खरं म्हणजे शिवसेना (उबाठा) या शिल्लक बचत गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या कौटुंबिक कलहाची सोशल मीडियावर सार्वजनिक चर्चा होऊ नये… कारण पतीपत्नीमधील संबंध हे पूर्णपणे खाजगी व गोपनीय स्वरूपाचे असतात व ते तसेच राहिले पाहिजेत…
मात्र विनायक राऊत यांच्या सुनेने पोलिस ठाण्यात आपल्या शारीरिक व मानसिक छळाविरुद्ध रितसर तक्रार दाखल केली असल्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागून समाज माध्यमांवर त्याची चर्चा सुरू झाली…
त्यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे तिच्यावर बंगाली बाबाकडून केले गेलेले तांत्रिक व अघोरी विद्येचे प्रयोग. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून मध्यरात्री एका भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे.
हाच धागा पकडून शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या गटातील नेत्यांना अशा प्रकारे बोभाटा करण्याची सवय आहे. धक्कादायक म्हणजे चक्क, मातोश्रीवर काळी जादू करण्यासाठी बंगालमधील जादू बाबा (अर्थात बंगाली मुसलमान) येत असल्याचा दावाही त्यांनी केला. उबाठा नेते जादूटोण्याविरोधात बोलतात, मात्र स्वतःच भोंदूबाबांकडे जातात. या प्रकरणात सरकारने सुमोटो कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
मातोश्रीवर काळी जादू करण्यासाठी बंगालमधील जादू बाबा येत असल्याचा शिवसेनेत प्रदीर्घ काळ काम केलेल्या संजय शिरसाट यांचा दावा… महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारा आहे… “महाराष्ट्राचा अपमान महाराष्ट्राचा अपमान” म्हणून दिवस रात्र सत्ताधारी महायुतीच्या नावाने टाहो फोडणाऱ्या शिवसेना (उबाठा) नेच महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने अपमान केला आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तंत्रमंत्र आणि अघोरी विद्येचे प्रयोग कशासाठी करत आहेत? निश्चितच सत्तेसाठी असावेत. अशा प्रयोगांनी सत्ता मिळत असती तर राहुल गांधी केव्हाच देशाचे पंतप्रधान झाले असते. खुद्द उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपली ५ वर्षांची कारकीर्द सहज पूर्ण केली असती… आणि अरविंद केजरीवाल कधीच सत्तेतून पायउतार झाले नसते…
आणि त्यातही मुसलमान बंगाली तांत्रिकांची विद्या सफल झाली असती तर… एव्हाना असदुद्दीन ओवैसी भारताचे वजीर ए आजम झाले असते… कारण मुसलमान बंगाली तांत्रिकांनी आपली विद्या काफीर हिंदू पंतप्रधान व्हावा म्हणून कधीच वापरली नसती… महाराष्ट्रात ती अबू आसिम आझमी किंवा नवाब मलिक मुख्यमंत्री व्हावेत… म्हणून वापरली असती… ते आपली तांत्रिक विद्या काफीर हिंदू उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी कशाला वापरतील?… एवढी तरी आपली विवेक बुद्धी त्यांनी शाबूत ठेवायला हवी होती…
आपल्या पुरुषार्थाने जनतेचे मन परिवर्तन करावे… बहुमताला आवश्यक असलेले आमदार जनतेतून निवडून आणावेत व अत्यंत सन्मानाने मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसावे हा घटनात्मक व नैतिक मार्ग सोडून… तंत्रमंत्र व आघोरी विद्येमुळे आपल्याला सत्ता मिळेल असे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना खरेच वाटते का?… वाटत असेल तर ते मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत…
कारण त्यांना मिळालेली अडीच वर्षांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची देखील त्यांच्या “विश्वासघातकी” कुशलतेमुळे मिळाली होती… तंत्र-मंत्र किंवा अघोरी विद्येमुळे नाही…
सत्ताप्राप्ति सोडून त्यांचा अन्य काही उद्देश असेल तर मात्र ते पुरोगामी महाराष्ट्रासाठी अजूनच लांच्छनास्पद ठरेल…
“आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही… देवळात घंटा बडवणारे नाही… गायीचे नाही ताईचे आहे”… म्हणून फुशारक्या मारणारे लाचार सम्राट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व तंत्रमंत्र आणि अघोरी विद्येचे आहे हे जगाला आता कळून चुकले आहे… त्यांचा बुरखा टराटरा फाटला आहे…
राजकीय स्वार्थासाठी “आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही” म्हणून आपल्या वडिलांच्या… स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचे खरे वारसदार आपणच आहोत हे दाखवण्याची केविलवाणी धडपड उद्धव बाळासाहेब ठाकरे करताहेत… मात्र तंत्रमंत्र आणि अघोरी विद्या हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व नव्हते एवढे निश्चित… त्यांचे हिंदुत्व तेजस्वी होते… कल्याणकारी होते… आत्मसन्मानाचे होते आणि विज्ञानवादी होते…
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या वडिलांच्या हिंदुत्वाच्या वारशाला पुरता काळीमा फासला आहे. हिंदुहृदयसम्राट यांचा मुलगा म्हणून आपल्या बंगल्यावर मुसलमान बंगाली बाबांकडून काळ्या जादूचे प्रयोग करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे अगदीच दळभद्री निघाले… असे खेदाने म्हणावे लागते…
२०१९ महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर औट घटकाच्या मुख्यमंत्रीपदासाठी जनमताचा कौलपायदळी तुडवून उद्धव बाळासाहेब ठाकरे लाचारी करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चरणी लीन झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्यांचे हिंदुत्व पचणे शक्यच नव्हते.
तेव्हा राजकीय सोयीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुरोगामी विचारांचा आडोसा घ्यायला सुरुवात केली…
वर उल्लेख केलेली त्यांची “आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही… देवळात घंटा बडवणारे नाही… गायीचे नाही ताईचे आहे”… ही सगळी विधाने वडिलांचे हिंदुत्व व आजोबांचे पुरोगामीत्व या दोन्ही डगरींवर एकाच वेळी दोन्ही पाय ठेवून क्षणभंगुर सत्तेसाठी कसरत साधण्याचा केविलवाणा प्रयत्न होता…
मात्र आज मातोश्रीवर तंत्रमंत्र आणि अघोरी विद्येच्या प्रयोगांसाठी मुसलमान बंगाली बाबांची ये जा सुरू आहे… हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुरोगामी विचारात बसते काय?… प्रबोधनकार ठाकरे यांनी आयुष्यभर कर्मकांडांना आणि धार्मिक अवडंबरांना अत्यंत प्रामाणिकपणे विरोध केला… त्यांचा नातू म्हणून आपल्या बंगल्यावर मुसलमान तांत्रिकांद्वारे जादूटोण्याचे प्रयोग करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे अगदीच कर्मदरिद्री निघाले… असे नाईलाजाने म्हणावे लागते…
मात्र तंत्रमंत्र आणि अघोरी विद्येच्या नादी लागल्यामुळे ना त्यांना वडिलांचे हिंदुत्व जपता आले ना आजोबांचे पुरोगामित्व…
कदाचित उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हे अघोरी प्रताप बघून… प्रबोधनकार ठाकरे व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपल्या फोटोतून बाहेर येऊन “नाठाळाचे माथी हाणावी काठी” या उक्तीप्रमाणे त्यांच्या डोक्यात काठी तर हाणणार नाहीत ना अशी आम्हाला भीती वाटते…
कायम “फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र” म्हणून धोशा लावणाऱ्या शरद पवारांनी. मित्रपक्षाच्या प्रेमापोटी यापुढे “फुले शाहू आंबेडकर आणि बंगाली बाबांचा पुरोगामी महाराष्ट्र” म्हणून टिमकी वाजवायला हरकत नाही.
“मुंह में रामरक्षा बगल में अघोरी विद्या”… हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे खरे स्वरूप असून महाराष्ट्राची सुजाण जनता ते कधीच स्वीकारणार नाही…