Thursday, August 14, 2025

तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील ‘ती’ १४ गावे महाराष्ट्रातच समाविष्ट होणार! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच बोलले

Share

मुंबई : तेलंगणा आणि महाराष्ट्र (Telangana and Maharashtra) सीमेवर असलेली चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावे महाराष्ट्रातील असून त्यांना समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली. तेथील नागरिकांचे शंभर टक्के मतदान महाराष्ट्रातच होईल असेही त्यांनी स्पष्ट सांगितले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावे तेलंगणा आणि महाराष्ट्र सीमेवर आहेत. महाराष्ट्राच्या जमावबंदी आयुक्तांच्या रेकॉर्डप्रमाणे ही सर्व गावे महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे त्या सर्व गावांचे गावठाण महाराष्ट्रातच राहील याबद्दलची कारवाई आम्ही सुरू केली आहे. यासंबंधीचे पुरावे आणि रेकॉर्ड आमच्याकडे आहे, आणि त्याची नोंद महाराष्ट्र शासनाने घेतली आहे.”

“या सर्व १४ गावांतील नागरिक महाराष्ट्रातील मतदार असून ते महाराष्ट्रातच मतदान करतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्या ग्रामपंचायती महाराष्ट्राचाच भाग राहणार आहेत. त्यामुळे यात कोणताही संभ्रम नाही. काही काळ असा होता की, दोन्ही राज्यांतील व्यवहार सारखाच होता. पण आता जिवती तालुक्यातील या चौदाही ग्रामपंचायतीतील गावे महाराष्ट्रात असतील. तेलंगणा राज्याकडे रेकॉर्ड नसल्याने त्यांनी दावा केला तरी तो मजबूत होणार नाही. या गावांना महाराष्ट्रात समाविष्ट करण्याची प्रक्रिया जवळपास सुरू झाली असून लवकरच त्याचा अंतिम निर्णय होईल,” असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख