Thursday, October 8, 2026

देशात अराजकता माजवण्याचेच षडयंत्र!

Share

येत्या दहा तारखेला दिल्ली येथील जंतर मंतर वर cjp  आणि अन्य डाव्या विचारसरणीच्या पक्ष व संघटनांनी मोठ्या प्रमाणावर निषेध मोर्चा आणि त्यासाठी कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण घडवून आणण्याचा घाट घातलेला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणांपासून सुरू झालेली ही गोष्ट आता केवळ संवैधानिक विरोध किंवा वैचारिक संघर्ष एवढ्यापुरती मर्यादित न राहता अराजकाच्या दिशेने नेण्याचा मोठा डाव या निमित्ताने रचला जात असल्याचा संशय घेण्यास वाव आहे.

सध्या x हँडल वर cjp नेता सौरव दास याच्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडिओ पाहण्यात येतो आहे. यात त्याने भाजपा आणि अन्य हिंदू संघटनांवर एक मोठा आरोप केलेला दिसून येतो. Cjp समर्थकांची वाढती संख्या बघून सरकार भयभीत झाले असून त्यामुळेच त्यांनी १० तारखेला जंतरमंतर वर  बीजेपी आरएसएस आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्यास सुरूवात केली आहे असा आरोप त्याने केला आहे.  

वास्तुस्थिती अशी आहे की, अशाप्रकारचे कोणतेही स्थलांतर करण्याचे आदेश वरीलपैकी एकही संघटनेने आपल्या कार्यकर्त्यांना अधिकृतपणे दिलेले नाहीत असे कार्यकर्त्यांशी बोलल्यावर समजते. अगदी बजरंग दलाच्या अधिकृत x  हँडलवरून देखील तशाप्रकारची सूचना प्रसारित झालेली दिसून येत आहे.  पण सौरवच्या या बोलण्याला फसून अनेक  हिंदुत्ववादी आपापल्या वैयक्तिक खात्यांवरून अशाप्रकारे जंतरमंतरवर जमण्याचे आवाहन लोकांना करताना दिसत आहेत. 

 यामागे एक षडयंत्र आहे! 

१० तारखेला मोठा हिंसाचार घडवून आणण्याच्या उद्देशानेच जंतरमंतरवर एकत्र होण्याचा cjp चा डाव असून त्यांनंतर होणाऱ्या सगळ्या हिंसाचाराचे किंवा दंगलींचे खापर मात्र या हिंदुत्ववादी संघटना आणि पर्यायाने सरकारवर फोडण्याचा त्यांचा हेतू आहे. भगवा दहशतवाद या संकल्पनेचे बीज रोवणारी, आणि अजमल कसाब सारख्या आतंकवाद्याच्या हाताला भगवा दोरा गुंडाळून हिंसेचे थैमान घालायला सोडणारी ही विषारी जमात पुन्हा  एकदा गळ्यात भगवे पट्टे आणि हातात भगवे झेंडे देऊन आपल्याच गुंडांना तिथे थैमान घालायला सोडण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यांचा हा डाव ओळखायला हवा आहे.      

या विषयाबाबत मत व्यक्त करत असताना, ‘येनकेन प्रकारेण सत्तेत येण्यासाठी कित्येक निष्पाप लोकांचे बळी जाऊ देण्यात कोणतीही खंत न वाटणाऱ्या या विचारधारेच्या या षडयंत्रास आपण बळी पडू नये. आपली सरासर विवेक बुद्धी  जागेवर ठेवून निव्वळ सत्तेची हाव आणि अराजकता माजवण्याचा स्वभाव याचा कोणताही वैचारिक, तात्विक वारसा नसणाऱ्या सच्च्या भारतीयाने अशा नीच आणि दुटप्पी डावाला बळी पडू नये. तरच हा देश आणि देशाचे सरकार स्थिर राहण्याची शक्यता आहे’  अशा प्रकारच्या भावना कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून दिसून  येत होत्या. 

 

अन्य लेख

संबंधित लेख