Monday, October 21, 2024

याकूब बाबा तो बहाना है, ६५०० एकर जमीन निशाणा है l 

Share

प्रत्येक हिंदू आराध्यांची चुकीची छबी बनवणे हे प्रत्येक वामपंथीयांचे प्रयत्न राहिले आहेत, यातूनच अनेक कथांपैकी एक कथा कॉ गोविंद पानसरे यांनी  ‘शिवाजी कोण होता?’ या सुमारे ८० पानांच्या पुस्तकातून जन्माला घातली, ती कोणती तर शिवाजी महाराज अनेकांना गुरु मानत त्यात याकूब बाबा या एका मुस्लिम संताचाही समावेश आहे. (पान क्र. ४१) यासाठी श्रीमान महोदय सभासद बखरीचा उल्लेख करतात. पुढे  धिटाईने असंही सांगतात कि ‘मुसलमानांचे पीर, मशिदी, त्यांचे दिवाबत्ती, नैवेद्य, स्थान पाहून चालविले.’ – खरं पाहिलं तर सभासद बखरीमध्ये किंवा समकालीन कागदत्रांमध्येअसा कुठेही उल्लेख नाही. मग काही  freelancer / Part timer इतिहास अभ्यासक प्राथमिक संदर्भ सोडून सर्वज्ञानी (?) पानसरे यांचा संदर्भ घेऊन तिच कथा जोर लावून इतकी रेटतात की सत्याच्या आधारावर त्याच्या ठिकऱ्या उडतात. यांचा खोटेपणा फोल ठरवणारे काही त्यांचेच मुद्दे बघू.

उदा.

  1. दाभोळ स्वारीच्या वेळेस शिवाजी महाराज या भोंदू बाबा ल भेटले – खर पाहिलं तर शिवभारत या समकालीन ग्रंथात दाभोळ स्वारीचा उल्लेख आहे, परंतु त्याच्यात कोठेही या भोंदू बाबाचा चकार उल्लेख पण नाही
  2.  मक्का मदिनेहून केळीच्या पानावर १० – १० किलो वजनाचे पंजे समुद्रामार्गे वाहत आले – आता मक्का मदिनेच्या वाळवंटात केळीची शेती, आणि सुमारे ४००० किमी समुद्रामार्गे जलप्रवास करून मोठ्या लाटांच्या तडाख्यात पण ही पाने न फाटता येवढं वजन घेऊन येणे, खर तर अनिस (अंधश्रद्धा निर्मूलन समिती) ने यावर संशोधन करून पुरोगामी महाराष्ट्रात याचा जागर केला पाहिजे.
  3. शिवाजी महाराजांनी हा दर्गा एका दिवसात बांधला – जेवढ्या काही website वर आपण याकूब बाबा विषयी माहिती शोधलीत तर त्यात हा दर्गा ३८६ वर्षे जुना आहे असं लिहिले आहे. आणि ही गोष्ट गेल्या ५ – ६ वर्षांपासून सांगत आहेत. आपण चालू इंग्रजी २०२४ हे वर्ष जरी घेतलं तरीही हे लक्षात येईल की २०२४ – ३८६ = १६३८. म्हणजे शिवाजी राजे बाल्यावस्थेत असतानाचा कार्यकाळ येतो. (आपण वर उल्लेखलेली अजून ५ – ६ वर्ष सुद्धा विचारात घेतली नाहीत.) त्यामुळे हे नुसत अनाकलनीय नसून न पटणारे आहे. (आता राहिला प्रश्न एका दिवसात बांधकाम करण्याचा ते शक्य आहे, म्हणजे आतील असलेल्या प्रतिकांचा विध्वंस किंवा त्यांना लुप्त करणे.)

काही वेबसाईट माहिती करीता:

http://dargahinfo.com/DargahDetails.aspx?DargahID=358

एकीकडे शिवाजी इस्लामला धोका आहे, तो मुल्ला मौलवीना त्रास देतो, कल्याण भिवंडीच्या मशिदी पाडतो असं तक्रार करणारे मुल्ला मौलवी, स्वतः आदिलशहा, अफझलखान आणि शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून शिवभारत ग्रंथकार कवी परमानंद हेच अगदी स्पष्टपणे सांगतात. शिवाजी लहानपणा पासून मुसलमानांचा द्वेष करतो असं शिवभारतात पण लिहिलं आहे आणि समकालीन ब्रिटिश अधिकारी पण हेच लिहितात. मग हेच शिवाजी महाराज या भंपक बाबाला गुरू कसे काय मानतील???

खरे तर मुद्दा फक्त गुरूपदाचा नसून वेगळंच काही तरी आहे. जसं की हा दर्गा ज्या ठिकाणी आहे त्याच्या बाजूला ‘महालक्ष्मी चे मंदिर’ आहे, काफिराना बघताच क्षणी मारा, मूर्तिपूजा ही इस्लामच्या विरुद्ध आहे असं प्रचार प्रसार करणारा या मंदिराच्या बाजूला कसा राहू शकतो?

अगदी काही वर्षांपूर्वी या दर्ग्यावर ‘भगवा झेंडा’ लागायचा, आता त्याची जागा ‘हिरव्या झेंड्याने’ घेतली आहे. ‘पहिला नैवेद्य हिंदूच्या’ घरातून जायचा, आता ‘रामजन्मभूमी’ प्रकरणावरून ते शहाणे झाले आहेत. त्यांनी पूर्वी trust वर असलेल्या हिंदूंची नावे सुद्धा आता काढून टाकली आहेत. जाणून बुजून दर्ग्यावर याकूब बाबा ने शिवाजी महाराजांनी दर्ग्यावर घुमट बांधू नये असं सांगितलं जातं, ज्याला समकालीन काहीही पुरावा नाही. म्हणजे जर ‘पुरातत्व खात्याने उत्खनन’ हाती घेतलं तर काय निघेल हे वेगळं सांगायची सुज्ञ माणसाला सांगायची गरज नाही. 

आता हे का करायचं?
तर ती जागा आता Waqf board यांच्याकडे आता वर्ग केली आहे. त्या जागेच्या मूळ फेरफार मध्ये – ‘दे. इनाम (देऊळ इनाम)’ असा उल्लेख आहे, म्हणजे जे देहू गावातील वारकरी परंपरेतील अनगडशहा बाबा यांच्या समाधीस्थळाच्या जागेच्या मूळ सातबारा उताऱ्यात ‘देऊळमळा’ असा उल्लेख असूनही ती जागा waqf ने स्वतःची मालमत्ता असल्याचे सांगितले आहे. अगदी तोच प्रकार!

पूर्वी ही जमीन ६५३ एकर आहे असं म्हटलं जायचं, आता ‘आधुनिक जिन्ना’ – ओवैसी ती ६५०० एकर आहे असं म्हणतो. पिढ्यानपिढ्या त्या जमिनींचा भोगवटा घेणाऱ्या गावकऱ्यांना मात्र तिथे जायला आता प्रतिबंध आहे, ‘विपुल वनसंपदा’, विपुलित प्रमाणात सापडणारे ‘बॉक्साइट’ आणि समुद्रकिनाऱ्यालगतची ‘पर्यटन पूरक सौंदर्य स्थळे’ बळकावण्याचा हा प्रयत्न आहे यासाठी वेगळा परामर्श करण्याची गरज नाही.

एरवी ‘हिंदू – मुस्लिम ऐक्याचे प्रतिक’ वगैरे अफूची गोळी घालून विवादित वास्तू वरील ‘बदलेला झेंडा’, हिंदू समाजाकडून दाखवला जाणाऱ्या ‘पहिला नैवेद्याला अटकाव’ आणि त्या पाठोपाठ तिथल्या स्थानिकांना (भूधारकांना) स्वताच्या ‘जागेत जाण्यास प्रतिबंध’ या सर्व गोष्टी निशाणा नक्की कशावर आहे हे सांगण्यास पूरक आहेत.

सजग रहा! सतर्क रहा!! सुरक्षित रहा!!!

अन्य लेख

संबंधित लेख