मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) २ ते ४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत महाराष्ट्राला (Maharashtra) भेट देणार आहेत. राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथून याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
सोमवार २ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत वारणानगर, कोल्हापूर येथे श्री वारणा महिला सहकारी समुहाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार ३ सप्टेंबर रोजी पुणे येथे सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या (डीम्ड युनिव्हर्सिटी) २१ व्या दीक्षान्त समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. तसेच मुंबई येथे महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात सहभागी होतील.
बुधवार ४ सप्टेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते उदगीर, लातूर येथील बुद्ध विहाराचे उद्घाटन होणार आहे. उदगीर येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांच्या मेळाव्यालाही त्या मार्गदर्शन करणार आहेत.
- महायुती सरकारची वर्षपूर्ती! ‘हित + विकास’ या समीकरणातून महाराष्ट्राला नवी दिशा – अमित साटम
- श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या ‘शहिदी समागम’ची जोरदार तयारी; खारघर येथील कार्यक्रमाची रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘आरम्भता की अरदास’
- महायुती सरकारच्या वर्षपूर्तीचे ‘विकासाचे सरकार’ म्हणून केशव उपाध्ये यांच्याकडून अभिनंदन
- महायुती सरकारच्या वर्षपूर्तीला ‘दक्षता’चे पाऊल! महसूल विभागात पारदर्शकतेसाठी ‘दक्षता पथके’
- CM रेवंथ रेड्डींचे ‘ते’ बोल ऐकून तुम्हीही थक्क व्हाल! कोटी हिंदूंच्या भावना दुखावल्या