Wednesday, March 4, 2026

नांदेडकरांसाठी मोठी बातमी! ३१ मार्चपासून ‘गोवा’ विमानसेवा सुरू; नागपूर आणि बंगळुरूसाठीही नवे उड्डाण

Share

नांदेड : नांदेडच्या दळणवळण आणि पर्यटनाला मोठी गती देणारा निर्णय झाला असून, बहुप्रतिक्षित नांदेड–गोवा विमानसेवा ३१ मार्चपासून प्रत्यक्ष सुरू होत आहे. यासोबतच प्रवाशांच्या मागणीखातर नांदेड–नागपूर सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात येत आहे. तर २९ मार्चपासून नांदेड-बंगळुरू ही अतिरिक्त सेवाही प्रवाशांच्या दिमतीला येणार आहे.

स्टार एअर (Star Air) : गोवा-नांदेड-नागपूर सेवा
‘स्टार एअर’ कंपनीच्या वतीने ही सेवा मार्चअखेरीस सुरू होणार आहे. शुक्रवार वगळता आठवड्यातील ६ दिवस ही विमानसेवा उपलब्ध असेल.

वेळापत्रक खालीलप्रमाणे

गोवा (मोपा) ते नांदेड : सकाळी ९:३० वाजता प्रस्थान | सकाळी १०:५० वाजता आगमन.

नांदेड ते नागपूर : सकाळी ११:२० वाजता प्रस्थान | दुपारी १२:१० वाजता आगमन.

नागपूर ते नांदेड : दुपारी १२:४० वाजता प्रस्थान | दुपारी १:३० वाजता आगमन.

नांदेड ते गोवा (मोपा) : दुपारी २:०० वाजता प्रस्थान | दुपारी ३:२० वाजता आगमन.

बंगळुरूसाठी दोन पर्याय
‘फ्लाय ९१’ (Fly91) ही कंपनी २९ मार्चपासून नांदेड-बंगळुरू सेवा सुरू करत आहे. यामुळे नांदेडहून आयटी हब असलेल्या बंगळुरूसाठी आता दोन विमानसेवा उपलब्ध होतील, ज्याचा फायदा शिक्षण आणि नोकरीनिमित्त जाणाऱ्या तरुणांना मोठ्या प्रमाणात होईल.

आता ८ प्रमुख शहरांशी थेट संपर्क
या नवीन सेवांमुळे नांदेडचा श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळ आता देशातील प्रमुख शहरांशी जोडला जाणार आहे. नांदेडहून आता खालील शहरांसाठी थेट विमानसेवा मिळेल.
१. मुंबई २. पुणे ३. नागपूर ४. गाझियाबाद (हिंडन) ५. अहमदाबाद ६. गोवा ७. बंगळुरू ८. हैदराबाद.

विकासाला नवी भरारी
नांदेड हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. या विमानसेवेमुळे जगभरातील शीख भाविकांना ‘सचखंड श्री हुजूर साहिब’ येथे येणे सोपे होईल. तसेच औद्योगिक क्षेत्र, पर्यटन आणि व्यापार क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख