम तुम्हाला चौथ्या क्रमांकावर ठेवणार हे निश्चित…
त्यापेक्षा उबाठाने आपला ४ था M मनसे (मतदार नसलेली सेना) असे धोरण आखले असते तर… मुंबईकरांना उबाठा मनसेची युती मनापासून झाली आहे असे निदान भासले तरी असते… मनसेला”संपलेला पक्ष” म्हणून हिणवणाऱ्या उबाठाने… मनसेशी केलेली युती ही “मराठी अस्मिते”पेक्षा आपल्या “अस्तित्वा”साठी आहे असेच आज मुंबईकरांना वाटते आहे… त्यामुळे उबाठाने आपला ४ था M म्हणजे मनसेचा M म्हणणे श्रेयस्कर व राजकीय शहाणपणाचे ठरले असते…
पण उबाठाला त्यांच्या “ठाकरे ब्रॅंड”मध्ये आणि पर्यायाने मुंबई महापालिकेच्या तिजोरीत कोणीही वाटेकरी नको आहे… त्यामुळे उबाठाच्या संपूर्ण प्रचार यंत्रणेत जाणीवपूर्वक कुठेही मनसेचा उल्लेख देखील केला जात नाही… कारण… माझी
मुंबई… माझे वडील… माझा ब्रँड… माझी महापालिका… माझी तिजोरी… कारण वृत्तीच माजोरी…
आपण लहानपणी वाचलेल्या अनेक गोष्टीत… राक्षसाचा प्राण एका पोपटात असतो… अगदी तस्साच उबाठा नावाच्या राक्षसाचा प्राण मुंबई महापालिका नावाच्या पोपटात आहे…
आपली मान वाचवण्यासाठी उबाठाचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत… त्यासाठीच ही ४थ्या M ची धडपड सुरू आहे… आमचा ४ था M हा M फॉर मुस्लीम एवढ्यावरच न थांबता… आतल्याआत मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी… “आम्ही मुस्लिम महापौर देखील बनवू”… असे आश्वासन द्यायला उबाठा मागे पुढे पाहणार नाही… बहुमताला काही जागा कमी पडल्या तर महापौर पदासाठी मुस्लिम उमेदवार द्यायचा की काँग्रेस आपोआप मागे फरफटत येईल… असा उबाठाचा सरळ साधा सोपा हिशोब आहे…
मुंबईच्या मराठी सकट सर्व भाषिक सकल हिंदू समाजाने उबाठाच्या या घातकी कावेबाज षडयंत्राला वेळीच ओळखून सावध राहिले पाहिजे… मुंबईचा “मराठी महापौर” ही निव्वळ उबाठाची हातचलाखी आहे…
जे बी बोमन बेहराम, हुसेनअली रहीमतुला, खुर्शीद नरिमन, जमनादास मेहता, एलिजा मोजेस राजापुरकर, सुलतान चिनॉय, बेहराम करंजीया, मथुरादास त्रिकमजी, जोजफ कोलाको, युसुफ मेहरअली, मिनू मसानी, नगिनदास मास्तर, जोजफ डिसूझा, मोहम्मदभाई रावजी, ए बी साबावाला, एम यु मस्कहेनास, पी ए डायस, दाह्याभाई पटेल, एन सी पुपाला, सुलोचना मोदी, अब्दुल कादर सालेभॉय, सायमन फर्नांडिस… ही झाली स्वातंत्र्यापूर्वीची आणि संयुक्त महाराष्ट्रापूर्वीच्या मुंबईच्या अमराठी भाषिक महापौरांच्या नावांची यादी…
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतरही… एन एन शहा, ई ए बंदूकवाला, एम माधवन, जे लिऑन डिसुझा, एस जी पटेल, आर के गणात्रा, बी के बोमन बेहराम, मुरली देवरा, ए यु मेमन, एम एच बेदी हे अमराठी भाषिक नगरसेवक मुंबईचे महापौर राहिले आहेत…
यापैकी मुरली देवरा यांना खुद्द वं. बाळासाहेब ठाकरे यांनी १९७७ साली मुंबईचे महापौर होण्यासाठी पाठिंबा दिला होता…
मुंबईचा महापौर “मराठी”च असला पाहिजे अशी भावनिक साद घालणाऱ्या उबाठाने एकदा… मुंबईचा महापौर “मराठी भाषिक हिंदू” असला पाहिजे म्हणून सांगावे… मुंबईकरांनी ही मुंबई त्यांना आंदण दिलीच समजा… पण मुंबई महापालिकेच्या तिजोरीसाठी हपापलेले… हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र… लाचार सम्राट उद्धव बाळासाहेब ठाकरे “हिंदू” हा शब्द तोंडातून काढणार नाहीत… कारण त्यांचा चौथा M… M फॉर मातीमोल होईल…
मुंबई महापालिकेच्या तिजोरीसाठी उबाठा “मराठी महापौर” या बिरुदाखाली दाऊद इब्राहिम कासकरला सुद्धा महापौर करू शकते… शेवटी तो सुद्धा मराठी मुसलमान आहेच की… असा त्यांचा युक्तिवाद असेल…
आपण मात्र “आम्हाला हिंदू महापौरच हवा… लंडन आणि न्यूयॉर्कचा महापौर मुसलमान झाला… मुंबईचा आम्ही होऊ देणार नाही” असा आग्रह धरावा… कारण हिंदू म्हटला की त्यात मराठी भाषिक आलाच की…
तेव्हा मुंबईच्या हिंदू मतदार राजा… जागते रहो… रात्र वैऱ्याची आहे…
– मालवणी खवट्या
याआधीचे भाग वाचा –