Monday, August 25, 2025

अमित साटम यांची भाजप मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती

Share

मुंबई: अमित साटम (Ameet Satam) यांची भाजप मुंबई शहर (BJP Mumbai) अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती जाहीर केली आहे. येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी अमित साटम यांच्या नियुक्तीचे स्वागत करताना सांगितले, “अमित साटम यांच्याकडे अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्वाची क्षमता आहे. मुंबईच्या राजकारणाची त्यांना उत्तम जाण आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप मुंबईत येत्या काळात घोडदौड करेल आणि महायुती पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास आहे.”

यापूर्वी मुंबई भाजपचे अध्यक्षपद सांभाळणारे आशिष शेलार (Ashish Shelar) यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले. “शेलार यांनी २०१७ आणि अलीकडील निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्यासाठी उत्तम काम केले. त्यांनी मुंबईत भाजपला नंबर एकचा पक्ष बनवला,” असे फडणवीस म्हणाले.

अमित साटम यांच्या नियुक्तीमुळे मुंबईतील भाजपच्या संघटनात्मक रचनेला नवीन गती मिळण्याची अपेक्षा आहे. येत्या काही महिन्यांत होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाला नव्या जोमाने लढण्यासाठी साटम यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.

अन्य लेख

संबंधित लेख