महाराष्ट्रामध्ये “महाराष्ट्रात सध्याचं जातीय संघर्षाचं वातावरण बघता या निवडणुकीत आपल्याला अडचण होईल, असं मी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना म्हटलं होतं. मी आधीच ठरवलं होतं की आपण कधीच जातीयवाद पाळायचा नाही. कुठलाही माणूस जातीने मोठा होत नाही, तर तो गुणाने मोठा होता. त्यामुळे जातीवाद समूळ नष्ट झाला पाहिजे”, असं नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलं आहे. गोव्यात पक्षाच्या एका मेळाव्यात बोलताना त्यांनी हे विधान केलं.
नितीन गडकरी आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात त्यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. ते म्हणाले कि, “माझ्या मतदारसंघात २२ लाख मतदार आहेत. त्यापैकी ४० टक्के मुस्लीम आणि दलित आहेत. मी लोकांना सांगितलं मी जातपात मानत नाही. तुम्हीही मानू नका, जो करेगा जात की बात उसको मारुंगा कस के लाथ, असं मी माझ्या मतदारसंघातील लोकांना सांगितले आहे.”