Tuesday, September 17, 2024

आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय, जाणून घ्या एका क्लिकवर..

Share

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी सर्वसामान्यांच्या हितासाठी सरकार कडून मोठे निर्णय घेण्यात आलेत.

  • मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे :

✅ पुणे – छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार

✅ अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार

✅ शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य

✅ बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान

✅ अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार. ३६ हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार

✅ औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते

✅ थकीत देणी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ

✅ धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार

✅ काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय

✅ पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय

✅ हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा

अन्य लेख

संबंधित लेख