मुंबईच्या उपनगरीय रेल्वे लाईनवरील वांद्रे हे एक जंक्शन आहे. इथे पश्चिम रेल्वे आणि हार्बर लाईन एकत्र मिळतात. तसेच बाहेरगावी येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांसाठी वांद्रे टर्मिनस हे एक मोठे स्थानक आहे. वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला रेल्वे लाईनला चिकटून एक खूप मोठी झोपडपट्टी आहे. सुमारे १० एकर परिसरात भारतनगर आणि बेहराम पाडा या नावाने वसलेल्या या झोपडपट्ट्यांमध्ये दाट लोकवस्ती, निकृष्ट बांधकाम आणि अपुऱ्या सुविधांमुळे सुरक्षेचे मोठे धोके आहेत.

साधारण १ लाखांची लोकसंख्या असलेली ही संपूर्ण वस्ती मुसलमानांची आहे. मुंबई महानगरपालिकेच्या व रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करून ही झोपडपट्टी अनधिकृतरित्या बांधण्यात आली आहे. त्यामुळे एकूणच हा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला खूप मोठा धोका आहे. रेल्वे हद्दीसह मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांवर गेल्या कित्येक वर्षापासून या झोपड्या उभ्या आहेत. वास्तविक पाहता सबंध मुंबईसाठी हा एक अत्यंत धोक्याचा इशारा आहे. पण या झोपड्यांवर कारवाई करण्याची कुणाची कधीही हिंम्मत झाली नाही.
काही झोपड्यांच्या खिडक्या तर काही झोपड्यांची प्रवेशद्वारे या रेल्वेच्या पादचारी पुलावर उघडतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा खूप मोठा धोका आहे. एवढेच नव्हे तर या झोपडपट्ट्यांमध्ये बांगलादेशी घुसखोर मुसलमान व रोहिंग्यांची लक्षणीय जनसंख्या आहे. मुंबई पोलीसही सहजासहजी या वस्तीत शिरकाव करू शकत नसल्यामुळे (नो गो एरिया) त्यांना ही वस्ती म्हणजे एक प्रकारचा अत्यंत सुरक्षित निवारा वाटतो. अर्थात ही संपूर्ण वस्ती म्हणजे रेल्वेला आणि आसपासच्या संपूर्ण परिसरासाठी सुरक्षेचे एक तगडे आव्हान आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निवासस्थान या वस्तीपासून हाकेच्या अंतरावर आहे. तरीही त्यांना इतक्या वर्षात ही अनधिकृत झोपडपट्टी त्यांना दिसली नाही हे आश्चर्यजनकच म्हणावे लागेल. आश्चर्य म्हणजे काही झोपड्या आपल्याला ४ मजली देखील दिसतात. मुसळधार पावसात या झोपड्या जमीनदोस्त होण्याचा खूप मोठा धोका असतो. मात्र त्याच्याकडे सोईस्कर कानाडोळा केला जातो.

इथल्या एकगठ्ठा मतांच्या लालसेपायी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) यांच्यासारखे राजकीय पक्ष व आर्थिक लाभापाई प्रशासनातील कर्मचारी या झोपडपट्टीला संरक्षण देतात. एखादेवेळी महापालिकेने किंवा राज्य सरकारने कारवाई करायला घेतली तर त्यात अडथळे आणतात.
२६ ऑक्टोबर २०१७ रोजी लागलेल्या भीषण आगीमुळे. शेकडो झोपड्यांबरोबर वांद्रे स्थानकाचा पूर्वेकडील स्कायवॉक (पादचारी पूल) खाक झाला होता. ही आग महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान लागली होती आणि सिलिंडरच्या स्फोटामुळे ती अधिक भडकली होती. अशावेळी मानवतेच्या दृष्टिकोनातून सरकार पिडीत कुटुंबांना पर्यायी जागा देते. त्यामुळे दर काही वर्षांनी ही आग ठरवून लावली जाते असा देखील संशय आहे. हा पादचारी पूल बांधण्यासाठी सरकारला नाहक भुर्दंड सोसावा लागला तो वेगळाच.
या वस्त्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अनैतिक व्यवसाय चालतात. ही झोपडपट्टी एम.डी (Mephedrone), हेरॉइन (ब्राऊन शुगर), चरस आणि कोकेन यांसारख्या घातक अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) तस्करीचे आणि खुलेआम विक्रीचे मोठे केंद्र बनली आहे.
अनेकदा लहान पेडलर्सचा (विक्रेते) वापर करून ग्राहकांपर्यंत ड्रग्ज पोहोचवले जातात. हे विक्रेते पोलिसांच्या नजरेतून सुटण्यासाठी फळ विक्रेते किंवा स्थानिक रहिवासी म्हणून वावरतात. भारतनगर आणि बेहराम पाडा या भागात प्रचंड गर्दी आणि अरुंद गल्ल्या असल्याने पोलिसांना येथे अचानक छापे टाकणे किंवा गुन्हेगारांचा पाठलाग करणे कठीण जाते. त्याचप्रमाणे भुरट्या चोऱ्या आणि पाकीटमारी हे धंदे सुद्धा सर्रास चालतात. रेल्वे स्थानकावरून पूर्वेला उतरणाऱ्या प्रवाशांना मुसलमान रिक्षा चालकांच्या येणाऱ्या प्रवाशांनी आपल्याच रिक्षात बसावे म्हणून केल्या जाणाऱ्या दादागिरीला तोंड द्यावे लागते. पोलीस व प्रशासनाने या विषयाच्या गांभीर्याकडे कधीच लक्ष दिले नाही असे खेदाने म्हणावे लागते.

मात्र, अलीकडेच भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या अनधिकृत झोपडपट्टी विरुद्ध आवाज उठवला व आंदोलन केले. त्याची दखल घेऊन एप्रिल २०२६ मध्ये पश्चिम रेल्वे प्रशासनाने योग्य नियोजन करून, रेल्वे स्टेशनला खेटून असलेल्या झोपड्या जमीनदोस्त करून मोठा भूखंड ताब्यात घेतला आहे. एवढेच नाही तर या भूखंडावर पुन्हा झोपडी उभी राहू नये, म्हणून विशेष खबरदारीही घेण्यात आली आहे. यात संरक्षित लोखंडी रेलिंगसह रेल्वे सुरक्षारक्षकांचीही गस्त घातली जात आहे.

रेल्वे प्रशासनाने केलेल्या या कामगिरीनंतर मुंबई महानगरपालिका जलवाहिन्यांवरील झोपड्यांवर कारवाई करेल, असे अपेक्षित होते. पण याकडे कानाडोळा करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे हद्दीबाहेर असलेले पादचारी पुलाच्या दोन्ही बाजूला खेटून ज्या झोपड्या उभ्या आहेत त्या व मुंबईच्या जलवाहिन्यांवरील टोलेजंग झोपड्या तशाच आहेत.
मुंबई महापालिकेत आता सत्तांतर झाले आहे त्यामुळे नवीन सत्ताधाऱ्यांकडून याबाबतीत कठोर कायदेशीर कारवाई होईल अशी मुंबईकरांना आशा आहे. जबकी नगाड़ा बाजे ही गया है….. तर बघता काय टाका सगळी अनधिकृत झोपडपट्टी उध्वस्त करून.