Tuesday, August 18, 2026

बूंदसे गयी सो… संपूर्ण वंदे मातरमचा कांग्रेस द्वेष

Share

यावर्षी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाला दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात शासकीय शिष्टाचाराप्रमाणे (protocol) राष्ट्रगीताचा दर्जा असलेले “वंदे मातरम्” म्हणायला सुरुवात झाली… २ ऱ्या कडव्यानंतर मात्र काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी खूपच अस्वस्थ झाल्या… त्यांनी आपल्या परीने खाणाखुणा करून… एका कार्यकर्त्याला बोलावून घेऊन… सूचना देऊन वंदे मातरम थांबवण्याचे प्रयत्न केले… आज्ञाधारक सेवकाप्रमाणे काँग्रेसचे कामचलाऊ आणि नामधारी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पण त्यांची साथ दिली… पण त्या दोघांच्या दुर्दैवाने वंदे मातरम थांबले नाही… त्यामुळे पुढचे कडवे “तुमि विद्या, तुमि धर्म तुमि हृदि, तुमि मर्म”… ने सुरू झाले आणि ते ऐकून तर सोनिया गांधींचा बहुदा तिळपापड उडाला असावा… तरीही वंदे मातरम् थांबले नाही कारण ते म्हणणाऱ्या काँग्रेस सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी सोनिया गांधींच्या काँग्रेस बरोबर देशाचे मीठदेखील खाल्ले होते… आणि ते देशाच्या खाल्लेल्या मिठाला जागले…

म्हणे म्हणे पर्यंत “त्वम् हि दुर्गा दशप्रहरणधारिणी” आलं… आणि सोनिया गांधी हतबल झाल्या… त्या कडव्यातल्या शेवटच्या “नमामि कमलाम्…” ने तर बहुदा त्यांच्या कानात उकळलेले शिसे ओतले गेले…पण तरीही वंदे मातरम् थांबले नाही… शासकीय शिष्टाचाराप्रमाणे वंदे मातरम पूर्ण झाल्यामुळे काँग्रेसची अब्रू वाचली.. मात्र सोनिया गांधी यांच्या देशद्रोही चाळ्यांमुळे… “बूंदसे गई सो हौद से नहीं आएगी”… अशी काँग्रेसची भयंकर कुचंबणा झाली आहे… सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठी खुर्ची मागवत होत्या अशी सारवासारव काँग्रेस कडून होत असली तरीही…आपल्याच पक्षाच्या राज्यसभा खासदार असलेल्या पवन खेडा यांचे नाव माहीत नसल्यामुळे पत्रकारांकडे त्यांचा उल्लेख… “वह सफेद बालवाला” म्हणून करणाऱ्या सोनिया गांधी… काँग्रेसचे कामचलाऊ आणि नामधारी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठी खुर्ची मागवतील याची सुतराम शक्यता नाही… शिवाय त्या व्हिडिओमध्ये दिसणारे त्यांचे हावभाव हे वंदे मातरम दाखवण्याचेच होते हे स्पष्टपणे दिसते आहे…

सोनिया गांधींच्या माहेरच्या देशाचे अर्थात इटालीचे राष्ट्रगीत म्हणण्यासाठी ३ मिनिटे १६ सेकंद लागतात… आपल्या माहेरच्या देशाच्या राष्ट्रगीतासाठी त्या निश्चितपणे स्तब्धपणे उभ्या राहिल्या असणार…संपूर्ण वंदे मातरम म्हणण्यासाठी इटलीच्या राष्ट्रगीतापेक्षा ६ सेकंद कमी म्हणजे ३ मिनिटे १० सेकंद लागतात… तरीही सोनिया गांधी यांनी एवढ्या अल्प वेळात देखील तमाशा केला कारण…

काँग्रेसचा संपूर्ण वंदे मातरम बद्दलचा द्वेष नवा नाही…कोट्यावधी भारतीयांना स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा देणाऱ्या बंकीमचंद्रांच्या आनंद मठ कादंबरीतील “वंदे मातरम” गीताची काँग्रेसने अक्षरशः विटंबना केली आहे…मुस्लिम मतांच्या लांगुलचालनासाठी काँग्रेसने मूर्तीपूजा, अल्पसंख्यांकांच्या धार्मिक भावना, धरतीला माता माननीय इस्लामला मान्य नाही अशी विविध तकलादू कारणे देऊन… ६ कडव्यांचे वंदे मातरममध्ये काटछाट केली… ऑक्टोबर १९३७ मध्ये कलकत्ता येथे काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत पहिली २ कडवी स्वीकारली… स्वातंत्र्यानंतर आणि इतिहासात पहिल्यांदा धर्माच्या आधारावर आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे विभाजन करून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान वेगळा दिल्यानंतर काँग्रेसने केलेल्या या राजकीय तडजोडीची चूक सुधारण्याची सुवर्णसंधी होती… मात्र तीही काँग्रेसने साधली नाही… मुळात वंदे मातरम् ला राष्ट्रगीताचा दर्जाच दिला नाही… त्याला राष्ट्रीय गीत म्हटले गेले… हा तर अक्षम्य अपराध होता…

त्या अपराधाचे परिमार्जन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारने केले… ११ ऑगस्ट २०२६ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर संसदेत मंजूर झालेल्या ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक, २०२६’ द्वारे ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला राष्ट्रगीताच्या समकक्ष कायदेशीर दर्जा व संरक्षण दिले…

मात्र त्या आधी १९२३ साली आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते… त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष होते मौलाना मोहम्मद अली जौहर… हे महाभाग भारतातील खिलाफत आंदोलनाचे अग्रणी होते…अधिवेशनाची सुरुवात नेहमीप्रमाणे ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने होणार होती… आणि ते म्हणणार होते पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर…हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील ग्वाल्हेर घराणे या गायकी शैलीसाठी विशेष प्रसिद्ध होते… त्यांनी ध्रुपद शैलीचेही शिक्षण घेतले होते आणि शास्त्रीय संगीतासोबतच भजन व देशभक्तीपर गीतांच्या प्रसारात त्यांचे मोठे योगदान होते…पंडितजींनी आपल्या भारदस्त आवाजात ‘वन्दे मातरम्’ म्हणायला सुरुवात केली आणि काँग्रेसचे अध्यक्ष मोहम्मद अली यांनी त्यांना मध्येच थांबवत… भर अधिवेशनात आपल्या धर्माचा हवाला देऊन पंडितजींनी वंदे मातरम न म्हणण्याचा फतवा काढला…मात्र लहानपणी एका दुर्घटनेमुळे अंशतः अंधत्व आलेल्या परंतु अंतःचक्षु उघडे असलेल्या पंडित पलुस्करांनी… “हा काँग्रेसचा राष्ट्रीय मंच आहे; तुमचे धर्मस्थळ नाही! त्यामुळे इथे एका विशिष्ट धर्माचे नियम लागू होऊ शकत नाहीत.” असे निर्भीडपणे सांगून काँग्रेस अध्यक्षनांच उडवून लावले व संपूर्ण वंदे मातरम खड्या सुरात म्हणायला सुरुवात केली…पंडित पलुस्कर यांनी आपले वंदे मातरम चालू ठेवल्यामुळे… मौलाना मोहम्मद अली जौहर भयंकर नाराज झाले व तोंड काळे करून व्यासपीठावरून निघून गेले…पंडितजींनी त्यांची पर्वा न करता वंदे मातरम संपूर्ण म्हटले… त्या अधिवेशनात उपस्थित असलेले हिंदू प्रतिनिधी मात्र मनोमन प्रचंड सुखावले…

आपल्या आजेसासऱ्यांचा “संपूर्ण वंदे मातरम” द्वेष सोनिया गांधी पुढे चालवत आहे असेच आम्हाला वाटते…त्यातूनही आता २६ जानेवारीला काँग्रेस कार्यालयातील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला सोनिया गांधी कोणता नवीन तमाशा करतात ते पहायचे…

अन्य लेख

संबंधित लेख