Wednesday, March 4, 2026

रमजान का महिना, मियां करे शोर!

Share

रविवार, १ मार्च २०२६ रोजी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधील कराचीच्या माई कोलाची रस्त्यावरील अमेरिकन दूतावासात अमेरिका व इस्त्राएलच्या संयुक्त कारवाईत जगभरातील शियापंथीयांचे सर्वोच्च धर्मगुरू (उलेमा) व इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला अली खामेनी यांच्या झालेल्या हत्येच्या निषेध आंदोलनाच्या वेळी अनेक निदर्शक जबरदस्तीने आत घुसले. त्यांनी दूतावासात तोडफोड सुरू केली व आग लावली. अमेरिकन कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्याची त्यांची योजना होती. अमेरिकन दूतावासातील सुरक्षा रक्षकांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अंदाजे ९ ते १० आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. अशीच निदर्शने रावळपिंडी, लाहोर, पेशावर येथे देखील झाली आहेत. काही वृत्तसंस्थानी देशभरातील आंदोलनांमध्ये मृतांचा आकडा २२-२३ असल्याचे सांगितले आहे.

अमेरिकेने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या राजधानी रावळपिंडीमधील आपला दूतावास, तसेच लाहोर कराची व पेशावरचे वाणिज्य दूतावास तात्पुरते बंद केले असून ६ मार्चपर्यंत व्हिसा सेवादेखील स्थगित केली आहे.

विशेष म्हणजे जगभरात रमजानच्या पवित्र आणि शांतीपूर्ण महिन्याचे रोजे चालू असताना इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये हा धिंगाणा सुरू आहे.

कोणत्याही देशातील विदेशांचे दूतावास (Embassy) अथवा वाणिज्य दूतावास (Consulate) हे ज्या जागेवर उभे असतात. ते क्षेत्र त्या विदेशाची भूमी समजली जाते. तिथे (अगदी शत्रू राष्ट्र असले तरीही) आपला राष्ट्रध्वज फडकवता येतो. त्या दूतावासाच्या बाहेर राहणाऱ्या राजदूताला (ambassador) आपल्या देशाचा ध्वज आपल्या निवासस्थानावर देखील फडकवता येतो. हा जगातील सर्व देशांनी १९६१ च्या व्हिएन्ना कन्व्हेन्शननुसार मान्य केलेला हा आंतरराष्ट्रीय राजशिष्टाचार (protocol) आहे.

उदाहरणार्थ इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या राजधानी रावळपिंडीत भारतीय दूतावास ज्या जागेवर उभा आहे ती जागा इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सरकारने भारताची भूमी मानली आहे. त्यामुळे दूतावासावर आपला तिरंगा डौलाने फडकत असतो. आणि आपले तेथील राजदूत १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन व २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन भारताचा तिरंगा फडकवून साजरा करू शकतात. अन्यथा इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या भूमीवर भारताचा तिरंगा फडकवता येणार नाही. तिथे तो देशद्रोह ठरेल. उलटपक्षी (vice a versa) भारतातील इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या दूतावासावर त्यांचा चांद तारा असलेला हिरवा राष्ट्रध्वज फडकत असतो.

अगदी याच राजशिष्टाचारानुसार कराचीच्या अमेरिकन वाणिज्य दूतावासात बळजबरीने घुसलेले पाकिस्तानी नागरिक हे अमेरिकन भूमीत जबरदस्तीने शिरलेले आहेत. हे आपल्या संप्रभुतेवर आक्रमण आहे असे समजून अमेरिकन सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांच्या छातीवर व तोंडावर नेम धरून स्वसंरक्षणार्थ केलेला गोळीबार हा अतिशय न्यायसंगत व तर्कसंगत आहे आणि तसेही दूतावासातील कर्मचाऱ्यांना एक प्रकारचे कायदेशीर राजनैतिक संरक्षण (diplomatic immunity) असते. यजमान देश फार फार तर त्यांना देश सोडण्याचा हुकूम देऊ शकतो. मात्र त्यांच्यावर आपल्या देशाच्या कायद्यांनुसार कोणतीही कायदेशीर कारवाई करता येत नाही.

त्यामुळे कराचीच्या अमेरिकन वाणिज्य दूतावासातील सुरक्षारक्षकांवर इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या फौजदारी कायद्यांनुसार कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही हे निश्चित. इथे २०११ साली लाहोरला घडलेला एक लोक विलक्षण प्रसंग सांगणे समयोचित ठरेल.

२७ जानेवारी २०११ रेमंड ॲलन डेव्हिस हा लाहोरच्या अमेरिकन वाणिज्य दूतावासातील (CIAचा खाजगी) सुरक्षा रक्षक लाहोरच्या बाजारात खरेदीसाठी फिरत होता. पाठून २ जण आपला सतत पाठलाग करत आहेत अशी रेमंडला शंका आली. (आपला बरेच दिवस पाठलाग केला जात आहे अशी त्याला शंका वाटतच होती.) आज खात्री पटल्यावर मात्र रेमंडने त्या दोघांना गोड शब्दात समज दिली. परंतु, त्या दोघांनी पाठलाग थांबवला नाही. शेवटी रेमंडच्या सहनशक्तीचा अंत झाला. लाहोरच्या मध्यवर्ती असलेल्या मोजंग चुंगी भागात रेमंडने आपला पाठलाग करणाऱ्या मोहम्मद फईम आणि फैजन हैदर या दोघांना भर रस्त्यात गोळ्या घातल्या.

एका अमेरिकन नागरिकाने आपल्या २ देश आणि धर्म बांधवांना भर रस्त्यात गोळ्या घातल्या आहेत म्हटल्यावर लाहोरमध्ये जनक्षोभ उसळला. लाहोर पोलिसांनी रेमंडला अटक केली. हे दोघे आपल्याला लुटण्यासाठी (robbery) आपला पाठलाग करत होते. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ आपण त्यांच्यावर गोळ्या चालवल्याचे सांगून रेमंडने आपला बचाव केला. तर अमेरिकन सरकारने रेमंड हा वाणिज्य दूतावासाचा कर्मचारी असल्यामुळे त्याला राजकीय संरक्षण मिळालेच पाहिजे म्हणून रेमंडच्या सुटकेची जोरदार मागणी केली.

मात्र प्रत्यक्षात हे दोघेही पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI चे हेर होते आणि त्यांना रेमंडवर लक्ष ठेवण्याचे काम देण्यात आले होते. स्वतः सुरक्षारक्षक असलेल्या रेमंडचा होरा अचूक ठरला होता. मात्र या घटनेमुळे ISI आपल्या गुप्तहेरांना देत असलेल्या प्रशिक्षणाच्या अब्रूचे खोबरे मात्र जगभर झाले.

परंतु, तोपर्यंत लाहोर पोलिसांनी रेमंड विरुद्ध खुनाची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली होती. रेमंडवर दुहेरी खुनाचा गुन्हा सहजपणे शाबित झाला असता. म्हणजे फाशीचीच शिक्षा. आता मात्र अमेरिकन सरकारने भिकमाग्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सरकारला अक्षरशः हग्या दम भरला. एकाअर्थी गर्भित धमकीच दिली म्हणाना.

आम्हाला आमचा नागरिक रेमंड ॲलन डेव्हिसच्या अंगावर एक ओरखडा न निघता जिवंत (safe and alive) परत पाहिजे. तोही ताबडतोब. त्यासाठी तुम्हाला जे करायचे असेल ते करा पण आम्हाला आमचा रेमंड परत पाहिजे.

Beggar has no choice… अमेरिकेसमोर कायम भिकेचा कटोरा पसरलेल्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या सरकारला अमेरिकेच्या गर्भित धमकीचा अर्थ बरोबर कळला.

रेमंडला “दियत” किंवा दिया (diyya) चा आधार Blood Money

रेमंड जवळपास ७ आठवडे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या तुरुंगात होता. युसुफ रझा गिलानी यांच्या सरकारने एक अफलातून पळवाट शोधली. इस्लामी कायद्यानुसार दियत (دیت) किंवा दिया (diyya) नावाची एक भन्नाट तरतूद आहे. बळी किंवा बळीच्या वारसांना खून, शारीरिक आणि किंवा मालमत्तेचे जाणीवपूर्वक नुकसान केले असल्यास गुन्हेगार पीडित व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक भरपाई (blood money) देऊ करतो व त्या बदल्यात पीडित व्यक्ती किंवा त्याचे कुटुंब गुन्हेगाराला माफ करते. या कायद्याचा मुख्य उद्देश सुडाची भावना किसास (qisas… قصاص) संपवून क्षमाशीलता आणि सलोख्याला प्रोत्साहन देणे हा आहे असे इस्लामिक तत्त्वज्ञान सांगते.

शरिया कायद्यात दियतची कोणतीही एक निश्चित रक्कम नाही. ती प्रामुख्याने गुन्हेगार आणि पीडित कुटुंब यांच्यातील चर्चेतून ठरवली जाते. पारंपारिकपणे एका प्रौढ पुरुषाच्या मृत्यूची भरपाई १०० उंटांच्या मूल्या इतकी मानली जाते.

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सरकारने रेमंडचा खटला फौजदारी न्यायालयातून उचलून शरिया न्यायालयात आणला. कारण दियाची रक्कम केवळ शरिया न्यायालयातच ठरू शकते. शरिया न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली आणि निकाल लागला. रेमंडने दोन्ही पीडित त्यांच्या कुटुंबांना मिळून २३ लाख अमेरिकन डॉलर दिया (blood money) म्हणून द्यावेत. आणि त्या बदल्यात दोन्ही पीडित कुटुंबांन कोणतीही सुडाची किसासची भावना न ठेवता विशाल हृदयाने रेमंडला माफ करावे. (बहुदा २०११ इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये १ उंटाची किंमत ११.५० लाख डॉलर असावी.) रेमंडने शरिया न्यायालयाचा निर्णय (मनातल्या मनात हसत हसत) मान्य केला. दोन्ही पीडित कुटुंबांना दियाची रक्कम हातोहात मिळाली आणि रेमंड ताबडतोब एका विशेष विमानाने अफगाणिस्तान मधील अमेरिकेच्या हवाई तळावर रवाना झाला.

लाहोरच्या भर बाजारात इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या २ नागरिकांना गोळ्या घालून ठार मारणाऱ्या एका अमेरिकन पासपोर्टधारक खाजगी सुरक्षा रक्षकाला कोणतीही शिक्षा झाली नाही तिथे. अमेरिकन दूतावासात शिरून थैमान घालणाऱ्या जिहाद्यांना ठार मारणाऱ्या अमेरिकन सुरक्षा रक्षकांना कोणतीही शिक्षा होईल हे असंभव आहे.

पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची…

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सरकारला लष्कराला पोलिसांना हा आपल्याच नागरिकांचा झालेला नरसंहार सहज टाळता आला असता. पण एकूण घटनाक्रम बघता तो त्यांनी मुद्दामहून होऊ दिला असे खात्रीने म्हणता येते. कारण अमेरिका आणि इस्त्राएलच्या संयुक्त कारवाईत शनिवार, २८ फेब्रुवारीला मारले गेलेले इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला अली खामेनी हे शियापंथीय सर्वोच्च धर्मगुरू होते. त्यातही बाराइमामी शिया पंथीय. म्हणजे रस्त्यावर उतरणार होते ते फक्त बाराइमामी शिया पंथीय नागरिक. शिया पंथीयांमधील दाऊदी बोहरा, इस्माईली खोजा, जाफरी या पंथांचा अयातुल्ला अली खामेनी यांच्याशी सुतराम संबंध नाही. त्यांचे धर्मगुरू वेगळे आहेत. दाऊदी बोहरांचे सय्यदना आणि इस्माईल खोजांचे प्रिन्स आगाखान. त्यामुळे ते रस्त्यावर उतरण्याचा प्रश्नच नव्हता. (भारतात देखील बाराइमामी शिया पंथीय नागरिकांची लक्षणीय लोकसंख्या असलेल्या लखनौ कारगिल अशा मोजक्याच ठिकाणी निदर्शने झाली.)

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानात इस्त्राएलचा एकही दूतावास नाही. आहे तो फक्त अमेरिकेचा. ते ही मोजून ४ शहरांत. राजधानी इस्लामाबादला मुख्य दूतावास आणि लाहोर, कराची नि पेशावरमध्ये वाणिज्य दूतावास. म्हणजे निदर्शने फक्त या ४ ठिकाणीच होणार होती. तीही फक्त बाराइमामी शिया पंथीयांचीच.

अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येची बातमी आल्याबरोबर ताबडतोब या ४ अमेरिकन दूतावासांच्या बाहेर पुरेसे पोलिस आणि निमलष्करी दलाचे रेंजर्स (आपल्याकडच्या CRPF ला तिथे रेंजर्स म्हणतात) तैनात करता आले असते. मनुष्यहानी न होता निदर्शकांना पांगवण्यासाठी बॅरिकेड्स, लाठीमार, पाण्याचे फवारे, अश्रुधुर, रबरी गोळ्या असे अनेक प्रभावी उपाय पोलीस आणि रेंजर्स योजू शकत होते. पण यातील त्यांनी काहीच केले नाही कारण अमेरिकन दूतावासात बाराइमामी शिया पंथीय आंदोलकांनी अराजक माजवून अमेरिकन सुरक्षा रक्षकांच्या गोळ्यांना ते बळी पडावेत हीच. सुन्नी बहुल इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सरकारची पोलिसांची रेंजर्सची पुरेपूर आंतरिक इच्छा होती. पाहुण्याच्या लाठीने “बाराइमामी शिया पंथीय साप” मरत असेल तर त्यांना ते हवेच होते आणि तेच त्यांनी केले. आंदोलकांची प्रेते अमेरिकन दूतावासातून बाहेर यायला सुरुवात झाल्यावर कराची पोलिसांनी तिकडे धाव घेतली. सगळे अगदी सुनियोजित पद्धतीने झाल्यासारखा हा सगळा घटनाक्रम आहे. डोळे मिटून मांजर दूध पिते तेव्हा तिला वाटते की जग आपल्याला बघत नाही. पण जगाला सगळं दिसत असतं. त्यातलाच हा सगळा प्रकार आहे.

आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी…

सकल हिंदू समाजाचा वंशविच्छेद करून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यावेळी शिया आणि सुन्नी मुसलमान काफीरांच्या नरसंहारात खांद्याला खांदा लावून एकत्र होते. इतके की सुन्नी बहुल इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची निर्मिती कायदे आजम बॅरिस्टर मोहम्मद अली जिना या शिया पंथातील एका इस्माईल खोजा मुसलमानाने केली होती. पुढे तेथील जनतेने शिया पंथीय झुल्फिकार अली भुट्टो यांना पंतप्रधान म्हणून निवडून दिले होते. त्यांच्या पत्नी, नुसरत भुट्टो, या इराणमधील शिया कुटुंबातील होत्या. पुढे त्यांची मुलगी बेनझीर भुट्टो ही देखील पंतप्रधान झाली. त्यांचे पती आसिफ अली झरदारी हे देखील शिया पंथीय आहेत.

पण ८५% हून अधिक सुन्नी मुसलमान लोकसंख्या असलेल्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये झुल्फिकार अली भुट्टो यांनी आपली शियापंथीय असल्याची ओळख कायमच लपवून ठेवली. विषय राजकीय अस्तित्वाचा असल्यामुळे आपण शिया पंथीय आहोत हे जाहीरपणे सांगण्याचे धाडस भुट्टो परिवाराला कधीच झाले नाही. कारण हिंदू काफीरांचे अस्तित्व संपवून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर तिथल्या सुन्नी मुसलमानांसाठी “काफीरां”ची फक्त हिंदू ही संकुचित व्याख्या व्यापक झाली. आता त्यात शिया व अहमदिया (यांनाच कादियानी असेही म्हणतात) आले. आपल्याच इस्लामिक प्रतिमेचे शिया आणि अहमदिया मुसलमान आज वैरी ठरले आहेत.

मोहरम… धुडूम धाड धडाम…

इस्लामी कॅलेंडरचा पहिला महिना… (मुहर्रम) मोहरम… इ.स. ६८० (हिजरी सन ६१) मध्ये इराकमधील करबलाच्या मैदानावर जुलमी शासक यजीद आणि इमाम हुसैन यांच्या सैन्यात युद्ध झाले. या युद्धात इमाम हुसैन यांनी स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे बलिदान दिले. मोहरमच्या १० व्या दिवसाला ‘आशुरा’ म्हणतात. जो या महिन्यातील सर्वात महत्वाचा आणि अतीव दुःखाचा पण पवित्र दिवस आहे.

शिया पंथीय मुसलमान इमाम हुसैन यांच्या हौतात्म्याबद्दल मजलिस (मेळावे) आयोजित करतात आणि शोक व्यक्त करतात. इमाम हुसैन यांच्या हौतात्म्याचे स्मरण करण्यासाठी, बांबू, लाकूड आणि रंगीत कागदापासून ‘ताजिया’ (प्रतीकात्मक थडगे) बनवल्या जातात आणि मिरवणुका काढल्या जातात. मात्र सुन्नी मुसलमान या महिन्याच्या ९ आणि १० तारखेला उपवास ठेवतात. ज्याला सुन्नत मानले जाते. मोहरमच्या १० व्या दिवशी (आशुरा) निघणाऱ्या मिरवणुकांवरून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये अनेकदा वाद उद्भवतात भीषण दंगली देखील होतात. कराचीमध्ये १९७८, १९८३ आणि अलीकडच्या काळात २०२० मध्येही मोठ्या प्रमाणावर शिया-सुन्नी तणाव निर्माण झाला होता.

सध्या कराचीमध्ये मोहरमच्या मिरवणुकीसाठी विशेषतः ८, ९ आणि १० व्या दिवशी (आशुरा), अत्यंत कडक आणि बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाते. किती? या सुरक्षा व्यवस्थेवर नुसती नजर टाकली तरी आपल्याला तिथल्या शिया-सुन्नींमधील हाडवैराची कल्पना येईल. मिरवणुकीच्या सुरक्षिततेसाठी कराचीमध्ये २०,००० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि निमलष्करी दल (रेंजर्स) तैनात केले जातात. काही प्रसंगी संपूर्ण सिंध प्रांतात ही संख्या ५०,००० च्या वर जाते.

मुख्य मिरवणूक मार्ग, विशेषतः एम.ए. जिना रोड (M.A. Jinnah Road), गुरु मंदिर ते टॉवरपर्यंत सर्व वाहतुकीसाठी बंद केला जातो. सुरक्षिततेसाठी या मार्गाला जोडणारे छोटे रस्ते आणि गल्ल्या ‘शिपिंग कंटेनर्स’ लावून पूर्णपणे सील केल्या जातात.

सुरक्षेच्या कारणास्तव मिरवणूक मार्गावरील आणि आसपासच्या परिसरातील मोबाईल फोन आणि इंटरनेट सेवा तात्पुरती खंडित केली जाते. सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे पाळत: संपूर्ण मार्गावर १,२०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे २४ तास नियंत्रण कक्षातून देखरेख केली जाते.

मिरवणुकीच्या काळात शहरात दुचाकीवर डबल सीट (pillion riding) प्रवास करण्यास बंदी घातली जाते. कारण, दुचाकीवर मागे बसलेला सुन्नी मुजाहिदीन कधी कोणत्या काफीर शियावर गोळीबार करून दोघे दुचाकीस्वार पसार होतील याचा नेम नसतो. मिरवणूक मार्गावरील सर्व दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठाने आधीच सील केली जातात. उंच इमारतींच्या छतावर स्नयपर्स (निशाणेबाज) तैनात केले जातात. कराची ट्रॅफिक पोलीस एक सर्वसमावेशक वाहतूक आराखडा जाहीर करतात, ज्यानुसार सामान्य वाहतूक पर्यायी मार्गांवरून (उदा. निश्तर रोड, गार्डन परिसर) वळवली जाते. भारताशी युद्धजन्य परिस्थितीतही कराचीत एवढी सुरक्षा ठेवली जात नसेल पण हे काफीर शियांविरुद्धचे धर्मयुद्ध आहे.

स्वतःला “इस्लामिक” देश म्हणून घेणाऱ्या पाकिस्तानमधील शिया पंथीय मुसलमानांची आज ही दुर्दशा आहे. मोहरमच्या सुरक्षा व्यवस्थेत थोडी तरी गफलत झाली तरी मोहरम म्हणजे धुडूम धाड धडाम.

अहमदिया… इस्लाम मधूनच सफाया…

अहमदिया मुसलमानांच्या विरोधात १९५३ साली प्रचंड मोठी दंगल झाली. ज्यामध्ये शेकडो अहमदियांची कत्तल करण्यात आली. यानंतर लाहोरमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला. या दंगलींची चौकशी करण्यासाठी १९ जून १९५३ रोजी न्यायमूर्ती (मोहम्मद) मुनीर समिती (Munir Commission) गठीत करण्यात आली होती. या समितीचा अहवाल ‘मुनीर अहवाल’ (Munir Report) म्हणून ओळखला जातो. १० एप्रिल १९५४ रोजी ६२४ पानांचा सविस्तर असा मुनीर अहवाल सादर करण्यात आला. समितीने विविध धार्मिक नेत्यांना “मुस्लिम कोणाला म्हणावे?” असा प्रश्न विचारला. परंतु त्या सर्वांच्या व्याख्या एकमेकांशी विसंगत होत्या. म्हणजे मुसलमानांमधील प्रत्येक फिरक्या (sect) चा धार्मिक नेता फक्त आपला फिरका हाच खरा मुसलमान आणि बाकीचे सगळे फिरके हे काफीर असल्याचे ठामपणे मुनीर समितीला सांगत होता. इतका हा आंतरिक विसंगतीने भरलेला इस्लामिक देश आहे.

नंतर १९७४ च्या दंगलीतील हिंसाचारानंतरच तत्कालीन शिया पंथीय पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी अहमदियांना घटनात्मकरीत्या ‘गैर-मुस्लिम’ घोषित केले. म्हणजे इथे अहमदियांना काफीर घोषित करण्यासाठी शिया आणि सुन्नी यांच्यात एकमत झाले होते. पुढे १९९३ साली इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील अहमदिया हे गैर मुस्लिम असल्याच्या सरकारी निर्णयावर शिक्कामोर्तब केले. २०१० साली लाहोरमधील २ अहमदिया मशिदींवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ८० हून अधिक अहमदिया मारले गेले होते.

एकट्या २०२५ मध्ये जवळपास ३८१ अहमदिया कबरींची विटंबना करण्यात आली आणि ३८ हून अधिक मशिदींना लक्ष्य करण्यात आले. अनेक ठिकाणी अहमदिया मशिदींचे मिनार पाडण्यात आले. ईद-उल-अधा (बकरी ईद) दरम्यान नमाज अदा करण्यापासून रोखण्यासाठी अनेक अहमदियांना अटक करण्यात आली आणि त्यांच्या मशिदी सील करण्यात आल्या. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या कायद्यानुसार अहमदियांना स्वतःला मुस्लिम म्हणणे, अजान देणे किंवा इस्लामिक चिन्हांचा वापर करणे हा पाकिस्तानात गुन्हा मानला जातो.थोडक्यात इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान या “इस्लामिक” देशातून अहमदिया मुसलमानांचा पद्धतशीर सफाया करण्यात आला आहे आणि आता सुन्नी मुसलमानांची वक्रदृष्टी शिया मुसलमानांवर वळली आहे.

फिरके ते फिरके… गृहयुद्धाला भाषावादाची फोडणी…

भारतीय उपखंडातील आणि पर्यायाने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान मधील सुन्नी मुसलमान हे बहुसंख्येने “हनफी” मतावलंबी आहेत. त्यामानाने सुन्नी मुसलमानांमधील हनबली शाफी आणि मालिकी मतावलंबी अगदीच नगण्य संख्येने आहेत. त्यामुळे आपल्याला वाटेल की, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधील हनफी मतावलंबी आपसात अतिशय गुण्यागोविंदाने राहत असतील. तर तो आपला सगळ्यात मोठा गैरसमज आहे.

१४ ऑगस्ट १९४७ रोजी इतिहासात पहिल्यांदा धर्माच्या आधारावर आमच्या मातृभूमीचे विभाजन करून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान बनला तो मुख्यतः ५ भाषिक सुन्नी मुसलमानांच्या जोरावर बंगाली, पंजाबी, सिंधी, पश्तो आणि आमच्याकडून “अपनेवालों का देश” म्हणून रावीपार कराची हैदराबादला गेलेले भीकमागे उर्दू भाषिक “मोहाजीर”.

कायदे आझम बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना यांनी सुरुवातीला कलातच्या स्वातंत्र्याला पाठिंबा दिला होता आणि ११ ऑगस्ट १९४७ रोजी तसा करारही झाला होता. सुमारे ७ महिने स्वतंत्र राहिल्या नंतर खान ऑफ कलातच्या डोक्यावर बंदूक ठेवून २७ मार्च १९४८ रोजी स्टेट ऑफ कलात इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये बळजबरीने विलीन करून घेण्यात आले. त्यामुळे यांच्यात ६व्या बलुची भाषिकांची भर पडली.

अकेले बचेंगे तो भी लडेंगे…

मात्र स्वातंत्र्यानंतर अल्पावधीतच इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये भाषिक दंगली (लसानी फसादात… لسانی فسادات) सुरु झाले. याला कारण इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या पंजाबी भाषिक सुन्नी मुसलमानांचे. राजकीय प्रशासनिक औद्योगिक लष्करी क्षेत्रातील एकहाती वर्चस्व व कमालीची दादागिरी. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे सैन्य म्हणजे गणवेश घातलेली पंजाबी भाषिक सुन्नी मुसलमानांची जिहादी आतंकवादी फौज आहे असे खुद्द तिथली जनताच मानते. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधील आजच्या अराजकाचा ल.सा.वि. आहे. पंजाबी भाषिक सुन्नी मुसलमान जनसंख्येच्या सुमारे ४०% असलेल्या पंजाबी भाषिक सुन्नी मुसलमानाला प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे निर्विवाद वर्चस्व हवे आहे. अन्य कोणात्याही भाषिक स्वधर्मबंधूचे देखील वर्चस्व तो मान्य करत नाही. किंबहुना अन्य कोणी भाषिक सुन्नी मुसलमान वरचढ होत असेल तर त्याला खच्ची करण्यासाठी हा पंजाबी भाषिक सुन्नी मुसलमान कोणत्याही थराला जाऊ शकतो. आणि साम दाम दंड भेद या नीतीतला “भेद” तो पहिल्यांदा वापरतो कारण त्याची लिपी उजवीकडून डावीकडे वाचली जाते.

याच दादागिरीला कंटाळून स्वातंत्र्यानंतर अवध्या २५ वर्षांत १९७१ साली पूर्वेकडच्या बंगाली भाषिकांच्या बंगाली भाषिक अस्मितेने इस्लामी मजहबच्या अस्मितेच्या चिंधड्या उडवल्या आणि पूर्व इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचा बांगलादेश झाला. बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या वेळी पश्चिमेच्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सैन्याने पूर्वेकडच्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या बंगाली भाषिक सुन्नी मुसलमान जनतेवर विशेषतः महिलांवर जे अनन्वित अत्याचार केले आहेत. त्याचे वर्णन आपल्याला वाचवत देखील नाही.

खैबर पख्तुनख्वाच्या पश्तो भाषिक पश्तूनां (पठाण)नी ना कधी ड्युरांड लाईन मानली ना इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची पंजाबी हुकमत त्यांच्यासाठी अफगाणिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा हे दोन वेगळे नाहीतच. त्यांच्या दृष्टीने हे दोन्ही फक्त कागदावरच आहेत. आणि वास्तविकता देखील तशीच आहे.

आज पश्तूनांच्या दहशतवादी तेहरिक ए तालिबान पाकिस्तान (TTP) गटाने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सरकारच्या तोंडाला अक्षरशः फेस आणला आहे. धुरंधर चित्रपटात दाखवलेल्या खुंखार पोलीस अधिकारी असलम चौधरी याची याच TTP ने ९ जानेवारी २०१४ रोजी कराचीच्या ल्यारी एक्सप्रेस वेवर RDX चा भीषण स्फोट घडवून हत्या केली होती.

बलुच भाषिकांच्या बलुच लिब्रेशन आर्मीने (BLA) बलुचिस्तानचा ताबा घेतलेला आहे. त्यांना स्वतंत्र देश हवा आहे. कारण ते म्हणतात आम्ही इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचा भाग कधीच नव्हतो. आमच्या डोक्यावर बंदूक ठेवून विलीनीकरण करण्यात आले आहे. हे विलीनीकरण आम्हाला मान्य नाही. आम्हाला आमचा देश द्या.

धुरंधर चित्रपटात आपण कराचीतला जीवघेणा भाषिक संघर्ष पाहिलेला आहे. सबंध कराचीवर उर्दू भाषिक भीकमाग्या (भूखेनंगे) मोहाजीरांची एकहाती सत्ता असताना बलुच सरदार रहमान डकैतने कराचीचाच एक भाग असलेल्या ल्यारीला मोहाजीरांच्या वर्चस्वापासून दूर ठेवले होते. उर्दू भाषिक मोहाजीर बलुच्यांच्या बलुच भाषिक उर्दू भाषिक मोहाजीरांच्या. हे दोघे पश्तो भाषिक पठाणांच्या सोराब गोठ सारख्या भागात आणि पश्तो भाषिक पठाण या दोघांच्या मोहोल्ल्यात चुकूनही जाऊ शकत नसत. गेलेच तर जिवंत परत येतील याची कोणतीही शाश्वती नसे.

भीकमागे उर्दू भाषिक मोहाजीर आज हिंदुस्तानच्या विभाजनाला “ऐतिहासिक घोडचूक” (historical blunder) म्हणत आहेत. उद्या यदा कदाचित इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे विभाजन झाले तर आम्हाला कराची आणि त्याच्या आसपास आमचे वेगळे “मोहाजीरास्तान” हवे असे त्यांची मागणी आहे. आज हे सगळे उघडपणे कोणी बोलत नसले तरी उद्या वेळ आल्यावर जे आपल्या मायभूमी हिंदुस्तानशी एकनिष्ठ राहू शकले नाहीत ते इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानशी काय एकनिष्ठ राहणार आहेत..?

या सगळ्या अत्याचारांनी विशेषतः पंजाबी आणि आपल्या त्यात उर्दू भाषिक मोहाजीरांच्या गुंडगिरीने  पिचलेला सिंधचा सिंधी भाषिक सुन्नी मुसलमान आपण सिंधू पुत्र आहोत. आम्हाला आमचा वेगळा “सिंधू देश” पाहिजे म्हणून आक्रमक पवित्रा घेऊन उभा आहे.

थोडक्यात म्हणजे, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान मधील प्रत्येक सुन्नी मुसलमान दुसऱ्या सुन्नी मुसलमानाशी रोज लढतो आहे. कधी इस्लाममधील शिया-सुन्नी पंथावरून, कधी इस्लाममधीलच फिरक्यांवरून, तर कधी मुसलमानांमधील भाषेवरून “निमित्तं किम् दरिद्रता”।

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची निर्मितीच किमान ६ लाख हिंदूंच्या प्रेतावर आमच्या हजारो आया बहिणींची अब्रू लुटून झालेली आहे. त्या देशाच्या निर्मितीची मानसिकताच “जिहादी” आहे. त्यामुळे काही ना काही निमित्त शोधून जनता सुद्धा कायम जिहाद करत असेल तर त्यात आश्चर्य ते काय?. आज इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये अक्षरशः अराजक माजलेले आहे. It is a Failed State.

एकमेव उपाय… अखंड भारत

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या या सर्व समस्येवर एकमेव रामबाण उपाय आहे तो म्हणजे अखंड भारत.

सांस्कृतिकदृष्ट्या आपण एक राष्ट्र आहोत. आपले पूर्वज एक आहेत. आपला इतिहास एक आहे. काही पिढ्यांपूर्वी लालसेने धाकधपटशाने किंवा नाईलाजाने तुमच्या पूर्वजांनी उपासना पंथ बदलला असेल पण आपला सांस्कृतिक DNA एकच आहे याची जाणीव हळूहळू इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या जनतेला होऊ लागलेली आहे. सिंधमधली स्वतंत्र सिंधू देशाची चळवळ याच वैचारिक आधारावर उभी राहत आहे. यावर्षी रावीपारच्या पंजाबमधील वसंत महोत्सवाचा माहोल,

“संस्कृती सब की एक चिरंतन खून रगों में हिंदू है।”

या त्रिकालबाधित सत्याची आपल्या (हिंदू) पूर्वजांच्या DNA ची ओळख करून देत होता.

पश्तूनांना तर ऐतिहासिक काळापासून हिंदू आणि हिंदुस्तान बद्दल एक विशेष आपुलकी आहे. धर्म एक असूनही ते इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचा प्रचंड द्वेष करतात. स्वतंत्र बलुचिस्तानसाठी बलुच लिबरेशन आर्मी भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान मधील हे अराजक संपवायचे असेल तर,


“दिन दूर नहीं खंडित भारत को पुनः अखंड बनाएंगे,
गिलगित से गारो पर्वत तक आजादी पर्व मनाएंगे।
उस स्वर्ण दिवस के लिए आज से कमर कसें बलिदान करें
जो पाया उसमें खो न जाएँ, जो खोया उसका ध्यान करें॥”

यासाठी सकल हिंदू समाजाने कटिबद्ध झाले पाहिजे.

अन्य लेख

संबंधित लेख