Friday, December 5, 2025

महायुती सरकारच्या वर्षपूर्तीचे ‘विकासाचे सरकार’ म्हणून केशव उपाध्ये यांच्याकडून अभिनंदन

Share

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने (Mahayuti Sarkar) आज यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण केले आहे.या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामगिरीचे कौतुक करताना, ‘विकासाचे सरकार, चांगल्या बदलाचे सरकार, जनतेचे सरकार’ या तीन वाक्यांत वर्षभराच्या कामकाजाचे अचूक वर्णन केले आहे.

केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, जनतेच्या प्रचंड अपेक्षा, विरोधकांनी जाणीवपूर्वक केलेला विरोध-अपप्रचार आणि अगदी निसर्गाने सुध्दा पाहिलेली परीक्षा या खडतर कसोट्यांवर मात करीत देवेंद्रजी सरकार अगदी १०० टक्के सोनं ठरलं आहे.

‘महाराष्ट्र थांबणार नाही’ ही केवळ घोषणा नाही, तर तो कृतीशील दृढनिश्चय आहे. विकासातून होत असलेले शाश्वत परिवर्तन जनता पाहते आहे, असे प्रतिपादन उपाध्ये यांनी केले.

‘विकसित भारत’मध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या ध्येयाचा संदर्भ देत उपाध्ये म्हणाले, “‘मोदीजीच्या २०४७ च्या विकसित भारतातील सर्वात मोठा वाटा महाराष्ट्राचा असेल’ असा विश्वासच देवेंद्रजी गेले वर्षभर देत आहेत.”

केशव उपाध्ये यांनी महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनापासून अभिनंदन केले आहे. लोककल्याणाची, चांगल्या बदलाची ही ‘सुपरफास्ट एक्स्प्रेस’ अशीच वेगाने धावत राहो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख