Saturday, February 28, 2026

खारघरमध्ये २८ फेब्रुवारी व १ मार्चला ऐतिहासिक ‘हिंद-दी-चादर’ सोहळा; २० लाख भाविकांची मांदियाळी

Share

नवी मुंबई (खारघर) : अतुलनीय शौर्य आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी बलिदान देणारे नववे शीख गुरु, श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबईतील खारघर येथील ओवे मैदानावर २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी ‘हिंद-दी-चादर’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून १८ ते २० लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

अल्पसंख्याक विकास विभाग आणि शहीदी समागम राज्य समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने यापूर्वी नागपूर आणि नांदेड येथे यशस्वी कार्यक्रम पार पडले आहेत. याच मालिकेतील हा तिसरा आणि सर्वात मोठा सोहळा कोकण विभागाचे विभागीय आयुक्त आणि राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.

पंतप्रधान मोदींचे संबोधन आणि दिग्गजांची उपस्थिती
या ऐतिहासिक सोहळ्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे (Video Conferencing) संबोधित करणार आहेत. याशिवाय व्यासपीठावर राजकीय आणि अध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत:

प्रमुख पाहुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

इतर राज्यांचे मुख्यमंत्री: योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश), भूपेंद्रभाई पटेल (गुजरात), डॉ. प्रमोद सावंत (गोवा), नायब सिंह सैनी (हरियाणा), मोहन यादव (मध्य प्रदेश), भजनलाल शर्मा (राजस्थान) आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता.

अध्यात्मिक गुरु: योगगुरू बाबा रामदेव, धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर धाम) आणि साध्वी ऋतंभरा.

तसेच, महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, गुजरात चे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, तमिलनाडु चे भाजपा नेता अण्णामलाई उपस्थित राहणार आहेत.

संप्रदाय सहभाग: शीख, सिकलीगर, बंजारा, लबाणा, मोहयाल, सिंधी, वाल्मीकि, उदासीन आणि भगत नामदेव संप्रदायाचे संत व रागी जत्थेदार उपस्थित राहणार आहेत.

सोहळ्याचे मुख्य उद्देश
गुरु तेग बहादूरजींचे शौर्य, धर्मस्वातंत्र्य, मानवता आणि न्यायाची मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. २७ फेब्रुवारी रोजी भव्य नगर कीर्तन काढले जाईल. कार्यक्रमात आध्यात्मिक प्रवचन, कीर्तन, ऐतिहासिक प्रदर्शन आणि भव्य लंगर व्यवस्था असेल.

प्रशासकीय तयारी आणि सुविधा (एका नजरेत)
२० लाख भाविकांच्या सोयीसाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर तयारी केली आहे:

सुविधातपशील
मुख्य मंडप क्षमता८० हजार ते १ लाख आसन व्यवस्था
वाहतूक१५० पेक्षा अधिक विशेष NMMT बस सेवा
पार्किंग३८ विस्तीर्ण पार्किंग स्थळे
हेलिपॅड३ विशेष हेलिपॅडची निर्मिती
निवास व्यवस्था२५,००० लोकांसाठी राहण्याची सोय
आरोग्य सेवा३००+ डॉक्टर, १५ आरोग्य केंद्रे, १ तात्पुरते ICU
रुग्णालय राखीव बेड३५० बेड आणि ७५ ICU बेड राखीव
स्वच्छता१०००+ तात्पुरती शौचालये, ५००+ स्वच्छता कर्मचारी

अन्य लेख

संबंधित लेख