Saturday, December 13, 2025

‘महायुती सरकारने उद्धव ठाकरे यांच्यावर खरच केवढा मोठाऽऽऽऽ अन्याय केलाय;’ अधिवेशनाच्या मुद्द्यावरून भाजपने उबाठा गटाला घेरले!

Share

मुंबई: विधानमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या खास शैलीत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

‘ठाकरेंवर केवढा मोठा अन्यायऽऽऽऽ!’

“अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवून महायुती सरकारने उद्धव ठाकरे यांच्यावर खरंच केवढा मोठाऽऽऽऽ अन्याय केलाय!! एका आठवड्याच्या अधिवेशनात ते काही मिनिटे तरी सभागृहात बसले. अधिवेशनाचा कालावधी अधिक असता, तर त्यांना काही तास सभागृहात बसता आले असते…?” असा उपरोधिक सवाल त्यांनी केला. उपाध्ये यांनी थेट ठाकरेंच्या कार्यशैलीवर बोट ठेवले. “खरं म्हणजे, घरी बसून पक्ष चालवणाऱ्या, सत्ता उपभोगणाऱ्या ठाकरेंना अधिवेशनात हजर राहून सभागृहात बसावे लागते हाच त्यांच्यावर अन्याय आहे.

‘अधिवेशन मातोश्रीवर ठेवा!’

“अधिवेशनाचा कालावधी वाढवा, किंवा ठाकरेंनी सभागृहात उपस्थित रहावे यासाठी अधिवेशन मातोश्रीवर ठेवा!!“, असा टोला उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. भाजपने अधिवेशनाच्या कालावधीवरून सुरू झालेल्या टीकेला ठाकरेंच्या सभागृहातील कमी उपस्थितीचा मुद्दा उचलून व्यक्तिगत आणि थेट उत्तर दिले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख