पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात तसेच देशातील सर्वच मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे. पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारालाही चांगलाच रंग चढला आहे. ‘संविधान धोक्यात (Constitution Of India) असल्याचे बिनबुडाचे आरोप महाविकास आघाडीकडून (MVA) करण्यात येत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही’, तुमच्यामध्ये गैरसमज पसरवण्यात येत असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी बुधवारी सांगितले.
‘मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना काळात चांगले काम केले. त्यामुळे पुणेकरांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आणि आत्मीयता आहे. कोरोना नंतर त्यांनी विकास कामांना गती दिली. त्याबरोबर शहराचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. पुणे महापालिकेतील शिवाजी महाराजांचे स्मारक, महापालिकेत पहिल्यांदा स्थापन केलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धपुतळा, माता रमाईचे स्मारक, फुले दांपत्याची समता भूमी, लहुजी वस्ताद साळवे यांचे समाधी स्मारक ही काही उदाहरणे आहेत. सर्व समग घटकांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता अशी मोहोळ यांची प्रतिमा आहे, पुणेकरांनी त्यांना विक्रमी मताधिक्क्याने विजयी करावे’ असं आवाहन आठवले यांनी केलं.