Saturday, December 6, 2025

महायुती सरकारची वर्षपूर्ती! ‘हित + विकास’ या समीकरणातून महाराष्ट्राला नवी दिशा – अमित साटम

Share

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने (Mahayuti Sarkar) आज यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण केले आहे. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांनी महायुती सरकारच्या कामगिरीचे कौतुक करताना, ‘हित + विकास = महायुतीची वर्षपूर्ती’ असे वर्णन केले आहे.

अमित साटम यांचे ट्विट

हित + विकास = महायुतीची वर्षपूर्ती

५ डिसेंबर २०२४ रोजी आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार सत्तेत आले आणि त्या दिवसापासून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला नवे बळ, नवी दिशा आणि नवी गती मिळाली. लोककल्याणाला प्राधान्य देणारे निर्णय, प्रशासनातील पारदर्शकता आणि विकासाची अबाधित गती यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. आज राज्यातील सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, महिला, युवक- प्रत्येक घटक महायुती सरकारच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.

महायुती सरकारने गेल्या एका वर्षात महाराष्ट्राच्या हितासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत, शेतकऱ्यांसाठी अधिक सक्षम पीकविमा योजना, पायाभूत सुविधांच्या कामांना दिलेली गती, रस्ते– पूल– सुरक्षा– वाहतूक– स्वच्छता यांसारख्या सर्व क्षेत्रांत केलेली भरीव प्रगती या सर्व निर्णयांचा थेट लाभ जनतेला मिळत आहे. राज्याच्या विकासाला नवा वेग देण्याची ताकद महायुती सरकारने सिद्ध केली आहे.

मुंबई शहरातही देवाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. नागरिकांच्या तातडीच्या गरजा ओळखून विकासकामांना दिलेली प्राधान्यता, हीच आपल्या महायुती सरकारची कार्यशैली आहे.

आज महाराष्ट्राचा विकासमार्ग स्पष्ट आहे- लोकहित प्रथम, विकास सर्वांसाठी आणि निर्णय ठाम व पारदर्शक.

महायुती सरकारचे हे पहिले वर्ष म्हणजे जनतेच्या आकांक्षांना न्याय देणाऱ्या शासनाचा भक्कम पाया. मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकार महाराष्ट्रात शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणार आहे,” असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आणि तिन्ही नेत्यांचे अभिनंदन केले.

अन्य लेख

संबंधित लेख