Sunday, October 13, 2024

NPS VATSALYA: अल्पवयीन बालकांसाठीच्या ‘वात्सल्य’ या नव्या पेन्शन योजनेला आजपासून प्रारंभ

Share

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज नवी दिल्लीत एनपीएस – वात्सल्य (NPS VATSALYA) योजनेचा प्रारंभ करणार आहेत. या योजनेसाठीचा ऑनलाइन मंच आणि पुस्तिकेचं लोकार्पणही त्या करतील, तसंच या योजनेच्या अल्पवयीन लाभार्थ्यांना कायमस्वरूपी निवृत्ती खाते क्रमांक कार्डांचं वाटपही करतील. या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या वतीनं मुंबईततल्या अस्मिता सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक संस्थेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात विद्यार्थ्यांना प्राण कार्डांचं वितरण केलं जाईल. एनपीएस – वात्सल्य योजनेद्वारे पालकांना आपल्या मुलांच्या भविष्यासाठी निवृत्तीवेतन खात्यात गुंतवणूक करता येईल.

Image Source : npsvatsalya.com

अन्य लेख

संबंधित लेख