Tuesday, August 18, 2026

चिनी-कावा : पाकिस्तानातल्या धरणाने बौद्धकालीन तक्षशिला नष्ट होण्याच्या मार्गावर  

Share

पाकिस्तानने भारत द्वेषातून  पाकव्याप्त जागेवर (PoK) म्हणजे जबरदस्तीने ताबा मिळवलेल्या गिलगिट-बाल्टिस्तान आणि खैबर पख्तूनख्वाच्या सीमेवर, सिंधू नदी खोऱ्यात  उभारण्यात येत असलेला डायमर-भाशा धरण प्रकल्प हा आंतरराष्ट्रीय-वाद निर्माण करणारा जलविद्युत प्रकल्प आहे. यामुळे प्रागैतिहासिक काळापासून असलेला सिंधू खोऱ्यातील शिलालेख (Petroglyphs) व प्राचीन बौद्ध वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. 

डायमर-भाशा या धरणा प्रमाणेच पाकिस्तानात असलेले तरबेला धरण हे सिंधू नदीवर बांधलेले महाकाय जलविद्युत व जलसाठा करणारे धरण आहे. ह्या  धरणामुळे पाकिस्तानातील हजारो कुटुंब विस्थापित झाली, तसेच सिंधू नदीच्या खालच्या भागात पाण्याचा प्रवाह कमी होऊन समुद्राचे पाणी जमिनीत शिरले व शेत जमीन नष्ट झाली. 

जागतिक महामार्ग असलेला सिल्क रूट यावर हे धरण बनत असून, प्राचीन काळापासून आशिया, चीन, भारत आणि पर्शियासाठी हे स्थान व्यापारी तळ म्हणून जरी प्रसिद्ध होत. यात जागतिक विचार, धर्म-संस्कृती या सांस्कृतिक उलाढालीचा हे स्थान अविभाज्य भाग राहिला आहे. या भागात हजारो बौद्ध स्तूप आणि शिलालेख आहेत. हे शिलालेख प्रामुख्याने ब्राह्मी, तिबेटी, भारतीय उपखंड आणि तिबेटच्या पठारावरील समकालीन  प्राचीन भाषेत आहेत. 

या संदर्भात अलीकडेच, अमेरिकेने पाकिस्तानी सरकारला सज्जड दम भरला, जर तक्षशिला भागात दुर्लक्ष्य केलं  तर पाकिस्तानाला मिळणारा  जागतिक वारशाचा दर्जा रद्द केला जाईल. अनेक तज्ञांच्या मते अनावश्यक आणि अवाजवी खर्चिक असलेल्या या प्रकल्पामुळे लाखो कुटुंब विस्थापित होतील व हजारो वर्षांपूर्वीचा बौद्ध इतिहास नष्ट होईल.  

तेजस्वी बौद्ध पारंपारिक वारसा 

बौद्ध कालात  तक्षशिला विद्यापीठ हे आधुनिक अर्थाने केंद्रीय विद्यापीठ हे वेगळ्या धाटणीच म्हणजेच ६० हून अधिक उच्च शिक्षण संस्थांचा एक समूह होता. इथे १६ वर्षे वय पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कठीण तोंडी परीक्षेनंतर प्रवेश मिळत असे. एकूण विद्यार्थ्यांपैकी ३०% विद्यार्थ्यांनाच ही प्रवेश परीक्षा पूर्ण करता येई. या विद्यापीठात वेद, बौद्ध तत्त्वज्ञान, खगोलशास्त्र, गणित, धनुर्विद्या, राज्यशास्त्र आणि आयुर्वेद (वैद्यकशास्त्र) यांसारख्या ६८ विषयांचे शिक्षण दिले जाई. भारत, चीन, पर्शिया (इराण), ग्रीस आणि मध्य आशियातून १०,००० हून अधिक विद्यार्थी येथे शिक्षण घेत असत. या विद्यापीठात  चाणक्य हे (कौटिल्य) अर्थशास्त्राचे आचार्य होते आणि त्यांनी चंद्रगुप्त मौर्याला येथेच घडवले. भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानातील जीवक हे औषधांचे जाणकार किंवा वैद्य होते ,  त्यांनी इथे ७ वर्षे आयुर्वेदाचे अध्ययन केले. त्याचप्रमाणे  पाणिनी हे संस्कृत व्याकरणाचे प्रणेते व अष्टाध्यायी ग्रंथाचे लेखक आणि बौद्ध तत्त्ववेत्ते वसुबंधू या सगळ्या विभूती येथे अनेक वर्ष ज्ञानदानाच्या क्षेत्रात होत्या.  

हजारो वर्षांपूर्वी दक्षिण आशिया, मध्य आशिया आणि पूर्व आशिया यांना जोडणाऱ्या सिंधू नदीच्या खोऱ्यातील सिल्क रूट मार्गावर हजारो बौद्ध स्तूप, कलाकृती आणि शिलालेख निर्माण केले गेले. पुराश्मयुग (Epipaleolithic) ते इस्लाम-पूर्व  बौद्ध सुवर्णयुगापर्यंतच्या मानवी इतिहासाचा पुरावा असलेल्या ५०,००० पेक्षा जास्त कोरीव शिळा(Petroglyphs), कुशाण व गुप्त काळातील बौद्ध अवशेष म्हणजेच हुंझा, चिलास आणि शतियाल (Shatial) परिसरातील खडक, ज्यांवर बुद्धांच्या जातका कथा, स्तूपांची चित्रे आणि प्राचीन व्यापाऱ्यांची नावे कोरलेली आहेत. ब्राह्मी, खरोष्टी, तिबेटी आणि प्राकृत भाषांमधील ५,००० हून अधिक प्राचीन  दुर्मिळ शिलालेख हे सगळे कायमचे नष्ट होतील. UNESCO आणि वर्ल्ड मॉन्युमेंट्स फंड (WMF) यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी तक्षशिला आणि गिलगिट भागातील या दुर्मीळ बौद्ध ठेव्याच्या विनाशाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

रामायणानुसार श्री रामांचे कनिष्ठ बंधू भरत यांनी आपला मुलगा तक्ष याच्या नावावरून या शहराची स्थापना केली आणि त्याचे नाव तक्षशिला असे ठेवले. प्राचीन काळात हे शहर गांधार महाजनपदाची राजधानी होते. मौर्य कालातील सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक यांनी तक्षशिला हे बौद्ध धर्माचे आणि प्रशासनिक कारभाराचे मोठे केंद्र बनवले. तसेच ग्रीको-बॅक्ट्रियन व इंडो-ग्रीक काळात म्हणजे इ.स.पूर्व ३२६ मध्ये सिकंदराच्या आक्रमणानंतर याठिकाणी ग्रीक संस्कृतीचा प्रभाव वाढला. कनिष्क राजाच्या काळात म्हणजे इ.स. पहिली ते दुसरी शताब्दी तक्षशिला येथे बौद्ध धर्म आणि गांधार शिल्प ही कला सुवर्णकाळात पोहोचली. यातील बहुतांश प्राचीन ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. 

या प्रकल्पातून उद्भवणारे  धोके

या प्रकल्पासारखा १९६८ ते १९७६ सिंधू पाणी करारांतर्गत इन्डस बेसिन प्रोजेक्टचा भाग असलेला तरबेला प्रकल्प हा जलविद्युत व जलसाठा करणारा महाकाय  प्रकल्प आहे. 

ज्यामध्ये सिंधू नदीतून मोठ्या प्रमाणावर गाळ वाहात येत असल्याने तरबेला धरणाची मूळ पाणी साठवण क्षमता ३५%-४०% ने घटली. हीच गोष्ट डायमर-भाशा प्रकल्पालाही आहे.  सिंधू नदीचा  गाळ हा या प्रकल्पाला मोठा धोका आहे. तसेच पाकिस्तान सरकारने  तरबेला धरणादरम्यान विस्थापित झालेल्या हजारो पाकिस्तानी कुटुंबांना अनेक  दशकांनंतरही पूर्ण भरपाई किंवा योग्य जमीन दिलेली नाही. या धरणामुळे सिंधू नदीच्या खालील भागातील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने समुद्राचे पाणी जमिनीत शिरून शेकडो एकर शेत जमिनी नष्ट झाल्या.

एवढा सगळा नाश करून पाकिस्तानला भारत द्वेषाचा रोग झाला आहे. याप्रकल्पामुळे  स्वतःच नुकसान करून, त्यातून मिळणारा फायदा कोणता? प्रथम दर्शनी पाहता  धरणाचा मूळ खर्च $१४ अब्ज आहे. आर्थिक दृष्ट्या पूर्ण कफल्लक असलेल्या पाकिस्तानला या महागड्या प्रकल्पात चीन मदतीच्या नावाखाली कर्जाच्या जाळ्यात ओढतो आहे.  चीन या प्रकल्पाच्या माध्यमातून भारतविरोधी कारवायांसाठी जरी  या प्रदेशात आपले कायमस्वरूपी लष्करी व आर्थिक अस्तित्व निर्माण करत आहे असं दाखवत जरी असला, तरी पाकिस्तानची जमीन आणि स्थानिक लष्करी कारवायामुळे चीन यावर सरळ सरळ ताबा घोषित करेल.  

अन्य लेख

संबंधित लेख