Thursday, January 1, 2026

मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार; नितेश राणेंची गर्जना

Share

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना (UBT) गटाला चांगलेच धारेवर धरले आहे. भाजपचे फायरब्रँड नेते आणि कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी एका जळजळीत ट्विटद्वारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर बोचरी टीका केली आहे. “जितकी मिर्ची उत्तर भारतीय महापौराची लागली, तितकी बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही?” असा सवाल राणेंनी विचारला आहे.

हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा डाव?
नितेश राणे यांनी उबाठा गटावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. मुंबईत ‘मराठी विरुद्ध अमराठी’ असा वाद निर्माण करून हिंदूंमध्ये फूट पाडण्याची ‘सुपारी’ ठाकरे गटाने घेतल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. “तुम्हाला उत्तर भारतीय महापौर चालत नाही, पण ‘बुरखेवाली’ महापौर चालणार का?” असा प्रश्न विचारत त्यांनी ठाकरे गटाच्या बदललेल्या राजकीय भूमिकेवर निशाणा साधला.

महापौर ‘आमचाच’ होणार!
मुंबईच्या अस्मितेचा आणि हिंदुत्वाचा पुनरुच्चार करताना नितेश राणे यांनी ठामपणे सांगितले की, आगामी निवडणुकीनंतर मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदूच असेल. विशेष म्हणजे, त्यांनी “तो महापौर आमचाच (भाजप-महायुतीचा) होणार!” असा विश्वास व्यक्त करत विरोधकांना थेट आव्हान दिले आहे.

मुंबई ❤️ महादेव 🚩
नितेश राणे यांनी आपल्या पोस्टची सांगता ‘मुंबई ❤️ महादेव’ आणि ‘भगव्या’ झेंड्याच्या इमोजीने केली आहे. यातून त्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा अजेंडा हा प्रखर हिंदुत्व आणि मुंबईचा सर्वांगीण विकास हाच असल्याचे संकेत दिले आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख